Literature

विषय विवेचन ६

जेथें परमात्मस्वरूप भासत नाही अशा निबिड अंध:काराने भरलेलें, असुरांना प्राप्त होणारे कष्टप्रद असे अति नीच अज्ञाना मकअसूर्यानांवाचे लोक आहेत. जितके म्हणून आत्मघातकी तितके सारे मरणानंतर या लोकांना जातात, असें श्रुति सांगते. लोक कोणचे बरे असावेत ? ज्ञानेविण प्राणियांसी जन्म मत्यु लक्ष चौन्यांशी तितुक्या आत्महत्या त्यासी म्हणोल आत्महत्यारा ‘ (दास २४) हे अनेक लोक म्हणजे अनेक जामच. श्रीमत् आचार्याचेहि याला प्रमाण आहे. लोकाः कर्म फलानि लोक्यन्ते दृश्यन्ते भुज्यन्त इति जन्मांति। (शांकर भाष्य) जन्म म्हणजेच लोक असें झालें तरअन्धेन तम सा आवृताः हे विशेषण त्यांना कसे लागू पडतें तें पाहूं. प्रकाश म्हणून समजून येणारा अंधःकार. असा हा अंधःकार स्वतःला आणि दुसऱ्याला मुळीच प्रकाशुं शकत नाही. जे दुसऱ्याला आणि स्वतःला प्रकाशू शकत नाहीं तें जड असते. अंधःकार आणि जड हे या दृष्टीने दोन नसून एकच, हे स्पष्ट झाले की जन्म म्हणजे गाढांध:काराने भरलेला असतो त्यामुळेअन्धेन तमसा आवृताः हे विशेषण ज्यांचे ते लोक म्हणजे जन्मच हे सहज सिद्ध होईल. जन्म झाल्यानंतरच दृश्याचा संबंध. देहहि दृश्य देहाकडून चक्षुरादिद्वारा जाणले किंवा अनुभविले जाणारेंहि पण दृश्यच. हे जड असते जड, भानामुळेच भासतें. मन, बुध्यादि सर्व जितके म्हणून झालेल्यांत आले ते सारे ज्ञानानेच भासत असल्यामुळे, हे कार्य स्वतः दुसऱ्याला प्रकाशित नसल्यामुळे, ज्ञानच स्वप्रकाशरूप असल्यामुळे तद्विरुद्ध हे दृश्य आपल्या जड त्वामुळे गाढांधःकाररूपचं हे स्पष्ट आहे

तमो हि शारीरप्रपञ्चमाबह्मस्थावरान्तमनन्ताखिला जाण्ड भूतम् ‘ (महावाक्यो .

जन्मानंतरच अवस्थात्रय. स्पष्ट दृश्याचे भान जागृतस्वप्नां तच असते. या जागृतस्वप्नाची उत्पत्ति सुषुप्तीपासूनच. सुषुप्ति ही अवस्था म्हणजे काही समजले नाही.’ या अनुभवाचे कारण. कांहीं समजणे आवरणात्मकच. आवरण वस्तु दिसू देत नाही. प्रकाशामुळे जर वस्तु भासते तर ज्या योगाने काही भासत नाहीं तें प्रकाशाहून वेगळे म्हणजे गाढांधःकारच. अशाप्रकारे सुषुप्ति ही आवरणात्मक अथवा गाढांधःकारात्मक झाली. नाम रूपात्मक दृश्य ज्या अवस्थेत असतें तें जागृतस्वप्न या सुषुप्ती अवस्थेपासूनच उपत्र होत असल्यामुळे हेहि अंध:कारमयच, हे स्पष्ट आहे. भासकामुळेच जे भासतें, भासकाची ओळख पटण्याला ज्याचा उपयोग होत नाही, ज्याला पहात असतांना याचे प्रकाशक असणारे ज्ञान समजून येत नाही, त्यालाचजडम्हणतात. हाच अंधःकार. जागृतस्वप्नांतच दृश्याचे भान होते. दृश्यालाच जन्म, म्हणून दृश्याचे भानच जन्म. तेव्हां भानाकडून भासलें जाणारे जन्म भानाहून वेगळे. भान भासक. भासकच प्रकाश. भासले गेलेलें तद्विरुद्ध. तद्विरुद्ध म्हणजे अंधःकार. तेव्हां जन्म म्हणजे गाढांधःकारच. ‘ती गोष्ट अजून उजेडात आली नाही असे म्हणणे म्हणजे ती अंधारांत आहे असे सांगणे. अंधारात आहे म्हणजे समजली नाही. या बोलण्याच्या प्रघाताने देखील दृश्यांत याला उजळणारे ज्ञान समजून येत नसल्यामुळे, दृश्याचाच  अनुभव साऱ्या जन्मांतून होत असल्यामुळे जन्म आणि हे जन्म ज्या लोकांतून होतात ते लोक देखील, यामुळे ज्ञान हे उजेडांत येत नसल्यामुळे म्हणजे समजून येत नसल्यामुळे या अंधारांत तें आहे हे स्पष्ट झाले की लोक आणि जन्म गाढांधाकाररूप कसें हें सहज उलगडेल. जेथे डोळयांत बोट घातले तरी दिसत नाही तो गाढांधःकार, या ठिकाणी डोळे फोडले तरी ज्ञान दिसत नाही. मग हा अंधःकार किती दाट असला पाहिजे !!  

इहेंव सन्तोऽथ विद्मस्तद्वयं चेदवेदीर्महती विनष्टिः ये तद्विदुर मृतास्ते भवन्त्यथेतरे दुःखमेवापियन्ति ‘ 

(बृह. १४) येथेंच या जन्मींच जर आम्हीं तें ब्रह्म आत्मस्वरूपाने जाणले तर मागच्या भाग्याला पारावार नाही. किती धन्य होऊ! येथेंच जर का आम्ही ते जाणलें नाहीं तर मात्र आपला सांगता येणार नाही इतका तोटा होणार आहे. सुषुप्तीच्या अनुभवाने त्या वेळेला काही दिसत नसल्यामुळे सर्व भेद, सर्व वासना, सर्व देह, सर्व दृश्य आणि तसेंच सारे हे वृत्तीचे चांचल्य मिथ्या म्हणून या 

सर्वांचा सुषुप्तीच्या शून्य स्थितीत करून तेथे हे काही समजेनासें झाल्यानंतर स्वप्रकाशाने अद्वितीय असणारे ज्ञानच मीया. भानातून व यामुळे होणाऱ्या साऱ्या अनुभवांतून उरवून सर्व भेदशून्य, सर्वावभासक व स्वतःपूर्ण असा या ज्ञानरूपाने मीच तें अद्वय स्वरूप म्हणून ज्यानी स्वतःला जाणले ते अविनाशी अशा त्या सुखाशी तादात्म्य पावून दुःखःरूप अशा या जन्म-मरण प्रवाहांतून कायमची सुटका करून घेतात. दुःखाचा येथे अगदी पूर्ण शेवट झालेला असतो. यांची अशी स्थिती झाली पण ते निराश्रित विचारें दुःख जाईल कोठे ? काय त्याची अवस्था कोण जाणे?’ त्या दयाळू परमेश्वराने त्याची पण तरतूद करून ठेवली आहे. काळजी नको. जें कां आपलें असें हें स्वरूप जाणून भेदभास घालवून ब्रह्मास्थितीने अद्वय असें उरत नाही, त्या या, दुःख निराश्रित होऊ नये म्हणून अनेक वासनेने आपल्याला वेढून घेऊन भेददृष्टीने कष्टत असलेल्या उदार आश्रयदात्याकडे दुःखाने सहकुटुंब जावें व तेथें खुशाल पुत्र-पौत्र-प्रपौत्रांच्या अफाट विस्तारानिशी निर्धास्त नांदावे. त्यांना त्यांच्याकडे काही कशा चीही वाण पडणार नाही. जगांत दुःखाच्या संरक्षणार्थच यांचा अवतार आणि त्यांचे अनेक प्रकारांनी पालन करणे हेच यांचें अवतार कार्य. मी कोण ऐसा हेत। धरून पाहतां देहातीत । अव लोकिता नेमस्त । स्वरूपचि होये॥‘ (दास. ५।६।२१) सांग नरदेह जोडलें । आणि परमार्थबुद्धि विसरलें । तें मूखें कैसे भ्रमलें । मायाजाळी ॥‘ (दास. १।१०।२३) अपूर्वता या परमार्थाची । वार्ता नाही जन्ममृत्याची । आणि पदवी सायोज्यतेची। सन्निधचि लाभे॥‘ (दास. १।९।१३)  

‘ब्रह्मस्थित बाणतां अंतरीं। संदेह गेला ब्रह्मांडाबाहेरी। दृश्याची जुनी जर्जरी। कुहीट झाली॥‘ (दास. १।९।१७) दृष्टीस दिसे मनास भासे । तितुके काळांतरी नासे। म्हणोनि दृश्यातीत असे । परब्रह्म ॥‘ (दास. ६।८।४७) सकळ साधनांचे फळ । ज्ञानाची सीगचि केवळ । जेणे 

संशयाचे मूळ । निशेष तुटे॥‘ (दास. ५।६।३०) । आत्मा निर्गुण निरंजन। तयासी असावें अनन्य । अनन्य म्हणजे नाही अन्य । आपण कैचा तेथें ॥ (दास. ४।९।१७) । आत्मा म्हणजे तो अद्वैत । जेथें नाहीं द्वैताद्वैत। तेथे मीपणाचा हेत । उरेल कैचा॥‘ (दास. ४।९।१८) —आत्मा पूर्णत्वे परिपूर्ण । जेथे नाही गुणागुण । निखळ 

निर्गुणी आपण । कोण कैचा॥‘ (दास ४।९।१९) त्वंपद तत्पद असिपद । निरसुनी सकळ भेदाभेद । वस्तु 

ठायींची अभेद । आपण कैचा॥‘ (दास४।९।२०) पशुदेही नाही गती। ऐसे सर्वत्र बोलती। म्हणौन नरदेहींच प्राप्ती। परलोकाची।।‘(१-१०-२१) । म्हणोनि नरदेह श्रेष्ठ । नाना देहामध्ये वरिष्ठ । जयाचेनि चुके आरिष्ट । यमयातनेचे॥‘ (१।१०।२४) या नरदेहाचेनि संबंधे । बहुत पावले उत्तमपदें । अहंता सांडूनि स्वानंदें। सुखी झाले॥‘ (दा. १-१०-१९) । देह मी वाटे नरा । तो जाणावा आत्महत्यारा॥ देहाभिमाने येरझारा । भोगिल्याच भोगी।‘ (दास ५-६-५५)

म्हणोनि देहबुद्धि हे झडे । तरीच परमार्थ घडे । देहबुद्धीने विवडे । ऐक्यता ब्रह्मीची॥‘ 

(दास. ७-२-३९) जेणे करितां दुःख झालें । तेंचि मनी दृढ धरिलें। तेणे गुणे प्राप्त झालें। पुन्हां दुःख ॥‘ (दास ५-३-१००) इह चेदवेदीदय सत्यमस्ति न चेदिहावेदीन्महती विनष्टिः। भूतेष भूतेषु विचित्य धीराः प्रेत्यास्माल्लोकादमृता भवन्ति ॥‘ (केनो. २-१३-५) 

– या परमार्थसाधनभूत अशा नरदेहांत जर ब्रह्मात्मैक्य जाणले तर आपले हित खरें साधलें असें होईल. जर कां जाणले नाही तर मात्र आपला मोठाच तोटा होणार आहे हे निश्चित. या जगात प्रत्येक प्राणी पदार्थातून असणारे निरूपाधिक सत्य मी म्हणून जे जाणतात त्यांच्या ठिकाणी पिंडब्रह्मांडातून दिसून येणारे जातिगुण, क्रियाधर्म नामरूपादि सर्व भाव मावळून, या सर्वाहून वेगळी, सर्वभेद विवर्जित अशी ज्ञानमात्र अद्वितीय दृष्टी उरते, रागद्वेषयुक्त अहं ममत्वानी व अनेक तुच्छ विषयवासनेनी गजबजलेल्या अनेकानर्थ परंपरेच्या या लोकांतून त्यानी आपलें नांव काढून टाकलेले असते. अविनाशी अशा दिव्य आनंदाशी ते एकरूप असतात. अशाप्रमाणे साधारण एकाच अर्थाच्या दोन श्रुतींचा अर्थ आपण पाहिला तिसरी एक याच अर्थाची श्रुति आठवली. पुनरूक्तीकडे दृष्टी न देतां विषयाच्या दृढीकरणार्थ त्या श्रुतीचाहि अर्थ पाहूं ! 

ब्रह्म आनंदस्वरूप आहे. आनन्दो ब्रह्म ! ‘ (ते. भृ. ६) आनंदाची प्राप्ती वेगळे राहून होणे शक्य नसल्यामुळेआनंदाशी मिळून समरसून जाणे म्हणजे आनंदाची प्राप्ती होणे. आनंदातून थोडे जरी आपण उरूं तर आनंदाहून वेगळे म्हणजे दु.खरूपी आपण होऊ. हे अनिष्ट असल्यामळे स्वभावविरुद्ध इच्छा होणे शक्य नसल्यामुळे सुखाची इच्छा ज्या अर्थी होते त्या अर्थी स्वमात्र सुखाहून वेगळे राहून ती पूर्ण होणे शक्य नाही. सुखाची इच्छा सुखच होण्याने पूर्ण होते. सुखाला कशाचीहि इच्छा होणे शक्य नाही. इच्छा हीच दुःखाची जाणीव आहे. दुःख नसेल तर सुखाची इच्छा होणे शक्य नाही म्हणून इच्छेत दिसून येणारा दुःखाचा अनुभव समूळ नष्ट व्हावयाचा झाल्यास आपल्याला आपल्याच प्रकाशाने उजळत असणारे इतर म्हणून ज्या ठिकाणी काहींच नाही असे ते अद्वय आनंदरूपच व्हावयास पाहिजे. । अनन्दा नाम ते लोका अन्धेन तमसाऽऽवृताः । ता स्ते प्रेत्याभिगच्छन्त्यविद्वा सोऽबुधो जनाः ।। (ब्रह. ४।४।११) 

हे न जाणणारे म्हणजे श्रुतीहृदय न ओळखणारे ते अविद्वान. खरे सुख न ओळखता, त्याच्या प्राप्तीकरतां प्रयत्न न करतां, खडीसाखर म्हणून सोमलविष तोंडात धरणाऱ्याप्रमाणे अमृत, जड, दुःखात्मक अशा विषयांकरतांच लाळ घोटणारे म्हणन मर्ख. असे हे देहपातानंतर ‘कर्माप्रमाणे गतिया न्यायाने ज्या ठिकाणी आनंद मुळीच नसतो अशा त्या अनंदाहे अन्वर्थक नांव धारण करणाऱ्या गाढांधःकाररूपी अज्ञानानें व्याप्त असणाऱ्या दुःखरूप लोकाला जातात. तेथे त्यांना अनुभवावयास दुसरे काय असणार ? तेथे दुःखच अनुभवितात. त्या त्या लोकी जाणे म्हणजे त्या त्या लोकी जन्म घेणे. जन्म म्हणजे लोकांतराची प्राप्ती. लोकांतराची प्राप्ती म्हणजेच जन्म. दोन्ही एकच. कोणच्या लोकांत होईना एकदां का जन्म झाला की झालें, मन दृश्यच भावितें, इंद्रियें दृश्योन्मुखच होतात. जाणिवेचा सारा विषय म्हणजे दृश्यच, होऊन राहातो. विषयसुखाची अजपा सुरू होते. देहाभिमान तर जन्मा बरोबरच सिद्ध असतो. परमात्मपदाच्या पूर्ण विस्मृतींतली नांदणुक म्हणजेच जन्म. जन्मांधाला येणाऱ्या सौंदर्याच्या कल्पनेप्रमाणेच येथें परमात्मज्ञान निजबोधसूर्याच्या अस्ताने पडलेली पूर्ण काळोखी म्हणजेच जन्म. 

(बृह. ४ ।४। ११) जन्म जीवाचे मीपण । जन्म अहंतेचा गुण । जन्म हेचि विस्मरण।  ईश्वराचे ।। (दास. ३।१।८) 

‘जन्म विषयांची आवडी । जन्म दुराशेची बेडी । जन्म काळाची कांकडी। भक्षिता हे ॥ ९ ॥ 

जन्म हाचि विषमकाळ जन्म हेचि वोरवटी वेळ। जन्म हा अति कुश्चळ । नर्क पतन ॥१०॥

 ‘जन्म सुखाचा विसर। जन्म चिंतेचा आगर। जन्म वासना विस्तारला ॥ (दास. ३।१।५) 

जन्म जीवाची अवदसा । जन्म कल्पनेचा ठसा। जन्म लांबेचा वळसा । ममतारूप ॥(दास. ३।१।६)

‘जन्म कुविद्येचे फळ । जन्म लोभाचें कमळ । जन्म भ्रांतीचे पडळ । ज्ञानहीन ॥‘ (दास. ३।११३)

 ‘जन्म दु:खाचा अंकुर । जन्म शोकाचा सागर । जन्म भयाचा डोंगर । चळेना ऐसा ॥ (दास. ३।१।१) 

जन्म कर्माची आंटणी। जन्म पातकाची खाणी । जन्म काळाची जाचणी । निच नवी ।। (दास. ३।१।२) इत्यादि ओव्यांनी श्रीसमर्थांनी तिस-या दशकातल्या पहिल्या समासातून या जन्माचे इत्यंभूत जातक वर्तविलें आहे ते पहावें. योनि मन्ये प्रपद्यन्ते शरीरत्वाय देहिनः । स्थाणुमन्ये ऽ नुसंयान्ति 

यथाकर्म यथाश्रुतम् ॥ (कठ२।२।७) आत्मज्ञान होन असे काही जोव आपल्या कर्माप्रमाणे व संपादिलेल्या ज्ञानाप्रमाणे म्हणजे सुखाच्या भावनेप्रमाणे वास नारुप  देहधारण करण्याकरतां त्या देहाला अनुरूप अशा योनीत कार्यातून प्रवेशितात व इतर कांही अधम, मरणानंतर आपल्या पापाप्रमाणे वृक्षादि स्थावर योनीस प्राप्त होतात. अथ प्रज्ञंहि संभव: । या श्रुतीचा अर्थही असाच आहे. 

यच्चित्तस्तेनैव प्राणमायाति प्राणस्तेजसा युक्तः । |सहाऽऽत्मना यथासंकल्पितं लोकं नयति ॥ (प्रश्नो. ३।१०) 

मरणकाळी कर्माप्रमाणे वासना उत्पन्न होते व त्याला अनु रूप असें चिंतन घडते. त्या चिंतनासरसी जीव इंद्रियादिसहित स्वतः प्राणाचा आश्रय करतो. या वेळेला मन इंद्रियांचा व्यापार बंद पडून मुख्य प्राणवृत्तीनेच जीव असतो. इकडचे कांही भान नाही, पण अजून श्वास चालला आहे असे याच स्थितीत परणोन्मुख असणाऱ्या माणसाला बघून इतर म्हणतात. पुढे हा प्राण त्या भोक्त्यासह त्याच्या सबंध वासनेनिशी आपल्या उदानरूपाने देहाच्या बाहेर पडतो व याच्या पुण्य-पाप-कर्माप्रमाणे याला ज्या लोकाची वासना उत्पन्न होते, ज्या लोकांचा संकल्प घडतो त्या लोकी पोहोंचवितो अथैकयोर्ध्व उदान : पुण्येन पुण्यं लोकनयति पापेन पापमुभाभ्यामेव 

मनुष्यलोकम ।‘ (प्रश्नो. ३७) हा उदान सुकृत जर असेल तर पुण्यफल ज्या लोकांतून मिळते अशा त्या लोकाला म्हणजे स्वर्गादि लोकाला नेतो. पाप असेल तर पापाचे फल ज्या लोकांतून मिळते अशा त्या लोकाला म्हणजे नरकाला पोंचवितो. पाप पुण्य सारखे असले तर मात्र तो उदान या जीवाला या मनुष्य लोकांत आणून सोडतो, म्हणजे मनुष्यजन्म येतो. इतर पशुपक्षादि योनि म्हणजे एक प्रकारचा नरकच. पाप पुण्य समता घडे । तरीच नरदेहे जोडे । येरवी हा जन्म न घडे । हे व्यासवचन भागवती ।। (दास. ८।७।२१) पापपुण्यं समं कृत्वा नरयोनिषु जायते ॥‘ ‘कामान्यः कामयते मन्यमान : कामभिर्जायते तत्र तत्र । पर्याप्त कामस्य कृतात्मनस्विहैव सर्वे प्रविलीयन्ति कामाः ॥‘ (मुंड ।३।२।२) 

ज्या ज्या लोकांच्या सुखाची कल्पना बाळगून त्याच्या इच्छेने त्याच्या प्राप्तीकरतां कर्म करतो व त्या त्या लोकीं तें कर्मफल अनुभविण्याकरिता तो अज्ञानी जीव जन्म घेतो. सर्व दृश्य पदार्थांतून व्यापून असणारे सुख ते स्वतःचेच असे समजन येऊन इंद्रियमनबुद्धयादिकांना उजळणाऱ्या आपल्या स्वप्रकाश अशा अद्वितीय सर्वकारण सुखस्वरूपाने चोहीकडचे सुख जो आपल्यांतच अनुभवितो त्याला कोणच्या लोकी सुखाच्या प्राप्त्यर्थ जन्म घ्यावा लागणार ? अशा कृतकृत्य व पूर्णकाम मनुष्याच्या सर्व इच्छा या लोकीच त्याच्या प्रकृत देहांतच पूर्ण होतात. मिठाचे अनेक कण आपल्या आर्द्रतेनिशी जसें समुद्रांत मिळून एकरूप होतात. या प्रमाणे अनेक ब्रह्मांडे आपल्यांत असणा-या सुखानिशी याच्या स्वानंदमहोदधींत मिळून आपल्या नावाचा ठाव पूसून टाकतात. तोच तो उरतो. काममयं एवायं पुरुष इति। सयथा कामो भवति तत्क्रतुभवति यत्क्रतुर्भवति तत्कर्म कुरुते यत्कर्म कुरुते तदभिसम्पद्यते ।। (बृह. ४।४।५) अथ खलु क्रतुमय: पुरुषोयथाक्रतुरस्मिल्लोके पुरुषो भवति तथेतः प्रेत्य भवति स क्रतुं कुर्वीत ॥(छांदो. ३।४।१)  

जीव हा वासनामय असतो. संस्काराप्रमाणे त्याचा निश्चय बनतो. आपल्या निश्चयाप्रमाणे तो कर्म करतो. या लोकांत त्याचा जसा निश्चय असतो त्या निश्चयानींच मरणोत्तरहि तो असतो. वासनेप्रमाणे बनणारा हा पुरुष आहे. संस्काराप्रमाणे वासना, वासनेप्रमाणे इच्छा, इच्छेने त्याचाच निश्चय. निश्चयाने कर्म पडते. कर्माप्रमाणे फलाची प्राप्ती होते. ज्याला त्या कर्म फलाचा निश्चय झालेला असतो तो तद्रूप बनतो म्हणजे जन्मल्यानंतर तो देहच मीअसे मानतो. वासनेप्रमाणेच जन्म घेतो म्हणजे तद्रूप बनतो. आत्मज्ञानाने पूर्ण सुखाचा लाभ होतो. निश्चया प्रमाणे जर बनतां येते तर आत्मनिश्चयाने शाश्वतानंद रूपच कां होऊ नये? निरतिशयसुखप्राप्त्यर्थ आत्मनिश्चयच प्राणिमात्रांनी करावा; म्हणून श्रुतीचे सांगणे आहे. 

ऐक शिष्या सावधान । आतां मी भविष्य सांगेन । जया पुरुषासी जे ध्यान । तयासि तेंचि प्राप्त ॥‘ (दास. ५।६।६३) म्हणोनो जे अविद्या। सांडून धरावी सुविद्या । तेणें गुणे जगवंद्या। पाविजे शीघ्र। (दास. ५।६।६४) या ओव्यांतून देखील हाच आशय प्रगट झाला आहे. श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छद्धः स एव सः ।‘ (भा गो. १७१३) या भगवद्गीतेच्या श्लोकार्धा तून सुद्धां हाच अर्थ ध्वनीत होतो.

home-last-sec-img