Literature

वेदांचें कर्तृत्व कोणाकडे ?

यामृषयो मंत्रकृतो मनीषिणः । अन्वैच्छन्देवास्तपसा श्रमेण । 

तां देवीं वाच हविषा यजामहे ॥ (तै. ब्रा.)

– दिव्य भूमिकेच्या बुद्धिमान ऋषींनी बहु श्रम सोसून, तपार्ने जिचा साक्षात्कार करून घेतला आणि जे मंत्रकर्ते झाले, त्या वाग्देवतेस हव्य पदार्थांनी आम्ही तृप्त करूं या, असा या मंत्राचा भावार्थ आहे. पूर्वकृत विधानावर हा मंत्र बराच प्रकाश पाढतो.

युगांतेऽन्तर्हितान्वेदान्सेतिहासान्महर्षयः । 

लेभिरे तपसा पूर्वमनुज्ञाताः स्वयंभुवा ॥

या श्लोकांतूनहि तोच अर्थ बाहेर पडतो. युगांत्यसमयीं मूळस्वरूपांत विलीन झालेले इतिहासासहित वेद ब्रह्मदेवाच्या आज्ञेनें ऋषींनी तप करून पूर्वकाली मिळविले. ‘मंत्रकृतः  – ‘ मंत्रकर्ते ऋषी’ या शब्दाचा अर्थ इथे कळून येतो. श्रुतिस्मृतींच्या या प्रमाणावरून म्हणजे ऋषीमुनींनी तपोबलाने प्राप्त करून घेतलेल्या परमात्मकृपेनें वेद मिळविले, हें सिद्ध होतें. जें परमात्म कृपेनें ( मिळतें ) लाभतें, त्याचे सर्वथैव मूळकारण परमात्माच असणार. तेव्हां

वेद या दृष्टीनें अपौरुषेय म्हटले जातात. या व इतर कोणत्याहि दृष्टीनें, वेद हें मनुष्य-जनित बाङ्मय होऊं शकत नाहीं, वेदांचे कर्तृत्व ऋषींकडे येत नाहीं. ऋषी हे वेदद्रष्टे व मंत्रपति आहेत, म्हणूनहि म्हटले जाते. यावरूनहि बेदकर्ते ऋषी नव्हेत हैं स्पष्ट होते. आपल्या अंतःकरणांतून आपोआप प्रगट होत असलेल्या वेदांना ऋषींनी अवलोकिलें, स्फुरण पावत असलेल्या वेदांना ऋषींनी बघितलें. स्फुरण होणें ही क्रिया मनुष्याची नव्हे; ती अतर्क्य परमात्म्याकडेच बोट दाखविते. त्यांत सांठविलेलें ज्ञानहि पण सर्वज्ञ परमात्म्याचेच हे सिद्ध होतें. तें ज्ञान त्या मनुष्याचे असें म्हणतां येत नाहीं. अपूर्व वेदमंत्र ऋषींच्या तोंडांतून बाहेर पडत असतांना बघून, इतर लोक त्या ऋषींनाच वेदमंत्रकर्ते आणि वेदद्रष्टे म्हणू लागले. पण स्फुरलें तेंच बघितलें या घटनेनुसार वेदांचें भूल कारणत्व असें एक परमात्म्याकडेच येतें. असें “ नम ऋषिभ्यो मंत्रकृद्भ्यो मंत्रपतिभ्यः ॥ ” (तै. बा. ४) या मंत्राचे तात्पर्य ‘ पातति पतिः ।’ अध्य यन-अध्यापनांनी वेदांचें ऋषींकडूनच रक्षण झालें, या अर्थी ऋषींना मंत्रपति म्हणून म्हटले जाते. हीच परंपरा ऋषिपुत्र ब्राह्मणांनी आजपर्यंत चालवीत आणली आहे.

वेदमेव सदाभ्यस्येत्तपस्तप्स्यन्द्विजोत्तमः ।

वेदाभ्यासो हि विप्रस्य तपः परमिहोच्यते ॥ (म. स्मृ. २ | १६६) 

ब्राह्मणस्य तपो ज्ञानं तपः क्षत्रस्य रक्षणम् । 

वैश्यस्य तु तपो वार्ता तपः शूद्रस्य सेवनम् ॥ ( ११।२३५)

–ब्राह्मणांचें तप म्हणजे वेदाभ्यास, क्षत्रियांचें तप प्रजारक्षण, वैश्यांचे तप व्यापार व शूद्रांचे तप सेवा, असा विभाग झाल्यामुळेच अद्याप वेद टिकून आहेत. एकाकडे अथवा एका वर्गाकडे ती जबाबदारी घातल्याशिवाय, तें कार्य व्यवस्थित होत नाहीं, कोणीहि अभिमानाने झटून ते काम करीत नाहीं. त्या त्या करितांच तशातशांची तिथे तिथे निवड झाली म्हणजे, ते ते आपुलकीनें, प्रेमानें व धर्मबुद्धनें तें तें काम करतात. ही कर्तव्यपर धर्मबुद्धि कां एकदां विस्कळीत झाली म्हणजे सर्व समाज ढासळतो हे ओघानें आम्हांस समजून घ्यावयास पाहिजे. पूर्वीच्या काळच्या ऋषींच्याकडून हे रचले गेले, या दृष्टीने मनुष्यकृतिं म्हणून, आधुनिक समाजाचें थोडें वेदाकडे दुर्लक्ष होत आहे.

वेद हे अपौरुषेय आहेत, हें युक्तीनेंहि आपल्याला समजून घेता येईल. या लोकांचे ज्ञान, कांही प्रमाणांत का होईना, प्रयत्नानें मनुष्यांना करून घेणें साध्य आहे, असे गृहीत धरून चाललें तरी मरणोत्तरच्या अलौकिक ज्ञाना संबंधाने मात्र मनुष्याचे प्रयत्न कांहीं करूं शकत नाहीत, ते सर्वचैत्र निकामी ठरतात, हे मानावेंच लागतें. मरणोत्तरचें व परलोकाचे ज्ञान मनुष्याला नाही व त्याचे ज्ञानहि त्याला केवळ प्रयत्नसाध्य ऐहिक पदार्थाच्या ज्ञानाप्रमाणे, सहज करून घेतां येणेंहि पण शक्य नाही. सृष्टिनियंत्या व निर्माणकर्त्या परमेश्वरालाच तें एक ठाऊक असणे शक्य आहे. मानवी बुद्धीच्या आटोक्याबाहेरचे यथास्थित सांगणारा, एक सर्वज्ञ परमेश्वरच सर्वतोपरि समर्थ आहे. अलौकिक सुखाची कल्पना आणून देणारा, त्याचे साधन सांगणारा व त्या त्या कर्माचे अमुक म्हणून अचूक फळ देणारा, सर्वश्रेष्ठ सुखाचा परिचय करून देऊन, त्याचे साधन शिकवून त्याची त्या प्रयत्नानें प्राप्ति करवून देणारा, आपलें यथार्थ ज्ञान करून देऊन, स्वांशभूत जीवांना मोक्ष म्हणजे निजैक्य प्राप्त करून देणारा, एक परमेश्वरच होय. हे सर्वहि मानवी कक्षेच्या सर्वथैव बाहेरचे ठरते. वेदांमध्ये हे सर्व असल्यामुळे, वेद हे अपौरुषेय म्हणजे परमात्मनिगदित आहेत, असेंच म्हणायें लागतें.

वेदांत दिव्यलोकांचे कथन आहे, त्या अलौकिक सुखसाधनांचा उप देश आहे, या लोकांत आढळून न येणाऱ्या देवदेवतांचे वर्णन आहे. मोक्ष मार्गाची साधनें आहेत, सृष्टीच्या पूर्वील परब्रह्म परमेश्वराचे वर्णन आहे, सष्ट्युत्पत्तीचें क्रमवार कथन आहे, सृष्टीच्या अधिकारीवर्गाची माहिती आहे, सृष्टिनिर्वहणार्थ अवश्य असणाऱ्या त्यांच्या साहाय्याचें विवेचन आहे, त्या साहाय्याकरितां आवश्यक असणाऱ्या विधिविधानात्मक यज्ञादि साधनांचा उल्लेख आहे, विविध कर्मे व त्यांची विविध फळे यांचे उद्घाटन आहे, पूर्वेतिहास आहे, ऐहिक जीवनोपयोगी व पारलौकिक मोक्षोपयोगी अखिल साधनांचा, सूक्ष्मस्थूळपणें मूलग्राही निर्देश आहे. जन्मसाफल्याचें, उत्कृष्ट नीतीचें, उन्नत सदाचाराचे, सत्यधर्माचे, युक्तायुक्त आचरणाचें, प्रतिप्राणीपदार्थाच्या गुण धर्माचें व जीवनोपयोगाचें यथार्थ वर्णन आहे. थोडक्यांत मानवी शक्तीच्या आटोक्याबाहेरचे व मनुष्यप्रयत्नसाध्य अखिल साध्यसाधनांचे आविष्कार, वेदांत सूत्ररूपानें भरगच्च भरले आहेत. अलौकिकाची ओळख सांगणारा अलौकिक ज्ञानसंपन्न असला पाहिजे. अलौकिक ज्ञान, लौकिक मनुष्याकडून,

लौकिक अशा कोणत्याहि प्रयत्नाने करून घेणे साध्य होत नसल्यामुळे, अलौकिकाची ओळख सांगणारा अलोकिकच असला पाहिजे. या लोकांत न जन्मलेला, या लोकांतच अंतर्भूत न होणारा, या अखिल लोकांच्या व अलौकिक देवदेवतांच्या व तत् लोकाच्या उत्पत्तीला कारणीभूत असणाराच एक केवळ, या सर्वांची यथार्थ ओळख करून देईल. वेदांत हे सर्व आढळून येत असल्यामुळे वेद ही परमात्म्याचीच वाणी आहे व त्यामुळेच वेद अपौरुषेय म्हणवून घेतात हे सिद्ध होते.

ऋग्वेदाच्या भाष्यात श्रीसायणाचार्यांनी म्हटले आहे 

अलौकिकं पुरुषार्थोपायं वेत्यनेनेति वेदशब्दनिर्वचनम् ॥

लौकिक ज्ञानाने समजण्यास अशक्य असणारी अलौकिक स्वर्गा दिकांची सुखसाधनें व विशेषतः आत्मसाक्षात्काराचे उपाय, म्हणजे जन्ममरण रहित होऊन आनंदमात्र परमात्मस्वरूपाशी ऐक्य संपादण्याचे उपाय या वेदां मुळे जाणले जातात. त्यामुळेच यांना वेद असे म्हणतात.

प्रत्यक्षणानुमित्या वा यस्तूपायो न बुध्यते । एनं विदन्ति वेदेन तस्माद्वेदस्य वेदता ॥

—डोळ्याने पाहून प्रत्यक्षप्रमाणानें अथवा मनानें ताइन अनुन प्रमाणानें जें समजणे अशक्य आहे, जें इंद्रियें व मन यांच्या आवाक्याबाहेरचे आहे तें सर्वच, विशेषतः मोक्षोपाय, या वेदामुळेच जाणला जातो. आणि हेच वेदांचें वेदत्व. या महत्त्वामुळेच (यांना) वेदांना अपौरुषेय म्हणजे परमात्म प्रणीत वेद असे म्हणतात. परमात्म्याखेरीज कोणी सर्वज्ञ असू शकत नाहीं व वेदांत सर्वज्ञत्व प्रगट झाले असल्यामुळे वेद हे सर्वज्ञ परमात्म्याकडून रचले गेले हे ओघानेंच सिद्ध होतें. वर दिलेल्या

यो ब्रह्माणं विदधाति पूर्व यो वै वेदांध प्रहिणोति तस्मै । त ह देवमात्मबुद्धिप्रकाशं मुमुक्षुर्वै शरणमहं प्रपद्ये ॥ (श्वेताश्वेतर उ. ६।१८)

– ब्रह्मदेवादिकांच्या हृदयांत वेदमंत्र स्फुरविण्याच्या कार्याबरोबर सर्वांच्या ठिकाणी आत्मबुद्धीस उजळविण्याचे कार्यहि पण एका परमात्म्याचेंच आहे हे स्पष्ट होते. यावरून जन्मास आलेल्यांनी आत्मलाभाकरितां परमात्म्यास शरण जावें, असा एक निष्कर्ष निघतो. इथे “ अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम् ” । अनित्य आणि असुख अशा या लोकांत जन्मास येऊन शाश्वत सुखाच्या आत्म्प्राप्तिकरितां म्हणजेच मोक्षाकरितां मला शरण य भक्ति कर, या गौतेंतील भगवंताच्या वचनाची आठवण होते. यावरून सारक्या (किरकोळ) सुखाकरितां परमात्मशरणागति आवश्यक नाही कोणी समजूं नये. नात्मलाभात्परो लामः । -अनंतानंत शाश्वत च्या लाभाहून अधिक असा कोणताहि लाभ नाही. सर्व पदं हस्तिपदे निमग्नम्। या म्हणीप्रमाणे या आत्मसुखांत, सर्व सुखाचा लाभ आपोआपच अंतर्भूत होतो. कोटि रुपयांत शंभर हजार व शंभर लाखांचाहि अंतर्भाव झाल्या प्रमाणे आत्मसुखांत इतर सर्व सुखांचा अंतर्भाव होऊन, सुख म्हणून जितके त्या सर्वांच्या प्राप्तिकरितां केवळ सुखरूपी परमात्म्यालाच शरण जावे, असा बोध होतो. त्यांतून आत्मलाभाच्या सुखाची मातब्बरी कोण नाकबूल करील एकंदरीत या उपर्युक्त मंत्राच्या विचारानें वेद हे भोगमोक्षसुखकारक आहेत, त्या त्या अधिकारानुरूप सांगितलेल्या वेदमतानुसारी कर्माचे व भक्तियोगाचे अनुष्ठान करीत, अंतिम गतिरूप मोक्षाकरितां शेवटी निष्काम होऊन परमात्म्याला मुमुक्षूनें शरण जावें व आत्मसाक्षात्कारानें, परमात्म्यैक्य संपादून दुःखरूप जन्म मरणांतून कायमचे सुटावें. त्या परमानंदरूपानें सदाच असावें. हा गूढार्थ इथे सूचित होतो.

स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विंदति मानवः ॥ (गीता १८४६) 

स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः ॥ (१८|४५) 

महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा । 

मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः ॥ (गीता १०/६)

तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् । 

ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयांति ते ॥ (गीता १०/१०) 

तेषामेवानुकंपार्थमहमज्ञानजं तमः । 

नाशयास्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता || (गीता १०१११)

या गीतेच्या श्लोकांचे इथ आपोआप स्मरण होते. त्या त्या वर्ण श्रमाला सांगितलेलें कर्मानुष्ठान करीत भगवंताची अनन्यभक्ति केल्यास, परमात्मा त्या त्या भक्तास इहपरसुख देतो, स्वरूपाचे अज्ञान नष्ट करतो. सर्वप्रथम उत्पन्न झालेले सर्व ऋषि, मनु, मुनि प्रत्यक्ष वा परंपरेनें परमात्म्याच्या पासूनच उत्पन्न झाले व त्यांच्यापासून पुढे ही सर्व सृष्टि झाली. झालेल्या सृष्टीचा परमात्माच एक प्रभु आहे, हे या श्लोकावरून कळून येते.

अव्यक्तान्महन्महतोऽहंकारोऽहंकारात्पंच तन्मात्राणि पंचतन्मात्रेभ्योऽखिलं जगत् ॥

हे समस्त कार्यजात अजून ज्या ठिकाणी व्यक्त झाले नव्हते ते अव्यक्त, तदभिमानौ ईश्वर. यानंतर बीजापासून अंकुराप्रमाणे महत्त्व व तदभिमानौ हिरण्यगर्भ,अंकुरापातून विशाल वृक्षाप्रमाणे पुढे मानसिक ब्रह्मांड व तदभिमानौँ अहंकार म्हणजे विराट् . या विराटापासून प्रगट त्रिगुण व या त्रिभुणांतल्या सवगुणापासून विष्णु, रजोगुणापासून ब्रह्मदेव, तमोगुणापासून रुद्र. ‘बहु व्हावे’ या संकल्पाने विष्णूपासून निर्मित झालेल्या ब्रह्मदेवाने, त्या आपल्या बहुविध रूपाच्या पूर्तीकारतां विष्णूनें स्फुरविलेल्या वेदज्ञानापासून प्रथम पंचभूत निर्माण केले व त्या सूक्ष्मत्यूळ पंचभूतापासून बहुसूक्ष्मस्थूल शरीरें निर्माण केली व त्यांत तो आपल्या सूक्ष्मरूपाने प्रविष्ट झाला. त्यांच्या मानसिक सृष्टीत प्रथम नवप्रजापति ऋषि मुनि, मनु, यांचा अंतर्भाव झाला व पुढचे कार्य यांच्या कडून झालें. या ब्रह्मा-विष्णु-महेश्वराकडे क्रमानें सृधिस्थितिलयाची कार्ये आली. हे विराट हिरण्यगर्भ व ईश्वर, यांचे अवतार अथवा अंश आहेत. यांचाच सर्व सृष्टींवर उघड अधिकार चालतो. प्रत्यक्ष वा परंपरेनें असे हे समय विश्व, परमात्म्याच्या व्यक्ताव्यक्त संकल्पशक्तीचे कार्य असल्यामुळे सर्व मानसिकच होय. या संकल्परूप मायाशक्तीच्या मगरमिठीतून निसटावयाचे झाल्यास त्या सर्वात्म परमात्म्याची शरणागतीच एक साधन होय. वैदिक मताप्रमाणे अभ्युदय नि निःश्रेयस यांकरितां प्रत्येकाने प्रयत्न करावा. हा एवढा अर्थ या श्लोकांतून काढतां

श्रीजैमिनी ऋषींनी प्रथम पादांत वेदांश्चैके सन्निकर्षं पुरुषाख्याः । अनित्यदर्शनाच्च । या सूत्रांनी वेदांच्या पौरुषेयत्वासंबंधी प्रथम केलेला पूर्वपक्ष उक्तं तु शब्दपूर्वत्वम् । परंतु श्रुतिसामान्यमात्रम् । या सूत्रांनी खोडून वेदाच्या अपौरुषेयत्वाविषय सिद्धांत स्थापला आहे. स्यात्पौरुषं न वा वेद वाक्यं स्यात्पौरुषेयताकाठकादिसमाख्याना द्वाक्यत्वाच्चान्यवाक्यवत् । (जै. न्या. मा.) समाख्यानं प्रवचनाद्वाक्यत्वं तु पराहतम् । तत्कर्त्रनुपलंभेन स्यात्ततोऽपौरुषेयता। या जैमिनी न्यायमालेच्या प्रमाणावरून व शब्दतदुपजीविप्रमाणातिरिक्तप्रमाणजन्यप्रमित्याविषयार्थ

कत्वे सती शब्दजन्यवाक्यार्थज्ञानजन्यप्रमाणशब्दत्वं वेदत्वम् 

या शब्दचिंतामणांच्या वेदलक्षणावरून वेदाचे अपौरुषेयत्व सिद्ध होतें. शास्त्र योनित्वात् ( ब्र. सू. ) या ब्रह्मसूत्रानेहि व या वरच्या नहीरशस्य शास्त्रस्य ऋग्वेदादिलक्षणस्य सर्वज्ञगुणान्वितस्य सर्वज्ञादन्यतः संभवोस्ति । ( शां. भा.) या शांकरभाष्यानेंहि वेदाच्या अपौरुषेयत्वाला पुष्टि मिळते. ऋग्वेदादि सर्वज्ञलक्षणान्वित अशा या अलौकिक शास्त्राची उत्पत्ति सर्वज्ञ परमेश्वरावांचून इतर कोणाकडूनहि होणे शक्य नाही. अमक्या एका मनुष्यापासून त्याच्या अमुक वयांत, अमुक देशांत, अमक्या वेळी समग्र वेद झाले, असे कोणतेंहि प्रमाण कोठे आढळून येत नसल्यामुळे व ते परमात्म्यापासूनच झाल्याचे प्रमाण मिळत असल्यामुळे वेद अपौरुषेय आहेत. मनुष्यजात शिकून शाहाणी होते व तिची उत्तरोत्तर कालांत प्रगति होत जाते, या मतानुसारहि अति प्राचीनकाली म्हणजे जगदुत्पत्तिसमयी झालेले वेद परमात्मप्रणीत, परमात्मदत्तच आहेत असा निश्चय करण्यास कोणालाहि शंका येणार नाही. प्रथम उत्पन्न झालेल्या प्रजेला, प्रथमक्षणी इहपरसुखसाधक धर्माचा-साधनाचा ज्यामुळे बोध केला गेला, ते वेद परमात्म्यापासून झाले नाहीत, असे कोण बरें मानील !

सर्वपूर्वप्रजेला इहपरसुखसाधन बोधक बेद, सर्वप्रथम परमात्मा सांगणार नाही, तर दुसरा कोण सांगेल सर्वप्रथम असणाऱ्या एका परमात्म्यापासूनच सर्व निर्माण झाले, अर्से कोणालाहि मानावें लागेल. ब्रह्मदेवा कडून सृष्टी रचबिण्याकरितां त्याला दिलेलें ज्ञान, म्हणजेच ‘वेद’ म्हणून सिद्ध झालें असतां, यांचे अपौरुषेयत्व, जगत्कारणत्व, जगांतील इहपरसाधनांचे मूलप्राही बोधकत्व इत्यादि बेदांची सर्व लक्षणें आपोआप सिद्ध होतात.

home-last-sec-img