Literature

विषय विवेचन १४

विषयांच्या साधनांत ज्याचें मन आसक्त आहे अशा धनादिकांच्या मोहानें मूढ झालेल्या बालिशबुद्धिच्या प्रमादशील माण साला मोक्षाचे शास्त्रोक्त साधन स्फूरत नाही. ‘जे काही आहे ते या लोकांतच ! कुठे आहे दुसरा लोक? इथले सुख यथेच्च अनुभवा वयाचें म्हणजे जन्माचे सार्थक दुसरे काय ?” असे मानणारा पुन्हा पुन्हा माझ्या तावडीत सापडतो, असे श्रुतीने यमाच्या तोंडूनच सांगविले आहे.

‘शद्वस्पर्शादियो येऽर्था अनर्था इव ते स्थिताः । 

शद्वस्पर्शादि ही साधनें अर्थरुप म्हणजे सुखसाधनरुप नसून अनर्थरूप म्हणजे दुःख साधनरुपच आहेत. या शद्वादि विषयांतच जर सुखाची भावना स्थिर झाली तर खरे सुख वाजूलाच रहाते. ‘येष्वासक्तस्तु भूतात्मा न स्मरेच्च परं पदम् ।’ परम सुखाची आठवणच घालवून टाकण्याचे कांही विचित्र सामर्थ्य या शद्वादि विषयांत आहे. यांत एकदां कां आसक्त झाले की त्या परमपवित्र अशा निरतिशय आत्मीय अद्वितीय सुखाची ओळखच विसरतें. तहान भागविण्याची इच्छा होऊन, तरंगाहून आपले स्वरूप अल्प प्रमाणाचें आहे असे वाटल्यामुळे, तरंगात असणाऱ्या आर्द्रतेकडे, तिचा एक कण मिळाला तरी पुरे म्हणून जसा एखाद्या महोदधी वळावा त्याप्रमाणे अपारचित्सुखमहोदधी असा हा जीव आपल्या सुखाची इच्छा पुर विण्यासाठी आपले स्वरुप विसरुन मायामारुतविभ्रमानें आपल्यांत उत्पन्न झालेल्या अनंतकोटीब्रह्मांडरपी तरंगाना भिन्न मानून त्यापैकी एका तरंगात म्हणजे एका ब्रह्मांडात प्रवेश करून कर्म वशतेनें दिसून येणाऱ्या अनेक देहापैकी एक होऊन, देहशक्तीने मर्यादित झालेल्या इन्द्रियाने एका ब्रह्मांडातील देखील अत्यल्प भागांतून इंद्रीयांना भासणाऱ्या पदार्थापैकी सुद्धा एकामागून एक असे कांही पदार्थच इंद्रियशक्ति क्षीण होईपर्यंत एक क्षणभरच जो अनुभवितो, ते पाहिले म्हणजे हे किती भ्रामक आहे! असे वाट लागते. किती या विषयसुखाचे कौतुक करावे ! जीवाचें परम पावन असे अखंड चित्सुख झांकून या जिवाला ‘किळसवाणा देहच मी’ असें दृढ करून आपल्या इच्छेने उणीव, हालअपेष्टा इत्यादिकांनी युक्त असणाऱ्या दुःखरुप वैतरणींत ढकलून, अनेक रोगादि कांनी व चिंतेनें या जीवाला छळीत, अतिकष्ट देणारे हे विषय सुख खरेंच ! पण यानी जिवावर बसविलेला आपला पगडा पाहून कोण्या विवेक्याला याचे सखेदाश्चर्य वाटणार नाही ? मलमूत्रास्थिचर्मादि अतिदुर्गंध असणारी देहद्रव्ये सर्व शरीरांतून एकच असतांना वासनेने यांत स्त्रीपुरुषादि भाव निर्मून यातच परस्परांनी मनमोहक सौंदर्याची भावना ठेवून त्यांतूनहि त्या देहांत अति अपवित्र असणाऱ्या, साहजिक आपल्या दुर्गंधीने किळस आणणाऱ्या निकृष्ट अशा परस्परांच्या देहयोनीतच या जीवांचे स्तरासुखसर्वस्व जे दिसून येते याला काय म्हणावें ? अविद्येच्या कर्तबगारीची येथे सीमा झाली. विषयसुखाच्या भ्रामक कल्पनेची ही पराकाष्टा !

अन्यांत्रान्यस्य धर्मस्तु प्रतीतो विभ्रमो मतः॥’ (सू. सं.) वेगळ्याच कोणत्या तरी वस्तुचा धर्म वेगळ्याच कोणत्या तरी वस्तुवर जो दिसून येतो त्यालाच ‘भ्रम’ म्हणतात. प्रत्येकाचा अनुभव हा ज्ञानात्मकच आहे. ज्ञानरहित असा कोणचा अनुभव येतो. न समजून आलेल्या अनुभवाची स्मृति कधी तरी शक्यआहे का? आपल्याला थोडा वेळ भासवून नष्ट होणाऱ्या साऱ्या अनुभवाला ज्ञानरुपच कारण आहे. भासून नष्ट होणारे पूर्वी असणाऱ्या स्वयंप्रकाशित ज्ञानानेच भासून येते असे झाले की, ते ज्ञान भासून नष्ट या होणाऱ्या भासाबरोबर भासून नष्ट होणारे म्हणजे सदोदित असणारे असेच झाले. उत्पत्तिरहित असणारें केव्हांहि जसेच्या असते. अशा नित्य ज्ञानानेच भासून नष्ट पावणारे म्हणजे उत्पन्न होऊन नष्ट पावणारे कार्य आपल्या आपणच प्रकाशित न होणारे असते. यालाच ‘जड’ असे म्हणतात. भासून नष्ट होणारे आपल्या दृश्य त्वामुळे नामरुपात्मकच असणार. कार्य नामरुपात्मकच. जे या जड नामरुपात्मक कार्याच्या पूर्वीचे असून या सर्वांना प्रकाशित करतें नामरुपरहित स्वयं प्रकाशमान असेही असणार नामरूपरहित अशा ज्ञानांत नामरुपात्मक जड कार्याचेभान म्हणजे विपरीत भान उत्पन्न करणारामूळे स्वरूपाचे शुद्ध अज्ञानच कार्यात मोडणाऱ्या नामरुपाला मर्यादा आहे. यापूर्वी असणारे ज्ञान कशानेहि मर्यादित होता अमर्यादितच असणार, अमर्यादज्ञानाच्या ठिकाणी मर्यादिताचे ज्ञान होते म्हणजे त्या ज्ञानाचेच अत्यल्प भान होय. भान देखील स्वतंत्रपणें प्रकाशित होत नाही. सर्व प्रकाशक अनंतज्ञान अद्वितीयच असे झाले की त्यांत झालेले म्हणून, अनुभवा त्मक म्हणून, जड म्हणून दुसरे असे काय आढळणार या चिन्मात्र स्वरुपात माया म्हणून अथवा अविद्या म्हणून तरी दुसरे काय असणार? अन्तस्मिनस्तद्बुद्धिविपर्ययः| नसलेल्याची भावना करणे म्हणजेच विपर्यय. हा विपर्यय विरुद्धस्थिति दाखविणारा असतो. एका वस्तूत तद्विरुद्ध जी भावना तिलाच भ्रम, अज्ञान मिथ्याज्ञान, अध्यारोप इत्यादि इतर नांवे आहेत… • विपर्ययो मिथ्याज्ञान मतद्रु पप्रतिष्ठाम् ।’ (योगसूत्रे) 

यस्यज्ञानाद्य द्विभाति तज्ज्ञानात्तनिवर्तते ।

रज्वज्ञानादहिभान्तिस्तद्विज्ञान्निवर्ततें ॥ 

अज्ञानाने दिसून येणाऱ्या भावना घालविण्यास त्या वस्तूच्या ज्ञानाशिवाय मार्ग नाही. दोरीवर सर्पभ्रांति झाल्यास त्याची निवृत्ति अन्योपयानी न होता दोरीच्या यथार्थ ज्ञानानेच होते. ‘मी’ या भानाच्या यथार्थ जाणिवेने भासणारा अज्ञाचा प्रांत मागे टाकून ‘ मी ‘ या भानाचे यथार्थस्वरुप पाहूं गेलो तर ‘मी’ या भानाला गोचर होत असलेले दृश्य मावळेल. ‘मी’ही स्फूर्तीहि त्याच्या पूर्वीच्या स्वरूपांत विरघळून जाईल. तेथे एकच एक निर्विकल्प ज्ञान स्वरूप उरेल. त्या आपल्या केवल ज्ञानमात्र स्थितीत कोणतीहि भावना दिसणार नाही. निस्तरंग ज्ञानमहोदधी आपल्या अनंततेच्या निरतिशय गांभिर्यतेनें एकच एक असा इथे उरतो. भावना ही अन्याचीच होत असते. ज्ञानमात्र अशा या आपल्या स्वरूपांत आपल्या केवलत्वाने अन्याचा ठावच पुसला जातो. अन्य जर काही नाही तर त्याची भावना कोठून येईल ? त्यांतूनहि भावना मानलीच तर आपलीच भावना आपल्याला असणार! अन्याभावी ही भावनाहि आपलें केवल ज्ञानस्वरूपच होईल. एकामध्ये दुसरें असू शकत नाहीं या न्यायाने आपलेच भान आपल्याला असणार या युक्तीनें व आपले भान म्हणजे ते आपल्याहून भिन्न नसून आपणच या अनुभवाने अन्याचे संपूर्ण उच्चाटण झाले असतां उरणारी आपली ज्ञानमात्रस्थिति म्हणजेच या चराचर विश्वाची स्थिती. रजौसर्पभ्रान्तिरिवाद्वितीये सर्वनुस्यतें सर्वमयें ब्रह्मणि

देवतिर्यड नरस्थावर स्त्री-पुरुषवर्णाश्रमबन्धमोक्षोपाधि नानात्मभेदकल्पितं ज्ञानमज्ञानम् ॥’ दोरीच्या ठिकाणी होणाऱ्या सर्पभ्राति प्रमाणें अद्वितीय, सर्वव्यापि व अधिष्ठानदृष्टीने त्याचेच भान या नानारूपाने होते म्हणून सर्वमय अशा ब्रह्माच्या ठिकाणी देव, पशुपक्षी, मनुष्य, वृक्षादि स्थावर, स्त्री-पुरुष, ब्राह्मणादिवर्ण, ब्रह्म चर्यादि आश्रम, बंधमोक्ष उपाधि, नानात्मत्त्व, सर्वभेद सारे असे हैं कल्पित भेदज्ञान म्हणजेच अज्ञान.

ब्रह्म हे अद्वितीय आहे असे साच्या उपनिषदांचे तात्पर्यं. या अद्वितीय ब्रह्माचे अज्ञान म्हणजेच हे सारें दिसून येणारे अनेक अनेक आंकड्यांत एका प्रमाणे, या अनेकत्वात एकत्वच सत्य आणि सर्वकारण म्हणून ठरते. आंकड्यांत एकच मुख्य. हेच साऱ्यात असणारे. या एकांत याहून कांही अन्य नसल्यामुळे हाच यांत कितीदा जरी मिळविला तरी याहून भिन्न असा दुसरा आंकडा न निपजतां अनेक बुडबुड्यातून पाणी एकच दिसून येत असल्या प्रमाणे अनेक फुगलेल्या आकड्यातून या एकाची व्याप्ती अखंड असणारच. मध्य-आदि-अंती असणाऱ्या सत्य अशा या एकामध्ये अनेक संख्यांची कल्पना जशी भ्रामक त्याप्रमाणेच या अद्वितीय ब्रह्मांत हे अनेकत्व भ्रामक. सर्वभासाला एक दोरीच अधिष्ठान रूप असून तद्विरूद्ध अशा सर्वमानांतून देखील तीच व्यापून असते म्हणजे दोरीच बनून सर्प म्हणून जसे आम्ही म्हणतो, त्याचप्रमाणे भ्रामक अनेकत्वाच्या अनुभवांतून आम्हाला अद्वितीय ब्रह्माचेच भान होत असते. भ्रम हा स्वयंप्रकाशित नसतो असे झाले की भ्रमाचा अनुभव सत्याच्या योगानेच होतो हे स्पष्ट आहे. अनेक त्वाच्या भ्रमाचा अनुभव सत्य असणाऱ्या त्या अद्वितीय सत्याच्या योगानेच होतो हे स्पष्ट आहे. अनेकत्वाच्या भ्रमाचा अनुभव ब्रह्मामुळेच. तेव्हा आमचा अनुभव ब्रह्मरूपाचा ठरून आमच्या अद्वितीय ब्रह्मानुभवालाच भ्रमाने अनेकत्वाच्या दृष्टीनें आपण बघतो असे झाले. दोरीहून तिच्यावर भासणारा सर्प कांही वेगळा नसल्यामुळे एखाद्या ज्ञात्याने ‘ सर्पच रज्जू’ म्हणून जसे म्हणावे त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूपावर भासणारे अनेकत्व वेगळे नसल्यामुळे अनेकत्व, ही विविध रूपे म्हणजे ब्रह्मच, असे श्रुति सांगते. बाधासमानाधिकरण न्यायाने याचा अर्थ करावा. सर्पच दोरीं म्हणण्यांत दोरीवर झालेला भ्रामकसर्पाचा भास घालवून दोरीच सत्य या दृष्टीने दोरी आणि सर्प या दोन्ही शब्दांचा आश्रय, एकच वस्तु म्हणून जसे मानावयाचे त्याचप्रमाणे ‘सर्व खल्विदं ब्रह्म’ म्हणण्यांत हे म्हणून म्हटले जाणारे सारे घालवून अद्वितीय ब्रह्मांत दुसरे असे काही झालेले नसल्यामुळे ते जशाच्या तसेच केव्हांहि असल्याप्रमाणे आतांहि आहे असे सम जावे, ‘ब्रह्म’ आणि इदं’ शब्दाने ‘गोचर होणारे अखिल कार्य, या दोन्ही शब्दांचा अर्थ एका नित्य निर्विकल्प अशा अद्वितीय वस्तूच्या लक्ष्यार्थानेच व्हावा.

‘अविद्या विद्यमानैव नष्टप्रज्ञेषु दृश्यते । नाम्नेवाङगीकृतताकारा साम्यवप्रज्ञस्य सा कृतः ॥’

‘अविद्या’ याचा अर्थ नसलेली असा होतो, ‘न विद्यते सा अविद्या’ नसलेली आहे बुद्धिमानास वाटत नाही. जसेच्या तसेच समजणे म्हणजे बुद्धिमानाचेलक्षण. नुसत्या शब्दानेच भासणारी अर्थरूप अनुभवानें नसलेली अशी अविद्या बुद्धिशाली विवेक्यास कोठून असणार ? या अविद्येमुळेच अद्वितीय ब्रह्मानूभवाची दृष्टी मावळते. ब्रह्मच सुख हा निश्चय ढासळतो. विविध विषयानुभवांतच सुख वाटू लागते. विविध रूपांनी नटलेले जग मग मोह पाडते. अद्वितीय ब्रह्माच्या अस्तित्वात या अशा अनुभवाला वावच नस ल्यामुळे या अशा अनुभवाला कारणीभूत होणारी अविद्या ब्रह्म

स्वरूपांतच नाहीच म्हणावे लागते. अविद्येच्या जीवाला असली ही अवदसा प्राप्त होते असे म्हणणे म्हणजे वंध्यापुत्राच्या कोणी एखादा फारच संकटात आहे असे म्हणण्यासारखे होते. विचारांती ही कल्पना हास्यास्पदच होते. अविद्येच्यां जीवाला अज्ञान असे कांही भरीव विचारांचे ठरणार नाही. ती आच्छादन करणार नाही आणि स्वयंप्रकाशित वस्तु कशाकडूनहि आच्छादली जाणार नाही. स्वयंप्रकाशित वस्तूच्या दृष्टीने ती अद्वितीय असल्यामुळे इतरांचा मुळी मागमूसहि तेथें नसावयाचा. मग ही अविद्या इच्यामुळे होणारे आवरण, आवरणामुळे होणारे अज्ञान अज्ञानाने होणारे अनेकत्व, भेद, स्त्री-पुरुषादिभाव, भोक्तृत्व इत्यादि मुळी नसलेल्या अविद्येची वंध्यापुत्राचा वंश विस्तारच

‘ज्ञातं येनं निजं रूपं कैवल्य परमं पदम् | निष्क्रियं निर्मलं साक्षात्सच्चिदानन्दरूपकम्||

उत्पत्ति स्थितिसंहार स्फूर्तिज्ञानविवर्जितम| येतज्ज्ञानमिती प्रोक्तमज्ञानं यदतोन्यथा||

(योगतत्वोपनिषद १७-१८)

अखिल कार्याच्या या उत्पत्ति स्थिति नाशाहून जे अतिदूर असून या कार्याच्या जाणीवेची नुसती झुळुक सुद्धा जेथें फिरकत नाही, जे क्रीयारहित नसल्यामुळे जे नित्यशुद्ध, ते निरुपाधिक अस्ति भाति प्रियत्वानें साक्षात् सच्चिदानंदरूप ज्याला म्हणून परमपद म्हणतात, जे कैवल्यस्वरूप तेच मी म्हणून जाणले याला ज्ञान म्हणतात. याहून विलक्षण युक्त असणारे म्हणजेच अज्ञान.

‘एवं सदात्मानमखण्डितात्मना विचारमाणस्य विशुद्धभावना ॥ हन्यादविद्यामचिरेण कारके: रसायनं यदुपासितं रुजः ॥ (अ. रा. रामगीता)

दिव्य रसायन जसे ते घेणाऱ्याचा रोग घालवितें तसेच अखंड दंडायमान असणाऱ्या चित्सुखरूप अशा या आपल्या अद्वितीय आत्मस्वरूपाच्या ‘तेंच मी’ अशा प्रमाणे केलेल्या या सतत विचाराने उत्पन्न झालेली ही शुद्धभावना, त्याच्या ठिकाणी असलेली अविद्या आणि तिचे कार्यसंबंध नष्ट करून टाकते.

‘कल्पनेनें कल्पना उडें । जैसा मृगें मृग सांपडे । कां शरें शर आतुडें । आकाशमार्गी ॥’ (दा. ७/५/३१) 

‘शुद्ध कल्पनेची खूण | स्वयं कल्पिजे निर्गुण |सत्वस्वरूपीं विस्मरण | पडोचि नेदी ||’ (दास ७।५।३३)

‘सदा स्वरूपानुसंधान |करी द्वैताचें निर्शन | अद्वैतनिश्चयाचें ज्ञान | तेंचिशुद्ध कल्पना ||’ (दास ७।५।३४) 

अद्वैत कल्पी तें शुद्ध । द्वैत कल्पी तें अशुद्ध । अशुद्ध तेचि प्रसिद्ध ।सबळ जाणावी ॥’ (दास ७।५।३५)

शुद्ध कल्पनेचें बळ । जालिया नासे सबळ । हेंचि वचन प्रांजळ । सावध ऐका ॥’ (दास ७।५।३२)

‘अद्वैतकल्पना प्रकाशें । तेचि क्षणीं द्वैत नासे । द्वैतासरसी निरसे ।सबळ कल्पना ||’ (दास. ७।५।३७ )

‘अज्ञानादेव संसारो ज्ञानादेव विमुच्यतें ।’ जीवाला हा संसार स्वरूपाज्ञानामुळेच. एकदां स्वरूपज्ञान झाले की, सूर्यप्रकाशानें धुके नाहिसे झाल्याप्रमाणे सारा हा संसार ओसरून जातो. ‘प्रिय’ हे जात्याच विरुद्ध असणारे ‘अप्रिय’ कधी होणार नाही आणि तसेच अप्रियहि पण. जात्याच प्रिय असणारे काही काल अप्रिय होतें व जात्याच अप्रिय असणारेहि काही काल प्रिय होते असे म्हणणे योग्य होणार नाही. वस्तु स्वतः ला सोडून कधीहि असू शकत नाही. प्रिय ते केंव्हहि प्रियच असणार आणि अप्रिय केंव्हाहि अप्रियच. अंधार हा कधी प्रकाश होत नाही व प्रकाशहि पण कधी अंधार होत नाही. प्रकाश आणि अंधार या दोहोचें साहचर्यहि पण संभवत नाही. अंधार काही काळ प्रकाश होणे व प्रकाश कांही काळ अंधार होऊन असणे हेंहि पण असंभवनीयच. हा देह आपल्या अपवित्रतेनें व दुर्गंधीनें वास्तविक केव्हांहि अप्रियच असणार. कांहीं काळ प्रिय होऊन कांही काळ अप्रिय असणं आणि पुन्हा प्रिय होणे हें जात्याच अप्रिय असणाऱ्या ठिकाणी असंभवनीय नाही. जरी मानले तरी ते युक्तीला सोडून होईल जात्याच अप्रिय असणाऱ्या देहाच्या ठिकाणी प्रियत्व संभवत नाही. असे ठरले की देहाच्या ठिकाणी दिसून येणाऱ्या प्रेमाला कारण देह नसून देहा हुन अन्यच कांही तरी प्रिय असावे व त्या जात्या प्रिय असणाऱ्या वरचें प्रेम भ्रमाने आम्ही देहावर लादतो. या भ्रामक प्रेमाचा विषयहि देह नसून ‘प्रियोह्यात्मा’ जात्या प्रिय असणारी वस्तूच या प्रेमाचा विषय असतें. याप्रमाणे भ्रमांतून देखील त्याच्या अधिष्ठा नाचाच अनुभव येत असतो, भ्रमाच्या झरोक्यांतून आलेला सत्य प्रकाश समाधानकारक होत नसल्यामुळे मधले संकुचित क्षेत्र काढून टाकून समाधानाकरितां खऱ्या सत्याकडेच आपणांस वळावयास पाहिजे

‘प्रयोजन मनुद्दिश्य न मन्दोऽपि प्रवर्तते ।’ जगांत प्रयोजन दृष्टी म्हणून जर कोणची असेल तर ती सुखाचीच. ‘ यःकश्चित् सौख्य हे तोस्त्रि जगति यतते नैव दुःस्वस्थ हेतोः ।’ दुःखाकरता म्हणून प्रयत्न करणारा एखादासुद्धां या तीन लोकांतून सांपडणार नाही. कोणीही पहा! त्याचा सारा प्रयत्न सुखाकरतांच चाललेला असतो

सुखानुशायि रागः ।’ (योगसुत्र) ज्या वस्तुपासून आपल्या प्राप्त होते त्याच वस्तुवर प्रेम असते. जात्याच सुखरूप असणारी वस्तु जात्याच प्रिय असते. या विरुद्ध जात्याच अप्रिय असणारी वस्तु जात्याच दुःखरूप असतें. खऱ्या प्रितीचा विषय देह होत नाही असें ठरले की अप्रिय असणाऱ्या या देहाच्या प्राप्तिचा दुःख पर्यवसायी प्रयत्न कोणीच करणे शक्य नाही. कर्माप्रमाणेच मिळणे स्वाभाविक आहे. दुःखाच्या प्राप्तीकरता केलेला प्रयत्न सुखाचा होणार नाही. सुखाच्या इच्छेने दुःखाचीच प्राप्ति ज्या योगाने होते असा प्रयत्न जर आम्ही केला तर तो प्रयत्न अनाठायीं व भ्रामक होय. अशा या प्रयत्नाला प्रामाण्य येत नाही. ज्याला जो मार्ग, त्या मार्गानेचजावयाचे ठरविले असताहि जर चुकून दुसरा मार्ग लागला तरीही त्या दुसऱ्या मार्गानि अनुद्दिष्ट स्थळी जाण्याचे त्याच्या मनांत नसल्यामुळे अनुद्दिष्टस्थळी पोहोंच विणाऱ्या मार्गाचा प्रयत्न ज्ञानोत्तर तिथेच थांबवून योग्य मार्गा कडेच वळतो. एकंदरीत अप्रिय वस्तूच्या प्राप्तीचा प्रयत्न कोणीहि करीत नसल्यामुळे कर्माप्रमाणे फल मिळणे स्वाभाविक असल्यामुळे देहपरिग्रह असंभवनीय होईल. या देहाची प्रीती ज्या कर्माचे, फळ ते कर्महि पण संभवणार नाही कर्मच असंभवनीय तर त्याचा संस्कार संभवणार कोठून ? संस्काराच्या अभावी वासनाही पण उत्पन्न होणार नाही. देहेंद्रियांच्या अन्य पदार्थांशी संयोग होऊन लाभणारा विषयानुभव खऱ्या सुखाला झांकून आपल्याच मनोहरतेने दुःखाच्या कांहिलींत ढकलणारा म्हणून पटले की विषयानुभवाकरितांच असणारा हा देह आणि या स्थूल देहाला कारणीभूत होणारा लिंगदेह देखील कुचकामाचा ठरेल. अप्रिय असणारे प्रिय म्हणून दुःखरूप अणारे सुखरूप वाटाणे हे अज्ञाज्ञाचे कार्य अशारितीने सर्व अनर्थाला अज्ञानच हेतु झाले असता

हे अज्ञान आणि याचे स्थूल-सूक्ष्मदेहाचे कार्य त्या अवस्था, तो भोग ती जाणीव, तो संस्कार, त्याप्रमाणे वागणे हे सारेच भ्रामक, दुःख देणारे म्हणूनच त्याज्य ठरून याच्याकरिता प्रयत्न करणे कोणालाही स्वाभाविक होणार नाही; किंबहुना हे असंभवनीयच.

‘जगत्कारणमज्ञानमेकमेवं चिदन्वितम् । (स्वा. प्र.) अज्ञानच सर्व जगाला कारण सत्-चिन्मात्रस्थितीत अनेकत्वाचा नामरूपाचा उत्पत्तिनाशादिकाचा मुळी मागमूसहि नसतां आकाशांतील गंधर्व नगराप्रमाणे हे अज्ञानच या साऱ्या अशा लक्षणांनी युक्त असे, जग निर्माण करते. अप्रिय तें प्रिय, दुःख ते सुख, अपवित्र तें पवित्र किळसवाणें तें लोभनीय मिथ्या ते सत्य सारे हे अज्ञानामुळेच. खोट्या साक्षीदाराकडचा आरोपीहि जसा खोटा ठरतो त्याच प्रमाणे असंभवनीय भावनेचे जे हैं अज्ञान कारणें, तेहि पण ‘ही वंध्यापुत्राची आई’ म्हटल्याप्रमाणे असंभवनीय ठरते. केवल ज्ञान मात्र या अज्ञानाची उत्पति सूर्यमंडलात अंधाराच्या कल्पनेप्रमाणे मानावी तरी कशी ? पिंडाला कारण ब्रह्मांड, जिवाला कारण ईश, अविद्येला कारण माया या सर्वांचे अंतिम पर्यवसान म्हणजे नित्य निरुपाधिक अशा निरतिशय केवल सच्चिदानंद स्वरूपांत मलमांसादि आपल्या घटकावयवांनी अति तुच्छ असणाऱ्या या देहाची उत्पत्ति, याच्या ठिकाणी अभिमान, याची प्रीती, या दैहिक सुखापुडे ब्रह्मानंदसुद्धा तुच्छ होणे ! शिकस्त झाली !! मायादिकांचे असे हे झालेले अंतिम पर्यवसान पाहून कोणा विवे क्याला मायेपासून तें दैहिक सुखाच्या कल्पने पर्यंतचें हें सारे आद रणीय वाटेल ? जित्यपरिपूर्ण अशी अद्वितीय ब्रह्मांत कांही झाले म्हणून मानणे हाच मुळी भ्रम. इथूनच साऱ्या अनर्थपरंपरेची सुरवात. या सान्यांतून कोणचे बरे आदरणीय, प्रीतिपात्र आणि

खरेच सुखरूप असणार? सूर्यप्रकाशांत कोळसा पडलेला बघून सूर्यप्रकाशाचे ठिकाणी कोळशाच्या कृष्णवर्णाचा आरोप करता येईल का? या कोळशाच्या स्पर्शाने ज्यांत थोडेसुद्धा काळे झाले नाही आणि ज या कोळशाला प्रकाशित करते, तेंच सर्वथैव जसे याच्या भानाला कारण त्याचप्रमाणे या अज्ञानाचा संपर्क लाऊन न घेता आपल्या प्रकाशाने उजळत, जे याला प्रकाशित करते ते स्वयंप्रकाश स्वरूपच आपल्या भानाचा खरा विषय होय.

‘भानरूप आत्मा सर्वगतः । कोणचाहि पदार्थ भानामुळेच दिसतो. ज्या पदार्थाचे भान व्हावयाचे तो पदार्थ अथवा त्याची भावना ही मुळी शिरकत नाही. असे हैं केवळ भानच सुखपदार्थाच्या भावनेनंतर येणारी सुखाची भावना म्हणजे आरशांत पडलेल्या प्रतिबिंबाप्रमाणेच आरसा नसतांना प्रतिबिंबहि नाहिसें होते, पण ज्याचे ते प्रतिबिंब ते मुख मात्र जसेच्या तसेंच असतें. तें या प्रतिबिंबा पूर्वीचेच पदार्थात ज्या सुखाचे प्रतिबिंब त्याच्या भावनेच्यारूपानी दिसून येते ते सुख, पदार्थ आणि सुखाची भावना दोन्हींहि नाहिसे झाल्यानंतर जसेच्या तसेच उरते, ते या पूर्वीचेच. पदार्थ भावानेच्या पुर्वीचे जें केवल ज्ञानात्माकभान तँच हे पदार्थाच्या सुखाची भावना पदार्थसगट नाहिशी झाल्यानंतर त्याच्यात्रिकालाबाधित अस्तित्वाने सर्व भावना आणि पदार्थ दिसून येतात त्यामुळे पदार्थात दिसून येणारें अस्तित्व तें याचेच हे स्पष्ट होते. या दृष्टीने ज्याच्यापासून आपल्याला खरें सुख लाभतें तो प्रीति पात्र वस्तु जगांत कोणची बरें आहे? देह हा प्रीति पात्र नव्हें असें ठरल्यानंतर, असे कोणचें या देहांत आहे की ज्याच्यामुळे या गलिच्छ निद्य देहावरहि आम्हीं प्रेम करतो! ज्याच्यामुळे हे सारें प्रीतिपात्र आणि सुख रूप नसतांनाहि सुखरूप आणि प्रीतिपात्र वाटते तेच खरें सुख रूप आणि प्रीतिपात्र. ज्याच्यावर आपली प्रीति असते त्याचेंच ध्यान अखंड असते. सुखाशिवाय ज्ञानांत आणि या आमच्या ध्यानांत दुसरे असें कांहींच अखंड असू शकत नाहीं. अखंड असणारे भान म्हणजे ते दुसऱ्यांचे नसून आपलेच. पिड ब्रह्मांड सुख नव्हे म्हणून यांत ज्याच्यामुळे सुखाची भावना होते त्या खऱ्या सुखाच्या शोधार्थ पिंडब्रह्मांड आणि त्याची भावना नाहिशी करून तेंच सुख आपल्या अखंड भावनेनें ताडून बघू लागलो म्हणजे तें स्वयंप्रकाशित सुख वेगळे नसून आपणच आहोत. असे सर्व अन्य निराकारणानें उरलेल्या त्या केवल निर्विकल्प ज्ञानस्वरूप उरतें असें ठरलें कीं या ठिकाणी भिन्नता उरत नसल्यामुळे, शेवटी सर्व भानशून्य असे केवळ चित्सुखस्वरूपीं आपणच प्रियतम ठरून या पिडब्रह्मांडांत दिसून येणाऱ्या प्रीतिचा विषय होऊं. याप्रमाणे देहात्मबुद्धी जाऊन दैहिक सुखाच्या ठिकाणी पूर्ण वैराग्य वाणून हें सारें दृश्य ओसरून आपल्या अस्तित्वाच्या स्मृतिरूप अशा ‘मी’ या भानांतून या प्रमाणे पिडब्रह्मांडाचीहि बोळवण झाल्यानंतर जेव्हां त्या ‘मी’ या आपल्या भानांत ‘ब्रह्मच मी’ हा निश्चय प्रकाशूं लागतो तेंव्हा हीच ईश्वराची उपाधी वनते .

हैं जग सारें जीवाच्या देहसौंख्याकरतांच. देहाच्या अध्यासामुळे या जगाचें प्रयोजन. ‘जड देहच मी’ म्हणून हा जीव समजतो. ‘ अविद्येने अविद्या देखिली । म्हणोनी गोष्टी विश्वासली || ‘ त्यामुळे देहाप्रमाणेच जड असणाऱ्या या जगाचे भान जिवास होते. आपलेंच भान आपल्याला जडच आपण बनल्यानंतर आपलेच भान आपल्याला. जडच आपण वनल्यानंतर आपलेच भान, पण तें जरूपाकडून म्हणजे या जगांकडून आपले पोषण झाल्यासारखे वाटते. आपल्या जीवनार्थ जगाची आवश्यकता भासू लागते. जगांत असणारे सारे भोग्य पदार्थ आपल्याला उपलब्ध झाले म्हणजे आपण पूर्णसुखी असे वाटू लागते. आपण चिन्मात्र आहों. देहांत मी म्हणून भासणाऱ्या या स्फूर्तीची, ब्रह्मांडांत मी म्हणून भास णारें विलक्षणत्व पटून ब्रह्मांडास भांसविणारे ‘ मी ‘चे देहाहून

असणारे विलक्षणत्व पटून ब्रह्मांडास भासविणारे आपण पिंड ब्रह्मांडरहित आत्मस्वरूपच या निश्चयाचा अनुभव येऊ लागतो. याला ‘देह मी’ ही कल्पना शिवत देखील नाही. देहसौख्याची भावना चुकूनसुद्धा याच्या वाट्याला जात नाही. जीवकोटींतून हा पार पडला. हा जीवभाव म्हणजे देह मी म्हणून आपण करू घेतलेली मिथ्या भावनाच.

home-last-sec-img