Literature

श्रावण शुद्ध त्रयोदशी

धर्म हे केवळ विषयसुखासाठी आहेत हा समज चुकीचा आहे. कारण वैषयिक दृष्टी सर्वांनाच
असल्याकारणाने त्यासाठी धर्मरूपी पाठशाळेची गरज नाही. तसेच प्रयत्नाची व योजनेचीही आवश्यकता
नाही. धर्माने अर्थ व काम प्राप्त होतात. *' धर्मादर्थश्च कामश्च '* असे शास्त्रवचन असले तरी ते योग्यच आहे.
परंतु धर्ममूल असलेला अर्थ व काम यांचा उपयोग संयम, सद्बुध्दी यांनी करून तो परमेश्वरी प्रसाद आहे अशी
भावना ठेवून दुषित विषयांचा त्याग करावा. एकंदरीत धर्मामुळे प्राप्त होणारे अर्थ व काम हे त्यागाचा
अभ्यास करवून त्यास परमेश्वरप्राप्तीकडेच बळवितात. स्वर्ग इच्छिणाऱ्या मनुष्याने ' ज्योतिष्टोम ' यज्ञ करावा
असे श्रुतीने सांगितले आहे. या श्रुतिवचनाचे महत्व किती आहे ते पहा.

' तुं देहाच्या मरणानें मरणार नसून तुला स्वर्गप्राप्ती होईल. म्हणजेच तु अविनाशी आहेस. अविनाशी
मनुष्यास जगांतील विनाशकारी सुखाची काय पर्वा असणार ? विनाशकारी सुखाच्या वेडाचा त्याग करून
नित्यानंदसुखासाठी प्रयत्न कर. ' असाच त्या श्रुतिवचनाचा गर्भितार्थ आहे. स्वधर्माचरणाने चित्तशुध्दी होऊन
वैराग्य प्राप्त होते हे पुष्कळशा श्रुतिवचनांतून सांगितले गेले आहे.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img