Literature

श्री कृष्णाष्टकम्‌ – (अनुष्टुप्‌छन्दः)

ब्रम्हानन्दैकगात्राय ब्रम्हानन्दस्वरुपिणे।
ब्रम्हानन्दप्रबोधाय श्रीकृष्णाय नमो नमः।।1।।
ब्रम्हस्वरूप हेच ज्याचे गात्र आहेत, ब्रम्हानन्द हेच ज्याचे रूप आहे, ब्रम्हानन्दाचा बोध (ज्ञान) करण्यासाठीच म्हणजे ते ज्ञान प्राप्त करवून घेण्यासाठीच श्रीकृष्णाला वारंवार वंदन करतो ।।1।।

देवदेवाय शान्ताय स्वानन्दघनरुपिणे।
ब्रम्हानन्दरसज्ञाय श्रीकृष्णाय नमो नमः।।2।।
देवाधिदेव स्वतःच्या परमानन्दांतच ज्याचे शान्त आनन्ददायक रूप आहे, ब्रम्हानन्दाचा आनन्द जाणणाऱ्या त्या श्रीकृष्णाला नमस्कार असो ।।2।।

सच्चिदानन्दरूपाय मोक्षैकसुखकारिणे।
आदिमध्यान्तशून्याय श्रीकृष्णाय नमो नमः।।3।।
सत्‌ चित्‌ आणि आनन्द हेच ज्याचे रूप आहे,मोक्षसुखाचे हे एकच कारण आहे, ज्याचा आदि मध्य व अन्त हा शून्यांत आहे अशा श्रीकृष्णाला माझा नमस्कार आहे ।।3।।

अज्ञानध्वान्तसूर्याय हिममोहविदारिणे।
आत्मज्ञानदिनेशाय श्रीकृष्णाय नमो नमः।।4।।
मोहाचा नायनाट करणारा त्याच प्रमाणे अज्ञानाचा नाश करणारा सूर्यच ह्या प्रमाणे चमकणाऱ्या (ज्या प्रमाणे सूर्यप्रकाशाने अंधार आणि हिम ह्‌यांचा नाश होतो) तश्या आत्मतेजाने झळकणाऱ्या श्रीकृष्णाचे मी वंदन करतो ।।4।।

भक्तचकोरचन्द्राय स्वानन्दामृतदायिने।
नित्यमङ्‌गलरूपाय श्रीकृष्णाय नमो नमः।।5।।
भक्त हाच जणू चकोर पक्षी आहे, त्यास चन्द्राप्रमाणे हवा हवासा वाटणारा, स्वानन्दरूपी अमृत प्रदान करणारा नित्य ज्याचे रूप मंगलच आहे ह्या श्रीकृष्णाचे मी वंदन करतो ।।5।।

भक्तचातकमेघाय सद्धोधजयवर्षिणे।
आत्मानन्दान्नदात्रे च श्रीकृष्णाय नमो नमः।।6।।
भक्त हाच कोणी चातक पक्षी आहे, त्यास मेघाप्रमाणे हवाहवासा वाटणारा, सुवचनरूपी बोधाची वर्षा करणारा (गीता आदि द्वारे) आत्मानंद हेच जणु कांही पोषक अन्न आहे त्याचे दान करणारा त्या श्रीकृष्णाला मी वंदन करितो ।।6।।

तापत्रयविनाशाय भक्तहृत्‌कुमुदेन्दवे।
सुशान्तिप्रददात्रे च श्रीकृष्णाय नमो नमः।।7।।
तीन प्रकारच्या दुःखांचा नाश करणारे, भक्तहृदय हेच जणूं कमल आहे त्यास उमलविणाऱ्र्‌या चन्द्राप्रमाणे आणि निर्मल शान्ति प्रदान करणाऱ्या श्रीकृष्णास मी वारंवार नमन करितो ।।7।।

विदेहदेहरूपाय ब्रम्हानन्दप्रदायिने।
श्रीजगद्‌गुरवे तुभ्यं श्रीकृष्णाय नमो नमः।।8।।
जो विदेही निर्गुण असून देहधारक पण आहे (सगुण पण आहे) आणि ज्यापासून ब्रम्हतत्वांत आपल्या एकत्वाचा बोध होतो त्या जगद्‌गुरू श्रीकृष्णाला मी वंदन करितो ।।8।।

श्रीधरेण कृतं स्तोत्रं श्रीकृष्णजननोत्सवे।
पठतां शृण्वतां नित्यं मोक्षश्रीवरदायिनी।।
श्रीकृष्ण जन्माचे वेळेस जन्माष्टमीस परम परिव्राजक आचार्य श्री श्रीधरस्वामी ह्‌यांनी हे स्तोत्र लिहीले आहे. हे जो नित्य पठण करेल किंवा श्रवण करेल त्यास मोक्षप्राप्ती होवूं शकते ।।

।। इति श्रीकृष्णाष्टकं सम्पूर्णम्‌ ।।

home-last-sec-img