Literature

श्रीमत शंकराचार्य स्तोत्र

(पृथ्वीवृत्तम )

नसन्नसदसत्तथानचभवेदसद्यततत् |
नसत्वमपिनोरजोनचतमोनमायातथा ||
श्रुतौविततवस्तुयत्परमहोSद्वयं कीर्तितं |
नमामितमहंगुरुप्रणतवत्सलंशङ्करम् ||१||
जे अमूर्त अव्यक्त आहेत, ज्यास कसलेहि स्थान नहि, ,जे सत्वादि गुणातीत आहेत ,जे माया नाहीत , वेदांनी ज्याचे वर्णन बृहत , अद्वितीय केले आहे. त्या प्रणत वत्सल श्रीमतशंकराचार्य गुरूंना मी नमस्कार करितो. ।।१।।

नयत्स्फ़ुरतिवाभवेत्स्फ़ुरणमप्यहोयत्रतत् |
शिवोSहमथजीवकोSहमितिवाSपिसोSहंतथा ||
चिदेकरसमद्वयंविततनिर्विकल्पंशुभं |
नमामितमहंगुरुप्रणतवत्सलंशङ्करम् ||२||
ज्याच्या शिवाय जागोत्पत्तीस्फुरण होत नाही किंवा ज्याच्या योगानं मी शिव आहे, मी जीव आहे किंवा मी आत्मा आहे असे स्फुरण होते ; जे ज्ञानैकरस, अद्वितीय , भेदरहित व कल्याणप्रद आहेत त्या प्रणत वत्सल श्रीमतशंकराचार्य गुरूंना मी नमस्कार करितो. ।।२।।

अचिन्त्यभवनाशिकाप्रणतभक्तहृत्तापहा |
सदैवकरुणालयाभवतियस्यभक्तिःशिवा |
स्वतःप्रभपनामयंसकलभासकंचाद्वयं |
नमामितमहंगुरुप्रणतवत्सलंशङ्करम् ||३||
अचिंतनीय,भवनाशक, शरणार्थी भक्तांचा चित्तताप नष्ट करणारी, सदैव करुणाकर अशी ज्याची कल्याणकारी भक्ती आहे;जे आपण स्वतः कल्याणाचे मूळ कारण आहेत, त्या सर्वत्र भासमान होणाऱ्या पूर्णब्रम्ह श्री शंकराचार्य गुरूंना मी वंदन करितो।।३।।

नयत्रकरणंचनोकिमपिकर्यमिषत्तथा |
नयत्रकथमप्यहोविकृतिमच्चदुःखास्पदम् ||
सदैवसुसमाहितंविगतकल्मषंचित्सुखं |
नमामितमहंगुरुप्रणतवत्सलंशङ्करम् ||४||
ज्यांना कसलाही हेतू नाही आणि किंचितही कार्य नाही (जे कार्यकारणापलीकडे आहेत) ज्यांना थोडेसुद्धा दुःख देणारे विकृती म्हणजे बदल नाही. ज्यांचे ज्ञान सदैव दोषरहित व पवित्र आहे, त्याप्रणतवत्सल गुरु श्रीमत् शंकराचार्य यांच्या चरणी माझे नमनअसो.।।४।।

दिवानरजनीतथाकिमपियत्रसुर्यादिकं |
नयस्यजननंतथामृतरपिस्वतोनिर्मलम् ||
स्वपुर्णनिजरुपकंसकलमङ्गलानांपरं |
नमामितमहंगुरुप्रणतवत्सलंशङ्करम् ||५||
ज्यांना दिवस-रात्र किंवा सूर्योदय नाही तसे जन्ममृत्यू वगैरे विकार नाहीत जे स्वतः निर्मळ सर्व मंगलाचेही मंगल करणारे पूर्ण ब्रह्मरूप आहेत, त्या श्रीमत् शंकराचार्य गुरूंच्या चरणी माझे शतशः प्रणामअसोत.।।५।।

रचनास्थलम: कॉफी उद्यानवन चिक्कमंगळूर
रचनाकाल: कार्तिक पौर्णिमा शके १८६५

home-last-sec-img