Literature

श्रवणादीनां मोक्षराधनत्वं नाम प्रकरणं एकादशम्‌‌

श्रवणादी मोक्षसाधन— प्रकरण 11 वं

श्रवणन्तु गुरोःपूर्वं मननन्तरदनन्तरम्‌‌।।
निदिध्यासनमेतध्दि पूर्णबोधस्य कारणम्‌‌।।1।।
अर्थ—— प्रथम गुरुच्या उपदेशाचे श्रवण करुन नंतर त्याचे मनन (नीट विचार करुन, स्मरण करुन) त्यानंतर ”निदिध्यासनम्‌‌” अर्थात गुरु किवा शास्त्र वचनांचे पुनःपुनः स्मरण करुन त्या ज्ञानाची वारंवार उजळणी करणे त्या ज्ञानांत ”असत्‌‌” तत्वाचा निषेध आणि ”सत्‌” तत्वाचा अधिष्टानाचा अभ्यास हे येते. हेच पूर्ण बोध प्राप्तिचे मुख्य साधन आहे. ।।1।।

उत्पत्तिस्थितिसंहारस्फूर्तिज्ञानविवर्जितम्‌।।
प्रथमं त्वेकमेवासीद्‌‌ ब्रह्मैवानन्दरुपकम्‌‌ ।।2।।
अर्थ—— उत्पत्ति स्थिति आणि संहार ह्‌या जगताच्या तीन अवस्था सर्वप्रथम एकदम स्फुरण होण्यापूर्वर्ी एकच स्थितीत होत्या त्या म्हणजे केवळ आनंदमय ब्रह्म हेच एकमेव अद्वितीय अवस्था होय.।।2।।

अधिष्ठानं प्रपञचस्य ब्रह्मणोन्यद्यतो न हि।।
ततः सर्वप्रपञचोयं ब्रह्मैव निजरुपतः।।3।।
अर्थ—— ब्रह्मतत्वाशिवाय दूसरे कोठलेच तत्व ह्‌या प्रपंचाच्या मुळाशी पार्श्वभूमिवर नाहीं. निजरुपाने म्हणजे हे सर्वच जगत्‌ म्हणजे ब्रह्मरुपच आहे. ।।3।।

एतद्‌ब्रह्मस्वरुपं यो ज्ञात्वा तत्स्थितिमाप्नुयात्‌‌।।
सच्चिदानन्द ब्रह्मैव भूत्वा राराजतेद्वयः।।4।।
अर्थ—— ह्‌या प्रमाणे ब्रह्माची ही स्थिती जाणून जो त्या स्थितिला प्राप्त करुन घेतो, तोच सत्‌‌चित्‌‌ आनंदरुप होवून ब्रह्मरुपाने झळकतो.।।4।।

प्रपञचाभावतस्तस्य दुःखाभावोपि जायते।।
न तस्य किञिचदज्ञानं नित्यबोधस्वरुपतः।।5।।
अर्थ—— प्रपंचाचा म्हणजे (मी व ब्रह्म दोन आहोत, मी म्हणजे हे शरीर ह्‌या भावास प्रपंच (कल्पना) भाव म्हटले आहे.) द्वैत भावाचा जेथे अभाव आहे, तथे दुःख भावनेचा पण अभाव आहे. त्यास कोठल्याही अज्ञानाचा (मायेचा) स्पर्श होत नाही. आणि नित्यतत्वाचा बोध हा आनंददायक असतो. ।।5।।

मायाविद्ये विहायैवमुपाधीपर जीवयोः।।
अखण्ड सच्चिदानन्दं परं ब्रह्म विलक्ष्यते।।6।।
अर्थ—— ह्‌या माया अविधेला सोडून जीव आपली (जन्म—मरणाची उपाधी दूर करुन) अखण्ड असे सच्चिदानंद स्वरुप जाणू शकतो.।।6।।

इत्थं गुरुमुखाच्छुत्वा शिष्यैः शमदमान्वितैः।।
तद्‌‌ वाक्यार्थानुसन्धानं क्रियते श्रवणं हितत्‌‌।।7।।
अर्थ—— ह्‌या प्रमाणे गुरुमुखांतून शिषंकडून (शम दमादि साधनानी म्हणजे इन्द्रिय निग्रह आणि मनोनिग्रहादि साधनांनी सज्ज होवून गुरु वाक्याचे पुनःपुनः प्रयत्नपूर्वक श्रवण व मनन (अनुसंधान करुन) हितकारक श्रवण केले जाते. ।।7।।

अधिष्ठानाद्विनाकार्य न प्रतीयेत कर्हिचित्‌‌।।
कार्येकारण भानं हि तदस्तित्वमपि स्फुटम्‌‌।।8।।
अर्थ—— कोणचेही कार्य त्याचे अधिष्ठान जर योग्य असले तरच यशस्वी होते, अन्यथा नाही. कार्य कोणते आहे आणि त्याचे कारण हेतु काय आहे ह्‌याचे भाव असणे आणि त्याचे अस्तित्व सुध्दा स्पष्ट होते, अर्थात ”तत्‌ त्वं असि” तेच तू आहेस ”तदस्ति त्वमपि स्फुटम” अर्थात्‌‌ ते आहे, तू पण आहे, हे स्पष्ट होते.

दृश्यमानें घटे यदवन्मत्तिका भाति सा बलात्‌‌।।
दृश्यमाने प्रपञचेपि ब्रह्मैवाभाति चित्सुखम्‌‌।।9।।
अर्थ—— ज्या प्रमाणे ह्‌या दिसणार्‌या जगात आपल्याला घट दृष्टिस पडतो तेव्हां त्यातील मूंळ तत्व मातीच आहे, असे आम्हास ज्ञात होते, तद्वतच ह्‌या दिसणार्‌या सर्व प्रपंचामध्ये सुध्दा आम्हास ब्रह्म हेच सर्वत्र विराजमान आहे, असे भासते. ।।9।।

भाव्यते यदि चेत्कार्यं तदध्यस्तं हि कारण।।
स्वाधिष्ठानात्तदध्यस्तं भिन्नं न स्यात्कदाचन।।10।।
अर्थ—— जर हे कार्य त्यामागील खरे तत्व काय आहे, आणि वरुन आवरण कश्याचे भ्रमित करते हे जाणवले तर आपल्या मधील (अंतरात्म्यांतीत ब्रम्हतत्व) स्वाधिष्ठान जे आहे त्या शिवाय दूसरे तत्व नाहीं असे सर्वत्र दिसले. अर्थात ”सर्वं खलु ब्रह्म” हे तत्व अनुभवास येईल. ।।10।।

रज्जुसर्वो यथा रज्जुर्ब्रह्मैवेदं जगत्तथा।।
अयमहं त्विदं सोहं ब्रह्मैवानन्दमद्वयम ।।11।।
अर्थ—— रज्जु दोरी हीच सर्पासारखी वाटली तसे ब्रह्मतत्व हेच दोरी
आहे. पण जगत्‌ हे सर्पाप्रमाणे भासते. परंतु स्वाधिष्ठान जर उमगले तर ते भिन्नत्व भ्रमाने दूसरीच वस्तु वाटणे हे होत नाही. हयांत ”हा मी आहे” हा तो आहे, असे न वाटता ”मी तर ब्रम्हचतत्वच आहे.”असा मी अद्वय आनंद वाटतो. ।।11।।

इत्थं युक्त्या निश्चयार्थ साधकैश्च समाहितैः।।
कृतं तत्वानुसंधानं मननं तत्प्रकीर्यते ।।12।।
अर्थ—— ह्‌या प्रमाणे साधक तपस्वी कडून युक्ति ने हा अर्थ निश्चितार्थ निवडून घेतला गेल्यास त्यासच तत्वानुसंधान, मनन असे म्हटले जाते. ।।12।।

घटाकाश महाकाशं इवात्मानं परात्मनि।।
विलाप्याखण्डभवेन योस्मि सोस्मि स्थिरोस्म्यहम्‌‌।।13।।
अर्थ—— घटामधील आकाश (पोकळी) आणि महाआकाशमधील पोकली ह्‌या प्रमाणेच आत्मा आणि परमात्मा हयांचा परस्पर (बृहद आणि सूंक्ष्म) असा सम्बंध आहे, आणि तया पासून मी खण्डित असा तुकडा नसून अखण्ड ब्रह्मच आहे. असा गजर करुन तो आहे, मी आहे, आणि मी स्थिर आहे, असे समजावे. ।।13।।

य़त्रैव जगदाभासौ दर्पणान्तः पुरं यथा।।
निर्विकल्पो निराकारो तद्‌‌‌ब्रह्मैवास्मि निष्क्रियम्‌‌।।14।।
अर्थ—— ज्या प्रमाणे आरशांतील प्रतिबिंब हे निष्क्रिय असते त्या प्रमाणे मी (आत्मतत्व) हे निराकर आणि निर्विकल्प असतें. ।।14।।

चिदात्मानि सदानन्दे देहारुढामह धियम्‌‌।।
निवेश्य लिङगमुत्सृच्य केवलोहं स्वमात्रता।।15।।
अर्थ—— चिदात्मरुप सदानंदामध्ये मी देह रुपावर ”अहं” आणि बुध्दिरुपाने आरुढ होतो. आणि नंतर स्वात्मरुपास विसरुन लिंगसुसृज्य केवल अहं बुध्दिने मी असे म्हणू लागतो. ।।15।

स्वप्रकाशमधिष्ठानं स्वयंभूय सदात्मना।।
पश्यामि न स्तो भिन्नं केवलानन्दरुपतः।।16।।
अर्थ—— ”सदात्मना” अर्थात्‌ सत्‌‌‌ स्वरुपी आत्म्याने मी स्वयंभू स्वयं प्रकाशित अश्या माझ्‌या अधिष्टान असणार्‌या रुपाला बघतो तेंव्हा ते माझ्‌यापेक्षा अलग वेगळे असे कांहींच नसून केवळ आनंद स्वरुपच आहे, असे दिसते, अर्थात अनुभूत होते. ।।16।।

क्व गतं केन वानीतं कुत्र लीजमसज्जगत्‌‌।।
अधुना नैव पश्यामि स्थितोस्मि केवलात्मना।।17।।
अर्थ—— असत्‌‌रुपी नश्वर जग कोठे गेले ? कुणी त्यास दृष्टीआड खेचून नेले? आणिा कश्यामध्ये ते नश्वर जगत्‌ विलीन झाले? असे मी आता कोठेच बघू शकत नाही. कारण आता मला सर्वत्र केवळ आनन्दमय आत्मतत्वच अनुभूत होत आहे. ।।17।।

किं हेयं किमुपादेयं किमन्यत्किं विलक्षणम्‌‌।।
निजानन्दसुधासिन्धौ परिपूर्णे चिदात्मनि।।18।।
अर्थ——— काय हेय तिरस्करणीय आहे? काय उपादेय ग्राह्‌य आहे? काय दूसरे कांही आहे? आणि काय विलक्षण आहे? चित्‌‌ तत्वाने परिपूर्ण आणि आनंदाचा समुद्रच की काय येव्हड्‌या मोठ्‌या आनंदात मी न्हाउन निघालो आहे. ।।18।।

न किञदय पश्यामि न शृणोमि न वेदम्यहम्‌‌।।
स्वात्मनैव सदैवास्मि चिदानन्दः स्वलक्षणः।।18।।
अर्थ—— न कि मी कांही बघू शकतोय न कि मी कांही ऐकू शकतोय, किंवा कांही जाणू शकतोय अशी आनंदमय स्थिती आहे कीं सतत आपल्या आपल्या मध्येच आनंदांत खण्ड अश्या आनंदात जे कि स्वतःचेच लक्षण आहे, अश्या अवर्णनीय स्थितित मी आहे. ।।19।।

इत्थं निर्विचिकित्स्येर्थे चेतसः स्थापितस्य यत्‌‌।।
एकतानत्वमेताध्दि निदियासनमुच्यते।।20।।
अर्थ—— ह्‌या प्रमाणे आपल्या चित्ताला ह्‌या अवर्णनीय अश्या आनंदांत स्थापन करुन एकाच प्रकाराने त्याच स्थितित राहण्याचा वारंवार अभ्यास करणे ह्‌यालाच निदिध्यासन म्हणतात.

ध्यातृध्याने परित्यज्य क्रमाध्द्यैयैकगोचरम्‌‌।।
निवातदोपवच्चितं समाधिरभिधीयते।।21।।
अर्थ—— ध्यानधारणेमध्ये क्रमाने एक—एक सोडून दृश्यस्वरुपांत जे आनंदमय स्वयंप्रकाशी तत्व दृष्टिगोचर होते त्यास निर्वात अश्या स्थळी दिव्याची ज्योत ज्या प्रमाणे स्थिर राहून प्रकाशित होत असते, तसे आपले चित त्या आनंदमय स्थितित दृढ रहावे, यालाच समाधी असे म्हणतात. ।।

वृत्तयस्तु तदानीमप्यज्ञाता आत्मगोचराः।।
स्मरणादनुमीयन्त व्युत्थितस्य समुन्थिताः।।22।।
अर्थ—— त्या वेळेस आपणांस अजाणता, अनेक वृत्ति, कल्पना ज्या आपल्या आत्मतत्वांत सांठलेल्या असतात, त्या दृष्यरुप होतात. आणि आपल्या स्मरणस्थलांतून उद्‌‌भवतात आणि भासू लागतात.( आपल्या चित्तामध्ये अनेक पूर्वजन्माचें संस्कार असतात. त्यांतून आपणास न कळत ते विचार दृष्यरुप घेवून उठतात). ।।22।।

अनादाविह संसारे सञिचताः कर्मकोटयः।।
अनेक विलयं यान्ति शुध्दो धर्मोभिवर्धते।।23।।
अर्थ—— अनादि अश्या ह्‌या संसारामध्ये कोट्‌‌यावधी कर्म संचित झालेले असतात. अनेक कर्मांचा विलय होतो. आणि शुध्द कर्म जेे असतात ते धर्माची वृध्दि करितात.।।23।।

धर्ममेघमिमं प्राहुः समाधिं योगवित्तमाः।।
वर्षत्येष यथा धर्मोमृतधाराः सहस्प्रशः।।24।।
अर्थ—— योग्यांमधील महायोगी ह्‌या धर्ममेघाला ”समाधी” असे म्हणतात. सहस्त्रधारांनी हा मेघ जणू अमृतवर्षाच करतो. ।।24।।

अमुना वासनाजाले निःशेषं प्रविलापते।।
समूलोन्मूलिते पुण्यपापाख्ये कर्मसञचये।।24।।
अर्थ—— वासनाच्या जाळयामध्ये ह्‌‌याजकडून त्यांचा (वासनांचा) निपटारा झालेला दिसतो. आणि कर्म संचयामध्ये पाप आणि पुण्याचा समूल नाश झालेलेा असतो. ।।25।।

वाक्यमप्रतिबंद्धं सत्प्राक्परोक्षावभासते।।
करामलकवद्‌‌बोधमपरोक्षं प्रसूयते।।26।।
अर्थ—— अप्रतिबंध्द सत्‌वाक्य हे अज्ञात्‌ न दिसणारे असे वाटते. हातावर ठेवलेल्या आवळयाप्रमाणे जे स्पष्ट व निश्चित असते ते दृश्यस्वरुपांत असते. ।।26।।

अन्यविद्यापरिज्ञानमर्वश्यं नश्वर भवेत्‌‌।।
ब्रह्मविद्यापरिज्ञानं ब्रह्म प्र्राप्ति करं स्थितम्‌‌।।27।।
अर्थ—— ब्रह्मविद्या सोडून अन्य विद्यांचे ज्ञान हे नश्वर आहे. बह्मविद्येचे ज्ञान मात्र (हातावर ठेवल्याप्रमाणे स्पष्ट) ब्रह्मप्राप्ति हेच निश्चित आहे. ।।27।।

यत्परं ब्रह्म सर्वात्मा विश्वस्यायतनं महत्‌‌।।
सूक्ष्मात्सूक्षमतरं नितयं तत्वमेव त्वमेव तत्‌‌।।28।।
अर्थ—— विश्वाचा आधार परब्रह्म हे सूक्ष्मांत सूक्ष्म असून नित्य सत्‌‌ तत्व रुप असून तेच तुझ्‌‌यांत पण आहे.

जाग्रत्स्वप्नसुषूप्त्यादि प्रपञचं यत्प्रकाशते।।
तद्‌‌ब्रह्माहमिति ज्ञात्वां सर्वबध्दैः प्रमुच्यते।।29।।
अर्थ—— जाग्रत स्पप्न सुषुषि हा प्रपंच ज्या—ज्या मुळे प्रकाशित होतो तेच ब्रह्मतत्व मी आहे, हे जाणून सर्व बन्धनापासून मुक्ति प्राप्त होते. ।।29।।

एवमेवोपदेशो हि कैवल्योपनिषद्‌‌गतः
छान्दोग्येपि स्फुटं वाक्यमेतत्तत्वमीतिच ।।30।।
अर्थ—— कैवल्य उपनिषदांत ही हेच वाक्य स्पष्ट केले आहे, आणि छांदोग्य उपनिषदांत ही हेच वाक्य कीं ”तत्‌‌‌ तत्वं असि” हे सांगितले आहे. ।।30।।

अवगम्य गुरुत्व तत्वं नित्यमेव समाहितैः।।
साधकैश्चिंतनं कार्यं शुकोपनिंशदि स्फुरम्‌‌।।31।।
अर्थ‘—— गुरु पासून हेच ज्ञान साधकाने संचित करुन मिळवले पाहिेजे. शुकोपनिषदांत सांगितले आहे किं सााकाने असे चिंतन करीत रहावें. ।।31।।

येनक्षेते शृणातीद जिघ्रति व्याकरोति च ।।
स्वाद्वस्वादु विजा नाति तत्पज्ञानमुदीरितम्‌‌।।32।।
अर्थ—— ज्या मुळे बघणे ,एैकेणे, वासघेणे ह्‌या क्रिया स्पष्ट होतात, तसेच स्वाद घेणे समजते ते ”प्रज्ञान” असे म्हटले जाते. ।।32।।

चतुर्मुखेन्द्र देवेषु मनुष्याश्वर्गेवीदिषु।।
चैतन्यमेकं ब्रह्मातः प्रज्ञानं ब्रह्ममय्यपि।।33।।
अर्थ—— चतुर्मुख ब्रह्मदेवांत, गाय घोडे, ह्यांत एकच चैतन्य तत्व आहे. ते ब्रह्ममय चैतन्य आहे. ।।33।।

परिपूर्णः परात्मास्मिन्देहे विद्याधिकारिणि।।
बुध्देः साक्षितया स्थित्वा स्फुरन्न हमितीर्यते।।34।।
अर्थ—— विद्या प्राप्त करुन घेण्याची अधिकारी बुध्दि हिच्या साक्षीने परिपूर्ण परमात्मा ह्या देहामध्ये स्फुरण पावतो. ।।34।।

स्वतः पूर्ण परात्मात्रं ब्रह्मशब्देन वर्णितः।।
अस्मीत्ययेक्यं परामर्शतेन ब्रह्मभाम्यहम्‌‌।।35।।
अर्थ—— स्वतः पूर्ण असा परमात्मा ”ब्रह्म” ह्‌या शब्दाने वर्णित केला गेला आहे. ”अस्मि” ह्‌या विचाराने स्पष्टीकरणाने मी ”ब्रह्म” आहे हे स्पष्ट होते. ।।35।।

एकमेवाद्वितीयं सन्नामरुपं विवर्जितम्‌‌।।
सृष्टेः पुराधुनाप्यस्य तादृक्त्वं तदितीर्यतें।।36।।
अर्थ—— नाम आणि रुपाने रहित असे एकच. एक अद्वितीय ”सत्‌” नामक तत्व हे सृष्टीच्या पूर्वी आणि आता सुध्दा त्याच प्रमाणे आहे, असे म्हटले जाते. ।।36।।

श्रीतुर्देहेन्द्रियातीतं वस्त्वन्न तदितीर्यते।।
एकता ग्राह्यतेंयसीति तदैक्यमनुभूयते।।37।।
अर्थ—— श्रोत्यांच्या देह—इंद्रियांच्या पण पलीकडील तत्व असे ब्रह्मतत्व त्यास म्हटले जाते. ते आणि शरीर ह्‌‌याची एकरुपता अनुभविली जाते. ।।37।।

स्वप्रकाशापरोक्षतवमयमित्युक्तितो मतम्‌‌।।
अहंङकारादिदेहान्त प्रत्यगात्मेति गींयते।।38।।
अर्थ—— आत्म तत्वास ”अयम” म्हणजे ”हा” असे म्हटले जाते. कारण ते तत्व परोक्ष म्हणजे स्वयंप्रकाशी आहे. अहंकार आदि तत्व जे देहाबरोबर नष्ट होतात व जे राहते त्यास प्रत्यगात्मा म्हणतात. ।।38।।

दृष्यमानस्य सर्वस्य जगतस्तत्वमीर्यते।।
ब्रह्मशब्देन तद्‌‌ब्रह्मस्वप्रकाशात्मरुपकम्‌‌।।39।।
अर्थ—— दृश्यमान अर्थात दिसणार्‌या सर्वजगताचे तत्व म्हटले जाते. आणि ब्रह्म शब्दाने स्वप्रकाशित होणारे ते तत्व अयं असे म्हटले जाते. (अर्थात सर्व जग हे ब्रह्मतत्वाधिष्टितच आहे हे सार)

ऋृग्वेंदादिविंभागेन महावाक्यार्थ एव हि।।
श्रीशिवेन शुकायैवमुपदिष्टः समासतः।।40।।
अर्थ—— ऋृग्वेद आदि विभागांनी महावाक्यां द्वारे हेच ज्ञान उधृत केले आहे आणि भगवान शंकरांनी पण शुकदेवांना हाच उपदेश दिला आहे. ।।ंं40।।

पूर्वसंस्कारतो यश्च बीजशुध्दस्तथापि च ।।
विरक्तः स युवा धन्यः सन्तसङगतिद्विशेषतः।।41।।
अर्थ—— पूर्व संस्कारांनी जो शुध्द आहे त्याचे बीजच शुध्द आहे आणि असा विरक्त युवक धन्य होय. आणि सत्संगामुळे तर तो विशेषच धन्य होतो. ।।41।।

गृहित्वादि च वृध्दोपिः मुक्ताः स्याद्‌ ब्रह्मवेदनात्‌‌।।
प्रक्षालनाद्धिपङकस्य दूरादस्पर्शनं ब्रजेत्‌‌।।42।।
अर्थ—— वृध्द माणुस पण ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यावर मुक्त होइ्रल. चिखलाचे प्रक्षालन केल्यावर दुरुनच त्याला स्पर्शही न करिता जावे म्हणजे निर्मळ रहाता येईल.।।42।।

आश्रमादाश्रमं गच्छेदितिवच्चान्यथाति वा।।
ब्रह्मचर्यादपित्वेवं प्रव्रजेंदाह सा श्रुतिः।।43।।
अर्थ—— एका आश्रमांतून दूसर्‌या आश्रमांत जातांना असेच अलिप्त (मायेपासून जीव वाचवून) निर्मल रहावे. (ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, सन्यासाश्रम ह्‌या एकांतून दूसर्‌यांत जाताना) सुरवातीला म्हणजे ब्रह्मचर्याश्रमा पासूनच असे निर्विकार अलिप्त राहून भ्रमण करावे असे श्रुति वेद सांगतात.।।43।।

यौवने यो विरक्तस्यातत्युणेन धरा वहेत्‌‌।।
जन्तुनां कुलकोटीनां विषयासक्तचेतसाम्‌‌।।44।।
अर्थ—— जो तारुण्यांतच विरक्त होवून राहतो त्या युवकाद्वारे च पृथ्वी तोलली जाते. (तरंगते) अन्य कोट्‌यावधी जीवजन्तु त्यावर विषयासक्त असून राहतात. ।।44।।

भोग्येभ्यो भूरिभङभेग्यो धाराभ्य इव पर्वतः।।
चलन्नैव च यो धीरः स वै पुरुष उच्यते।।45।।
अर्थ—— पर्जन्याच्या अनेक धारा जरी पर्वतावर पडत असल्या तरी पर्वत हा अचलच राहतो. त्या प्रमाणे भोग्य अश्या अनेक मायावी रुपांना निवारण करुन धीर गम्भीर योगी हा स्थिर मनाने राहतो.।।45।।

यस्य नाहङकृतो भावो बुध्दिर्यस्य न लिप्यते।।
यः समः सर्वभूतेंषु जीवितं तस्य शोभते।।46।।
अर्थ—— ज्याला अहंकारचा भाव लिप्त होत नाही, त्याची बुध्दि दूषित होत नाही. तो सर्व भूतमायांशी समबुध्दिने राहतो. त्याचे जीवन शोभून दिसते. ।।46।।

यान्तःशीतलयाबुध्या रागद्वेषविमुक्तया।।
सक्षिवत्पश्यतींद हि जींवितं तस्य शोभते।।47।।
अर्थ——राग द्वेष ह्‌या पासून मुक्त असून ज्याची बुध्दि शीतलतेला प्राप्त झाली आहे तो ह्‌या सर्व जगताकडे केवळ साक्षी या भावाने पाहतो. त्यामुळे त्याचे जीवन शोभून दिसते व त्यामुळे तो झळकतो. (आत्मतेजाने). ।।47।।

येंन सम्यक्परिज्ञाय हे यो पादेयमुज्झता।।
चितेस्यान्तेर्पितः चित्तं जीवितं तस्य शोभते।।48।।
अर्थ—— ज्याने सम्यक्‌‌रीतिने (चाणाक्षपणे) जाणून जे (हेय) पण घेण्यासारखे (अर्थात्‌ मोहक) ते टाकून त्याचा त्याग करुन स्वचित्ताचा चित्ता मध्येच लय केला तो साध शोभून दिसतो. ।।48।।

बुमुक्षोश्च मरुर्यद्वत्‌पिपासोर्मृगतृष्णिका।।
ममुमुक्षोर्भोगश्रीस्तद्वत्‌‌ नैवाकर्षेदनागपि।।49।।
अर्थ—— भुकेने त्रस्त अश्या माणसाला वाळवंट, तहानेने व्याकुळ अश्या माणसाला मृगजळ ज्या प्रमाणे कांहीच आकर्षण आणि सुख देवू शकत नाही, त्याच प्रमाणे मोक्षाची इच्छा करणार्‌याला ऐहिक भोग कांहीच मोहित करुं शकत नाहीं. ।।49।।

आध्यात्मरतिरासीनः पूर्णः पावनमानसः।।
प्राप्तानुत्तमविश्रान्तिर्न किञिचदिह वाञछति।।50।।
अर्थ—— ज्याचे मन पूर्ण पावन पवित्र झालेले आहे आणि केवळ अध्यात्मा मध्येच प्रेम उत्पन्न झाले आहे त्यास परमात्म तत्वाचा ध्यास लागून तो दूसरे कांहींच इच्छित नाहीं. ।।50।।

तरवोपि हि जीवन्ति जींवन्ति मृगपक्षिणः।।
स जीवति निरातङको य आनंदस्वरुपता।।51।।
अर्थ—— वृक्षपण जीवित असतात आणि पशु—पक्षी पण जीवित असतात, परंतु तोच खरा जगतो की जो अक्षयआनन्दस्वरुप परमात्म्याच्याय सान्निध्यांत आनंदांत राहतो. ।।51।।

जायते भ्रियते लोको भ्रियते जननाय च।।
जन्ममृत्युनाशयित्वा जाता ब्रह्मेह स कृती।।52।।
अर्थ—— जन्मणे आणि मरणे हेच सामान्य लोंकांमध्ये आहे. सामान्यतः मरतो ते ही पुनःजन्म घेण्यासाठीच असे लोकांमध्ये दृष्टिस पडते. परंतु जन्म आणि मृत्यु चा त्याच्या पुनःपुनः फेरीचा नाश करुनच जो राहतो तोच खरा ब्रह्म आणि तो म्हणजे च परमेश्वराची खरी कृति होय. ।।52।।

इहचेदशकद्‌‌बोध्दुं प्राक्शरीरस्य विस्त्रसः।।
ततःसर्गेषु लोकेषु शरीरत्वाय कल्पते।।53।।
अर्थ—— जर कोणी आपले पूर्वजन्मीचे शरीर नष्ट झाले आहे हे समजण्यास असमर्थ असेल अर्थात आत्मा हा तोच अन्नत आहे. हे ज्ञान त्यास नसेल तर त्याला जगांत पुनः जन्म घेवून शरीर प्राप्ती होइलच. आत्मा अमर असून तो शरीर बदलतो हे ब्रह्मज्ञान. ।।53।।

योनिमन्ये प्रपद्यन्ते शरीरत्वाय देहिनः।।
स्थाणुमन्येनुसयन्ति यथा कर्म यथा श्रुतम्‌‌।।54।।
अर्थ—— तो देहधारी अन्य योनीतील शरीर धारण करतो. ज्या प्रमाणे कर्म असेल त्या प्रमाणे त्याला अन्य—अन्य वृक्षादि पण योनी प्राप्त होते. ।।54।।

इति श्रीसमर्थरामदासासानुगृहित श्रीरामपदपंङ्‌‌कजभृङगायमान श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य भगवता श्री श्रीधरस्वामिना विरचिते मुमुक्षुसखः ग्रन्थे श्रवणादीनां मोक्षसाधनत्वं नाम एकादशं प्रकरणं सम्पूर्णम्‌‌।

home-last-sec-img