Literature

श्रावण वद्य चतुर्दशी

वा भारतीय पुण्यभुमीत सर्वच जन्मास येतात. अवतारी व सामान्य जन हे सर्व या पवित्रभुमीत जन्मले तरी
प्रत्येकाच्या जीवनांत फरक असतोच. सामान्यांच्या आचरणांत पुर्वकर्म दृग्गोचर होत असते. देहसुखासाठी
मागील जन्मी केलेल्या कर्माचे फळ म्हणूनच ते हा जन्म घेतात. महात्म्यामांचा जन्म सर्वसामान्यांप्रमाणे होत
नाही. म्हणजेच देहसुखासाठी त्यांचा जन्म नसतो. सर्वसामान्यात दृग्गोचर होणारी विषयवासना त्यांच्या
ठिकाणी नसते. सामान्यांना विषयवासनेमुळे प्राप्त होणारी दुःखे पाहून ती दुःखे नाहीशी करून त्यांचा उद्धार
करण्यासाठीच अवतारी पुरूषांचा जन्म असतो. संसारव्यामोहापासून मुक्तता मिळवून देऊन

सर्वसामान्यजनांना अपार असा भवसागर तरून जाण्यासाठी अवतारी महात्मे कटिबध्द असतात.
सामान्यजनांची सर्व कृत्ये नेहमी स्वार्थाकरतांच असतात पण अवतारी महात्म्यांचे तसे नसते.

संसारीजनांना प्रकाशमान दिसणारे जग अवतारीजनांना अंधःकारमय वाटते. संसारीजनांना अंधःकारमय
वाटणारे जग अवतारीजनांना प्रकाशमान वाटते, त्यांची गाढ निद्रा यांना जागृतावस्थेप्रमाणे व यांची गाढ
निद्रा त्यांना जागृतावस्थेप्रमाणे दिसते. जनसामान्यांना न कळणारे विषय अवतारी व ज्ञानी मनुष्यांच्या सहज
ध्यानात येतात. सामान्यजन संसारसुखासाठीच जिवंत रहात असले तरी अवतारी महात्मे सामान्यांना
संसारव्यामोह घालवून त्यांचे दुःख, शोक नाहिसे करण्यासाठीच अवतार घेत असतात.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img