Literature

श्री अगस्त्यमहर्षि स्तोत्रम्‌‌

(शार्दूलविक्रीडितवृत्तम्‌‌)

जीवोद्धारपरायणा सुसरिता कावेरिनामाङिकता
यच्छक्तिः सुमहोज्वला सुखघना राराजते क्ष्मातले।
वातापील्वलराक्षसावृषिमुनिस्वाध्यायविध्वंसिनौध्वस्तौ
येन तपोबलात्तमनघं तं नौम्यगस्त्यं गुरुम्‌‌…..।।1।।

अर्थ— सर्व जनोद्धारक “कावेरी“ नावाची नदी जी अत्यंत पवित्र असून ज्यांच्या सामर्थ्याने अत्यंत उज्वल रीतिने अत्यन्त सुखदायी अशी ह्या पृथ्वीवर सुशोभित होते, त्या निर्मल निष्कलंक अश्या अगस्तिमुनिंना जे तपोबल सम्पन्न आहेत, त्यांना वंदन असो. वातापि आणि इल्वरु नामक दोन असुरांनी आपल्या स्वाध्याय आणि तपांत निमग्न असणाऱ्या ऋषिमुनींना त्रस्त केले होते. त्यांच्या कार्याचा व त्यांचा ते राक्षस विध्वंस करीत होते. अश्या राक्षसांचा आपल्या तपोबलाने ज्या महामुनिंनी विध्वंस केला त्या अगस्ति ऋषिंना वंदन असो.

सिद्धानामतिशायिशक्तिविभवं सामर्थ्यमूर्तिं गुरुं
कन्दर्पोद्धतदुष्टदर्पकरिनुच्छार्दूलकीर्तिप्रभम्‌‌।
दुष्टारण्यविनाशनैकबलभृद्दावानलं शोभनं
वन्दे कुम्भजमद्गुतं भवभयभ्रान्त्यर्णवापोशनम्‌‌। …..।।2।।

अर्थ— सिध्द तपस्वी ऋषिंमध्ये अतिशय यशोवैभवाने झळकणारे सामर्थ्य संपन्न गुरु, मदनाच्या संचारामुळे अतिशय बेफाम झालेल्या हत्तिला सिंहाप्रमाणे पराभूत करुन त्याच प्रमाणे दुष्टभावनारुपी अरण्याला आपल्या सामर्थ्यरुपी दावाग्निना जाळून खाक केले. भ्रांति रुपाने पसरलेला हा भवभय रुपी समुद्र ह्या एका घटामधून उत्पन्न झालेल्या ऋषिने एका घोटातच पिउन टाकला व त्याचा नाश केला त्यास वंदन आहे. ।।2।।

home-last-sec-img