Literature

श्रीमत्‌ दासबोधतत्त्वस्तवः

( अनुष्टुप्‌छन्दः )

दास्त्वं भव रामस्य भवपारं स नेष्यति ।
भवसेतुरिवाभाति दासबोधः प्रबोधयन्‌ ।।1।।
हे रामदासस्वामी ! तुम्ही हे दासबोध प्रवचन करीत असताना ह्या भवसागरातील रामापर्यंत घेवून जाणारा एक सेतुच (पुला सारखेच) भासता आहात ।।1।।

सर्वं हि पूरयत्येव श्रीरामो दासवांछितम्‌ ।
चिन्तामणिरिवाभाति दासबोधः प्रबोधयन्‌ ।।2।।
आपण (अर्थात्‌ रामदासस्वामी ) ह्‌यांनी केलेल्या सर्वच कामनांची श्रीराम हे पूर्ति करीत आहेत असे वाटते. चिंतामणी जसे कामनापूर्ति करीतो तसे दासबोधाचे प्रबोधन करीतांना आपण तेजाने झळकतात ।।2।।

सर्वप्रकारकं दास्यं रामदास्येन नश्यति ।
स्वतन्यिंभाः प्रभातीर्थं दासबोधः प्रबोधयन्‌ ।।3।।
सर्व प्रकारचे बंधन केवळ श्रीरामालाच समर्थ मानल्यास मुक्तता देतात. त्यापासून आपण मोकळे होतो. स्वातंयिांचे तेज हे दासबोधाचे ज्ञान प्राप्त झाल्यावर होते. ।।3।।

पापं तापश्च दैन्यं च रामदास्येन नश्यति ।
गङ्‌गेन्दुः कल्पदो भाति दासबोधः प्रबोधयन्‌ ।।4।।
पाप, ताप,(दुःख), दैन्य(दीनता,असहाय्‌यता) रामाचे दास्यत्व अर्थात्‌ श्रध्देने भक्तिपूर्ण सेवा केल्यास दूर होते. दासबोधाचे ज्ञानार्जन केल्यावर ते प्रबोधन गंगेसारखे पवित्र, चंद्रासारखे शीतल आणि कल्पद म्हणजे कल्पिलेले देणारे (कल्पतरूसारखे विविधरूपाने कल्याणकारी) होते ।।4।।

प्रपञ्‌चः परमार्थश्च रामदास्येन सिद्‌ध्यति ।
देहलीदीपवद्गाति दासबोधः प्रबोधयन्‌ ।।5।।
प्रपंच आणि परमार्थ रामाचे दास्यत्व स्वीकारले म्हणजे सार्थक होते. आणि त्या साठी दासबोधाचे ज्ञान हे दिंडी दरवाजांतील कंदीला प्रमाणे मार्गदर्शक होते.(दिंडी दरवाजा — मुख्य दरवाज्यांतून पुढे मोठ्‌या प्रशस्त वाड्‌यांत प्रवेश करता येतो.) ।।5।।

वासनाजालनिर्मोकः रामदास्येन सम्भवेत्‌ ।
भवाब्धिनौरिवाभाति दासबोधः प्रबोधयन्‌ ।।6।।
रामाचे दास्य (भक्तिमय सेवा) केल्याने ह्‌या प्रपंचरूप वासनामय जाळ्‌यातून मुक्तता होते. दासबोध हे तरून नेणार्‌या नावेसारखे आहे. ह्‌या संसारसागरास पार करण्यासाठी ते एक सरळ साधन आहे. ।।6।।

स्वाराज्यं च सुराज्यं च रामदास्येन लभ्यते ।
कल्पद्रुम इवाभाति दासबोधः प्रबोधयन्‌ ।।7।।
स्वराज्य आणि सुराज्य हे दासबोधाच्या ज्ञानानन्तर त्यास आचरणांत आणल्यास राज्य प्राप्त होते. (अर्थात त्या ग्रंथात राज्यकर्त्याचे गुण, आदर्श नागरिक आणि आदर्श राज्य ह्या सर्वांचेच मार्गदर्शन आहे.) म्हणून हा ग्रंथ व त्याचे उद्‌बोधन हे एकाद्या कल्पवृक्षा सारखे आहे. ।।7।।

श्रीसमर्थसमस्त्वं स्या रामदास्येन लभ्यते ।
स्पर्शोपल इवाभाति दासबोधः प्रबोधयन्‌ ।।8।।
श्री समर्थां प्रमाणे बुध्दि श्रीरामाच्या दास्यभक्तिने प्राप्त करता येईल. ती तुमच्या जीवनाचे परीसस्पर्शाप्रमाणे सोने करेल. ।।8।।

तवात्मा ब्रम्हरामोयं स त्वमेव त्वमेव सः ।
महावाक्यमिवाभाति दासबोधः प्रबोधयन्‌ ।।9।।
त्ामचा आत्मा म्हणजे परमेश्वर रामच आहे आणि परमेश्वर म्हणजे तुमचा आत्माच आहे. (तत्‌ त्वं असि) ह्या महावाक्याचा बोध पण श्रीरामाचे दास्यस्वीकारून आणि दासबोधाचे ज्ञान प्राप्त करून होतो. ।।9।।

दासोपि रामदास्येन रामस्त्वं त्वमृतो भवेः ।
मोक्षामृतमिवाभाति दासबोधः प्रबोधयन्‌ ।।10।।
रामाची भक्ति करण्याने तुम्ही रामाचे व्हाल आणि अमर व्हाल. हे दासबोध ज्ञान म्हणजे मोक्ष ज्ञान आणि त्याच्या प्राप्तीचे अमृतच आहे. ।।10।।

दासबोधश्ि‌चदादित्यो यत्र कुत्रापि वा स्थितः ।
अज्ञानतिमिरं शीघ्रं नाशयन्‌ काशतेनिशम्‌ ।।11।।
दासबोध हा अक्षय अनन्त अश्या स्वयंप्रकाशी सूर्यासारखा असून अज्ञान अंधःकाराचा नाश करणारा आहे. त्याला कोठे ही ठेवला तरी तो ज्ञानदान करेलच. ।।11।।

।। इति श्रीमद्‌दासबोधतत्त्वस्तवः सम्पूर्णः ।।

रचनास्थळ: लोणावळा
रचनाकाळ: फाल्गुन १५, पौर्णिमा, संवत्सर— १९५७
मराठी अनुवादकः सौ. नलिनी प्रभाकर पाटिल, इंदूर

home-last-sec-img