Literature

श्रीराम जाबाली संवाद

याप्रमाणे अनेक प्रकारें युक्तिवाद करूनहि भरताला श्रीरामाचे मन अयोध्येला परत जाण्याविषयी बळविता आले नाही तेव्हां श्रीरामाला मागें परतविण्याकरितां जाबालि ऋषि पुढे सरसावले. सरळ युक्तिवादानें काम होत नाहीं म्हणून जाबालि ऋषींनीं नास्तिकवादाचे अवलंबन केलें. त्याचाहि कांही उपयोग झाला नाही. नुसत्या संपर्कानेच सोने करून टाकणाऱ्या परिसाला आपले स्वरूप देण्याचा लोखंडाने कितीहि आग्रह धरिला तरी ते त्याला कधी शक्य होईल काय 

आश्वासयन्तं भरतं जाबालिब्राह्मणोत्तमः ।

उवाच रामं धर्मज्ञं धर्मापेतमिदं वचः ॥ १( वा. रा. अयो. १०९)

१८ श्लोकांच्या या सबंध सर्वांत जाबालीचेच भाषण आहे. यांपैकी काही निवडक श्लोक घेऊं. हें लोकायत-मतः चार्वाक-मताला मिळतेजुळते आहे. डोळ्याला दिसते तेच खरे चैतन्य शरीराहून भिन्न नाहीं तें शरीराच्या नाशाबरोबरच नष्ट होते. मोक्षसुख म्हणजे शारीरिक सुखच. उचित अथवा अनुचित मार्गानें का होईना एकंदरीत सर्वाधिक देहसुख मिळविणेंच परम पुरुषार्थ होय. स्वर्गनरकादि सर्व कल्पना मूर्खाच्या आहेत. ईश्वर म्हणून कांहीं सत्ता नाहीं. धर्म कर्म सदाचार वर्ण आश्रम यज्ञयागादि अनुष्टानें हे सर्व स्वार्थानें बुद्धिमान् ब्राह्मणांनी मूर्खाना लुबाडण्याकरितां उठ विलेल्या कल्पना आहेत. पूजापाठ श्राद्धपक्षादि वेडगळपणा सूचित करणाऱ्या भावना आहेत. इत्यादि. या मताचे रामानें खंडन केले आहे. म्हणून राम राज्यांत हें मत कोठेहि राहणें योग्य नाहीं.  धर्मापेतमिदं वचःधर्म म्हणून कसला तो यांत आढळणार नाही.

home-last-sec-img