Literature

वैशाख वद्य द्वादशी

मनुष्य नेहमी चांगल्या कामासाठी चांगले संकल्प करीत असतो हेच एक मानवी जीवनाचे रहस्य होय.

संन्याशांना कोणतेही कर्म नसले तरी त्यांनी नेहमी सर्वसंगपरित्याग करून तप करीत असले पाहिजे. त्याशिवाय त्यांना दुसरे कोणतेही काम नाही. त्यांची तपश्चर्या म्हणजे ब्रह्मस्वरूपात सदासर्वदा स्थित होणे. संन्यास या शब्दाचा अर्थच आत्मस्वरूपाशिवाय असलेल्या इतर सर्व वस्तूंचा त्याग करणे असा आहे. त्यांनी सर्व कर्माचा त्याग करून सतत ब्रह्मस्थितीतच असणे ह्यालाच ‘ एकांत ‘ म्हणतात. अद्वितीय ब्रह्म हेच एकमेव सत्य आहे व त्याची जाणीव असणे यालाही ‘ एकांत ‘ म्हणता येईल. ‘ एकांत ‘ म्हणजे ब्रह्मस्वरूपस्थितीत असणे. एकांत स्वरूप म्हणजे संन्याशी स्वरूपाची जाणीव विसरून ब्रह्मस्वरूपस्थितीमध्येच रहाणे होय. तत्त्वनिष्ठा म्हणजे ब्रह्माच्या जाणीवेशिवाय एक क्षणही इकडे तिकडे न हलणे. नेहमीच कायम असणारे असे एकच तत्त्व असून ते जाणून घेणे हे प्रत्येक प्राणिमात्राचे ध्येय असावे. ते म्हणजेच ब्रह्मस्थिति, स्वरूपस्थिति, स्वरूपध्यानस्थिति व हे सर्व एकच आहे. ह्याचदृष्टीने तपदृष्टी किंवा एकांतदृष्टी या दोन्ही एकच होत हे तुमच्या लक्षात येईल.

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img