पूर्ण विश्रांतीचे स्थळ कोणते असेल तर ते श्रीसमर्थच. सर्वजनांना तारणारा समयीचाही समर्थ आपलेच पद आपल्या दासाला देतो, हेच श्रीसमर्थ संप्रदायाचे लक्षण आहे. आराधने प्रमाणंच त्यांची प्रकृती बनते. श्रीरामरायाच्या आराधनेने महान सामध्यं बाणते. रघुनाथ भजने ज्ञान झाले त्याच्या भजना मुळेच मला ज्ञान झाले असे श्रीसमर्थ म्हणतात. गुरुशिष्यांचा संप्रदाय म्हणजे काय ? गुरुनी आपले स्वरूप आपल्या शिष्यास द्यावयाचे. प्रत्यक्ष श्रीरामच श्रीरामदासरूपाने अवतरले आहेत.
उपासना कशासाठी ? तर ते एक ध्येय आहे. आपले जीवन कसे बनवावयाचे याचा विचार करून त्याप्रमाणे करावे. ज्याची जशी आराधना असेल त्याप्रमाणे ते बनतात, होतात. ज्याप्रमाणे निश्चय बसतो त्याचप्रमाणे मरणानंतर त्याचा किए देह होतो. ‘ अन्ते मतिःसा गतिः ।’ श्रीरामाची उपासना, आराधना सर्वच दृष्टीने योग्य आहे. एकवचनीराम, धैर्यमूर्तीराम, उद्गुणनिश्रीराम, बीतिमर्यादाचाम, मर्यादा पुरुषोत्तमराम अधा उन्हेने अत्युत्तम गुण अंगी बाणण्याची इच्छा असेल तर त्यांची श्रीरामाचो श्रेष्ठ अशी उपासना करावी. से/वला देव देवांचा तेणे मी धन्य झालो
श्रीसमर्थ हा शब्दच मुळी उच्चारताच अंगात सामर्थ्य बाण लगते. त्या सामर्थ्याति नितांत शांती व आपोआप समाधान आहे आणि म्हणूनच देवांचा देव श्रीरामप्रभु त्याला मी शरण गलो, त्याची मी सेवा केली. सेविला देव देवाचा । तेणे मी धन्य जाहलो || असे श्रीसमथनो म्हटले आहे. अशा श्री रामचंद्र गुरुंचा आदर्श ठेवणे म्हणजे त्यांची इच्छा काय आहे ते ओळखून त्याप्रमाणे वागणे. त्यांनी घालून दिलेल्या मार्गाचे अवलंबन केले पाहिजे. मार्ग कथाकरता असतो ? तर नेमक्या ठिकाणी जाण्यासाठीच असतो. थोरामोठ्यांची चरित्रे आपले दुःखमय ‘जीवन सुखकर करून दाखवितात. ‘समय समर्थ करावें ।’ समर्थ संप्रदाय म्हणजे समर्थ बनण्याचा संप्रदाय आहे, देवाला शरण जाण्यापूर्वी सर्वच पांगळे दुर्बल असतात पण एकदा शरण गेले की देवाची कृपा पर्वताचे उल्लंघन करवू शकते पंगुं लंघयते गिरीम् !”
मनो घरावे ते होते | विघ्न अवधेचि नासोनि जाते । कृपा केलिया रघुनाथे । प्रचीत येते || “
श्रीराम कृपेने संकल्प सिद्धी होते, योग्य तो मार्ग सापडतो, आनंदाचे निधान हस्तगत होते, देहाला उत्तम वळण लागते. देहःचे सोने होते. शाश्वत सुखाचा अनुभव मिळतो. अशा प्रकारे हा समर्थ होण्याचा संप्रदाय आहे. ह्या संप्रदायातलेच श्रीमारुताराय. आपल्या शक्तीने त्यांनी श्रीरामाचे परमपद प्राप्त केले. सद्गुण निधी, वैराग्याची खाण, तापस्याषी मूर्ती, भक्तीचा महामेरू, उपासनेचे लद्ग, प्रेमसमुद्र मया मारुतीरायावे मनाला जिंकले. रामभक्तीने तो रामरूप बनला.
आपल्या स्वरूपाचे अनुसंधान म्हणजेच परमात्म्याचे अखंड चिंतन होय म्हणूनच जेवताना ‘वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे | सहन हवन होते नाम घेता फुकाचे || जिवन जिवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म । उदरभरण नोहे जाणिज यज्ञकर्म || ‘ परमात्म्याचे नाव घेण्यासच श्रीसमर्थ सुचवितात. परमात्म्याच्या वात्सल्याचे निरतिशय प्रेम म्हणजेच भक्ती. कोणत्याही कर्माची पूर्ती भवताशिवाय होत नाही. आत्मचैतन्या मूळच सर्व ज्ञान प्राप्त होते.
धर्माधम कोणाला विचारावयाचे ! तर ज्याच्या ठिकाणी रागद्वेषाचा मागमूस नाही त्यालाच. त्या परमात्म्याची कृपा हा अफाट अमा, अयोग, भयंकर अगा भवसागर तरून जाण्यासाठीच. हो सोलीव चैतन्याचा भववैद्य आहे. ‘भिषजे भवरोगिणाम् ।’ भवरोग्यांना विषय हाच एक रोग आहे आणि त्या रोगापासून मुक्त करण्याचे सामर्थ्य, सामर्थ्याने युक्त असलेल्या समर्थाशिवाय दुसन्या कोणाला असणार? आणि म्हणूनच समर्थे समर्थ करावे | खरोच समर्थ म्हणवावे ।’ असे म्हटले आहे.
परमार्थात विघ्ने फार. पण श्रीरामभक्तीने मनी धरावे ते होते । विघ्न अवघेची नासूनि जाते।’ जितके ध्येय तितकी विघ्नेही फार. ‘ श्रेयांसि बहु विघ्नानि । विघ्नांना तोंड देतो तो विश्ववद्य होतो. भगवताच्या चरणी लीन झाल्यावर तेजस्वी मनुष्य उत्कट परमार्थात सर्व गुणांनी, सौंदर्शने कर्तृत्वाने, अविष्काराने उजळून निघतो. उत्कट महिमा तोच परमात्म्याचा महिमा. आहे की, त्याच्या भक्तीमुळे तो त्याच्या ज्ञानाची इतकी महती भक्त परमात्माच होतो, परमात्मा म्हणवून घेतो. व तोच तो होतो. त्याच्याकडून
निराळा असा हो शिल्लकच पहात नाही. तो एकरूप होतो, मिसळून जातो. ज्याची उपासना जशी तसाच तो बनतो, ‘झाले साधनाचे फळ ।’ म्हणूनच श्रीनाथ हा श्रेष्ठ, बोर व विश्ववद्य त्याची भक्ती करणारेही श्रेष्ठ, थोर व विश्वबंधन होतात. थोरांची कास धरली तर ती थोरपणालाच नेते, बसे श्री समर्थांनी स्वतः करून दाखविले आहे.
मापणही सर्वजण त्यांच्या सान्निध्यात त्यांच्या उत्सवासाठी जमलो आहोत. त्यांचे पूजन, मनन, हमरण करून आपणही त्यांच्या पदाला शोभेल असेच दतू. श्रोसमर्थ संप्रदायाचे म्हणून म्हणवून घेण्यास अधिकारी होवू म्हणून प्रयत्न करू असा दू विश्वास बाळगा ! निश्चय करा. मग अ.पोआप तुमच्यावर श्रीसमर्थांची कृपा होवो अशी श्रीसमर्थचरणी मी प्रार्थना करतो.