Literature

श्रीरामाची धर्मबुद्धि

सनकादिकांचीं ध्रुवप्रल्हादादिकांची उदाहरणें पाहिली तर परमात्म प्राप्तीकरितां, मोक्षाकरितां व मोक्षसाधनरूपी संन्यासादिकांकरितां मातापित्याची आज्ञाहि पण उल्लंधितां येते हें सिद्ध होतें. इतक्या अधिकाराचा मनुष्यहि विरळा व हा विषयहि वेगळा आहे. परमार्थिकाच्या बाबतींत हें झालें. प्रपंच्यांतल्या व्यावहारिक दृष्टीने मातापित्याची योग्यता सर्वांत अधिक आहे. मोक्षदाता सद्गुरु हा मातापित्याहूनहि श्रेष्ठ असतो हैं ‘गुरुर्गरीयान् पितृतो मातृतश्चेति मे मतिः । या वचनावरून सिद्ध होते. या प्रसंगी श्रीरामाने सामान्यपणे सर्वांना लागू होणारा व्यावहारिक धर्मच पुढे ठेऊन वागल्याचे दिसून येतें. सामान्यांना याचीच आवश्यकता अधिक असते. आपला अधिकार न ओळखता अधिक उडी घेऊन सर्वसामान्य धर्माचा त्याग केल्यास इदं च नास्ति परं न लभ्यते असे होते हे सर्वसामान्य जनाच्या निदर्शनाला आणून देण्यासच जणं श्रीरामाच्या मुखारबिंदांदन अशी वचनें बाहेर पडली. सर्वसामान्य लोकांकरितां सर्वसाधारणपणे एकच नियम असतात. विशिष्टांकरितां याला अपवाद म्हणून विशेष नियम असतात. मोठ्या लाभापुढे कमी प्रतीचे इतक्या महत्त्वाचे ठरत नाही. शते पंचाशत या न्यायाने शंभर या संख्यंत पन्नास या आंकड्याचा साहजिक अंतर्भाव होतो.

नास्ति शक्तिः पितुर्वाक्यं समतिक्रमितुं मम ।

प्रसादये त्वां शिरसा गन्तुमिच्छाम्यहं वनम् ॥(वा. अ. स. २१-३० )

पित्राज्ञा उल्लंधण्याचे सामर्थ्य माझ्या ठिकाणी नाही. मी हा वनाला जात आहे. मला आशीर्वाद दे. पतिआज्ञा पालन केल्याचे श्रेय तुलाहि पण प्राप्त होईल. तुझी ही आज्ञा का एकदां मिळाली म्हणजे माता पिता या उभयतांची आज्ञा पाळल्यासारखे होईल. असा हा श्रीराम कौशल्यामातेचा संवाद
आहे.

धर्मों हि परमो लोके धर्मे सत्यं प्रतिष्ठितम् । धर्मसंश्रितमप्येतत्पितुर्वचनमुत्तमाम् ॥ ४१ ॥

संश्रुत्य च पितुर्वाक्यं मातुर्वा ब्राह्मणस्य वा ।

न कर्तव्यं वीर धर्ममाश्रित्य तिष्ठता ॥ ४२ ॥(वा. रा. अ. २१)

– जगामध्ये सर्वांपेक्षां धर्मच श्रेष्ठ आहे. धर्मांतच सत्याचाहि अंतर्भाव होतो. धर्माप्रमाणें बागल्यास सत्याचे परिपालन अनायासेंच होते. पित्राज्ञेचे पालन करणे हा पुत्रधर्म होय. धर्माचा आश्रय करून राहाणाऱ्यानें माता पिता ब्राह्मण यांची आज्ञा ऐकून ती व्यर्थ होऊं देऊं नये असें लक्ष्मणाबरोबर बोलतांना श्रीरामाने म्हटलेले आहे.

यस्मिस्तु सर्वे स्युरसन्निविष्टा । धर्मो यतः स्यात्तदुपक्रमेत 

द्वेष्यो भवत्यर्थपरो हि लोके । कामात्मता खल्वति न प्रशस्ता 

( वा. रा. अ. स. २१-५८.)

-धर्माचें अनुष्ठान जेथें चालते त्यांच्या हाती सर्व पुरुषार्थ येतात. त्यांना सर्व सुखाचा लाभ होतो. धर्मविरहित अर्थ मात्र केवळ अनर्थच. तो अनर्थ कोणालाहि प्रिय नाहीं. धर्माविरुद्ध असणारी कामना आणि कल्पना केवळ यातनाच असल्यामुळे ती केव्हांहि प्रशस्त होत नाही. ती कोणालाह व्याज्यच ठरणार. अधर्मानें द्रव्य संपादन करणारा अनेक तऱ्हेनें समाजाच्या द्रोहाला पात्र होतो. इतकेच नव्हे तर त्याचा तो पैसाहि पण फार दिवस टिकत नाही. धर्माविरुद्ध असणारी सारी कर्मे नरकालाच कारण होत असल्यामुळे त्यांना प्रशस्त कोण म्हणेल !

यशो ह्ययं केवलराज्यकारणात् । न पृष्ठतः कर्तुमलं महोदयम्  अदीर्घकाले न तु देवि जीविते । वृणे बरामद्य महीमधर्मतः ॥६३॥

केवल तुच्छ अशा या इहलोकींच्या राज्योपभोगाकरितां माझ्या मोक्षफलदायी यशाचा नाश करून घेण्यास मी केव्हांहि तयार नाहीं. विजे प्रमाणे कांहीं काल चमकून नाहीशा होणाऱ्या या क्षणभंगुर जीविताकरितां अधर्मानें या पृथ्वीचें राज्य करण्यास हा राम केव्हांहि उद्युक्त होणार नाही. धर्मविरुद्ध अर्थकामाची प्राप्ति अनर्थकर असते असा हा अर्थ यांतून निघतो.

न बुध्दिपूर्व नाबुध्दं स्मरामीह कदाचन । 

मातॄणां वा पितुर्वाहं कृतमल्पं च विप्रियम् ॥ ८॥ ( बा. रा. अ. स. २२ )

जाणून वा अजाणतां मातापित्यांना अप्रिय आतांपर्यंत मी कधी आचरलें नाही. हे श्रीरामवाक्य कोणाला मातृपितृभक्ति शिकविणार नाही आदर्श पुत्राचे हे पावनचरित होय.

home-last-sec-img