Literature

वेदवेद्य परमात्मा

नावेदविन्मनुते तं बृहन्तम् । (प.प्रा.) ते विशाल बृहत्तत्व वेदाच्या परिज्ञानाशिवाय कोणी जाणू शकत नाही. वेदमताचा कोणताहि आस्तिक ग्रंथ, आपल्या आधाराकडे पैदाकडे बोट दाखवून वैदिक म्हणवितो. परमात्म तत्व समजावून सांगणाराच वेद होय. सृष्टीपूर्वी असणाऱ्या परमात्म्याला आपले तत्त्व समजावून सांगावयाचे झाल्यास, सगुण रूप धारण करून आपल्या श्रीमुखानेच सांगावें लागणार. एरवी दुसऱ्या कोणास ते जाणणे शक्य आहे! या दृष्टानेहि निजरूप व त्याच्या प्राप्तीकरितां असणारी साधने, सर्वप्रथम असणाऱ्या लोकांना परमात्म्याने ज्या वाणीने सांगितली त्या त्याच्या वाणीलाच वाग्विवृत्ताश्च वेदाः । वेद असे म्हणतात.

home-last-sec-img