Literature

श्रीसद्‌गुरुस्तुतिनाम प्रकरणं त्रयोदशम्‌‌

श्री सद्‌‌गुरुस्तुति नामक तेरावे प्रकरण— 13 वे

श्रीगुरुं परमानंन्द वन्दे आनन्दविग्रहम्‌‌।।
यस्य सन्निधिमात्रेण चिदानन्दायते मनः।।1।।
अर्थ—— परम आनन्दरुप आणि मूर्तिमंत आनंदोल्लासच अश्या श्री गुरुंना मी वन्दन करितो, ज्यांच्या केवल सान्निध्यानें निःसीम अखण्ड आनन्दच प्राप्त होतो. ।।1।।

नमस्ते नाथ भगवन्‌शिवाय गुरुरुपिणें।।
विद्यावतारसंसिध्यै स्वीकृतानेक विग्रहः।।2।।
अर्थ—— गुरुरुपी भगवान्‌ शंकरांना नमस्कार असो ज्यांनी विद्येच्या ज्ञानप्राप्तीसाठी अनेक मूर्तिमंत अवतार धारण केले आहेत. अर्थात्‌ नानाविध विद्या कलांचे जे श्रेष्ठ गुरु आहेत, ते परमेश्वरी अवतारच होते. ।।2।।

अच्युताय नमस्तस्मै गुरवे परमात्मने।।
स्वारमोक्तपदेच्छूना दत्तं येनाच्युत पदम्‌।।3।।
अर्थर्—— त्या परमगुरुला अच्युताला नमस्कार असो, जो आत्मारामामध्येच रममाण होवूं इच्छिणार्‌या साधकांला अच्युत पद अढळ पद प्राप्त करुन देतो. ।।

नमोच्युताय गुरवेज्ञानध्वान्तैक भानवे।।
शिष्यसन्मार्गपटवे कृपापीयूषसिन्धवे।।4।।
अर्थ—— त्या अच्युत कधीही पराभूत न होणार्‌या अश्या गुरुला, अज्ञानरुपी पापअंधःकाराचे नाश करणार्‌या सूर्याला नमस्कार असो. शिष्यांना सन्मार्ग दाखविण्यात प्रवीण असणार्‌‌या त्याच प्रमाणे कड्डारुपी अमृताचा सागरच की काय अश्या महाकनवाळू गुरुस नमस्कार असो. ।।4।।

नमोच्युताप गुरवे शिष्यसंसारसेतवे।।
भक्तकार्येकसिंहाय नमस्ते चित्सुखात्मने।।5।।
अर्थ——त्या गुरुस जो अच्युत आहे आणि शिष्यांना संसारसागरांतून पार करण्यास सेतुचाच अवतार धारण करतो अश्या अक्षय आनंदरुपी भक्त कार्य करण्यास सिंहासारखा (मोठा सामर्थ्यशाली असून) वाटा उचलतो, त्यास वंदन असो. ।।5।।

नानायुक्तपदेशेन तारिता शिष्यसन्ततिः।।
कृपासारवेदेन गुरुश्चित्पदमच्युतम्‌‌।।6।।
अर्थ—— शिष्यरुपी पुत्रांना नाना प्रकारच्या उपदेशांनी युक्त अश्या वेगवेगळया युक्त्या वापरुन (त्यांस सज्ञान करुन) त्यांजवर जो गुरुकृपा करितो त्यामुळे गुरु हे त्यास अविनाशी अच्युतपदाची प्राप्ती करुन देतात. ।।6।।

सच्चिदानंदरुपायध्यापिते परमात्मने।।
नमः श्रीगुरुनाथाय प्रकाशनन्द मूर्तये।।7।।
अर्थ—— श्रीगुरुनाथांना नमस्कार असो. जे परमात्मरुपाने सर्वत्र व्याप्त झाले आहेत आणि ते ज्ञान प्रकाशरुपाने आनंदाची केवळ मूर्तिच आहेत.।।7।।

सत्यानन्दस्वरुपाय बोधैकसुखकारिणें।।
नमो वेदान्तेद्याय गुरवे बुद्धिसाक्षिणे।।8।।
अर्थ——त्या सत्‌—चित्‌‌—आनंदरुपाने ज्ञान हे एक. कारण आहे कीं ज्यामुळे खरे सूख प्राप्त होते. त्या गुरुला वंदन आहे कीं ज्यामुळे वेदांचे सार ज्ञात होण्यास बुध्दिरुपाने साक्षीभाव उत्पन्न होण्यास ते कारक आहेत.।।8।।

नमस्ते गुरवे तुभ्यं सहजानन्दरुपिणे।।
यस्य वागमृतं हन्ति विषं संसारसंज्ञिकम्‌‌।।9।।
अर्थ—— सहज आनंद हेच एकरुप आहे अश्या गुरुला वंदन असो. संसारनामक विष्रााचे जे नन करते, अश्या वाणीरुपी अमृताचे दाते अश्या गुरुंना नमस्कार आहे. ।।9।।

गुरुरेको जगत्सर्वं ब्रह्मविष्णुशिवात्मकः।।
गुरोः परतरं नास्ति तस्मात्सम्पूजयेद्‌गुरुमई।।10।।
अर्थ—— गुरु हेच एक सर्वविश्वात्मक प्रतीकरुप आहेत. ब्रह्मा, विष्णु आणि शिवरुपांत ते गुरुरुप समाविष्ट आहे. गुरुपेक्षा वरचढ कोणी नाही, म्हणून त्या गुरुलाच वंदन आहे. ।।10।।

सर्वश्रुतिशिरोरत्न राजितपदाम्बुजम्‌‌।।
वेदान्तार्थप्रवक्तारं तस्मात्सम्पूजयेद्‌गुरुम्‌‌।।11।।
अर्थ—— सर्व वेदांच्या शिरावरील रत्नमणि, ज्यांचे पदकमल शोभिवंत आहेत. वेदांचा अर्थ समजावून सांगणारे म्हणून गुरुचे सर्वप्रकारे सुपूजन करावे।।11।।

यस्य स्मरणमात्रेण ज्ञानमुत्पद्यते स्वयम्‌‌।।
स एव सर्वसम्पत्तिस्तस्मात्सम्पूजयेद्‌‌ गुरुम्‌‌।।12।।
अर्थ—— ज्यांच्या केवळ स्मरण करण्याने ज्ञान, स्वयंभूपणे प्रकट होते, तेच सर्व प्रकारांनी वरिष्ठ अशी सम्पत्ति आहेत म्हणून त्यांचे सर्वप्रकाराने मनःपूर्वक पूजन करावे. ।।12।।

गुरुभक्तिं सदा कुर्याच्छे्रयसे भूयसे नरः।।
गुरुदेव हरिः साक्षान्नान्य इत्यब्रवीच्छ्रतिः।।13।।
अर्थ—— गुरु हेच ब्रह्म, गुरु हेच विष्णु, आणि गुरु हेच शिव आहेत. तिन्ही लोकांत गुरुशिवाय पूज्य कोणीच नाही, म्हणून त्यांस वंदन करावे. ।।13।।

इति श्रीसमर्थरामदासासानुगृहित श्रीरामपदपंङ्‌‌कजभृङगायमान श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य भगवता श्री श्रीधरस्वामिना विरचिते मुमुक्षुसखः ग्रन्थे श्रीसद्‌गुरुस्तुतिर्नाम त्रयोदशं प्रकरणं सम्पूर्णम्‌‌।

home-last-sec-img