Literature

श्री कृष्णाष्टकम्‌ – (वसन्ततिलकम्‌)

यद्‌ब्रम्ह निर्गुणमिति श्रुतयो वदन्ति
यद्दिव्यभक्तिवशगः स्थिरसौख्यमेति ।
यस्मिन्‌ स्थिते तु भवमेति पुनर्न कश्चित्‌
तत्कृष्णदिव्यपदपङ्‌कजमाश्रयेहम्‌ ।।1।।
जे ब्रम्ह निर्गुण आहे असे श्रुति म्हणतात, जे दिव्यभक्तिला वश होते असे ते स्थिर अर्थात्‌ टिकणारे सौख्य आहे. ज्यामध्ये एकदा स्थान मिळाल्यावर भवसागरांत पडावे लागत नाही त्या भगवान श्रीकृष्णांच्या पदकमलाचे मी (चिंतन करून) आश्रय मिळवू इच्छितो ।।1।।

यस्मिन्न जीवजगदादिकबन्धजालम्‌
ब्रम्हैव यत्स्वमहसैव सदा चकास्ति ।
यस्मिन्‌ परे सुखघने न विभिन्नमीषत्‌
तत्कृष्णदिव्यपदपङ्‌कजमाश्रयेहम्‌ ।।2।।
ज्या ठिकाणी जीव आणि जगत्‌ हे आदि अंतारहित म्हणजे कबंध नामक राक्षसासारखे भासते (कबंध राक्षस म्हणजे नुसते धड —मस्तकाविरहित शरीर हालचाल करणारे असे त्या विद्रूपरूप होते ) तो दुःखदायक त्रासकर्ता होता, आणि जगतांत तसे म्हटलेतर सर्वत्र ब्रम्हतत्वाच्या पलीकडे त्याशिवाय जास्त सुखरूप असे कांहीच नाही. त्या दिव्यतत्वाचे श्रीकृष्ण पदकमलाचे आश्रय स्थान मला प्राप्त होवो अशी मी आशा करितो. ।।2।।

कार्यं न कारणमपीति न यस्य किञि्‌चत्‌
स्वानन्दमात्रमिह यत्परिपूर्णमेकम्‌ ।
माया न तत्सकलकार्यमुदेति यस्मिन्‌
तत्कृष्णादिव्यपदपङ्‌कजमाश्रयेहम्‌ ।।3।।
ज्याचे कांहीच कार्य आणि कारण नाही अर्थात जे स्वयंभू आणि निर्लिप्त आहे, एकमात्र आत्मनंदानेच जे परिपूर्ण भरलेले असून ओसंडत आहे, ज्यांत मायेचे कोणचेच कार्य कांहीच प्रभाव पाडत नाही (तो मायापतिच आहे त्याच्या समोर माया प्रभावहीन होते) त्या देव भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे मी भजन करितो. त्यासच इच्छितो. ।।3।।

यन्नेति नेति वचनैर्निगमा अवोचुः
नश्येन्न यत्क्वचिदिहास्य विनाशकत्वात्‌ ।
यच्छाश्वतं विततमद्वयचित्स्वरूपं
तत्कृष्णदिव्यपदपङ्‌कजमाश्रयेहम्‌ ।।4।।
ज्याचे वर्णन वेदांनी (न इति न इति नेति) असे केले आहे ह्याच्या अविनाशित्व हा गुण असून हा कश्यानेही नष्ट होवू शकत नाही. (म्हणून अद्वितीय आहे) हे सतत अक्षय आणि अनन्त एकमेव अद्वितीय असे आहे. विस्तीर्ण रूप आहे.त्या दिव्य श्रीकष्णपदाचा मी आश्रय घेवू इच्छितो. ।।4।।

यस्मिन्न किल्विषमिदं किल देहजातं
यस्मिंस्तथा न खलु भाति मनःकृतं यत्‌ ।
यस्मिन्न जन्मगुणकर्मजपाशबन्धः
तत्कृष्णदिव्यपदपङ्‌कजमाश्रयेहम्‌ ।।5।।
शरीरापासून उत्पन्न होणारे कोठलेही विकार,कर्मफले त्यांस लिंपित होत नाही.ज्यास मानसिक विकार—पाप आदि पण दूषित करीत नाहीत. ज्यांत जन्म,गुण(सत्व,रज,तम,त्रिगुण) ह्या पासून होणारे कोठलेच विकार बंधन करित नाहीत तो आनन्द सदा निर्मळ व एकसारखाच चिर असा टिकणारा असतो.अश्या श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे मी आश्रय घेतो. ।।5।।

ब्रम्हाण्डमीदृगथवा न तथैव पिण्डं
पुंस्त्री तथा च पुरूषः प्रकृतिर्न यत्र।
सर्वज्ञ ईश इति यत्र च नैव जीवः
तत्कृष्णदिव्यपदपङ्‌कजमाश्रयेहम्‌ ।।6।।
ज्या पदाच्या ठिकाणी पिंड ब्रम्हाण्ड असा भेद नाही, ज्यांत स्त्री पुरूष हा भेद नाही. सर्वत्र ईशतत्वच भरलेले असून जीव म्हणून दूसरे तत्वच भरलेले नाही अर्थात्‌ अद्वैताचाच अनुभव येतो त्या दिव्य श्रीकृष्ण पदकमलांचे मी आश्रय घेण्यासाठी लालायित झालो आहे. ।।6।।

यन्मङ्‌गलं परमहोखिलमङ्‌गलानां
सत्यस्यसत्यमिति यत्प्रथितं च वेदैः ।
यत्सौख्यलेशत इमे त्रिदशाश्च धन्याः
तत्कृष्णदिव्यपदपङ्‌कजमाश्रयेहम्‌ ।।7।।
जे मंगलाचे पण परमंगल आहे, वेदांनी पण घोषित केले आहे की सत्याचे पण परमोच्च सत्यतत्व म्हणजे हेच परब्रम्हतत्व आहे. सर्व देवलोकपण (त्रिदशाः) ह्‌या परमतत्वाच्या एका लेशानेच धन्य झाले आहेत त्या दिव्य श्रीकृष्ण पदकमलांचे मी आश्रय स्थान मिळवू इच्छितो. ।।7।।

यत्सर्वचेतनमहोपि न यत्र सर्वं
स्वेनैव सर्वहृदयेहमिति स्फुटं यत्‌ ।
ज्ञात्वा स्वसौख्यमिति यन्मुनयो विमुक्ताः
तत्कृष्णदिव्यपदपङ्‌कजमाश्रयेहम्‌ ।8।।
ज्याच्यासमोर मोठ्‌यांतमोठे चैतन्य(संपन्न प्राणीपण) आपला प्रभाव दाखवूं शकत नाही, ज्याच्या स्वचैतन्य प्रभावानेच सर्व प्राणीमात्र आपल्या हृदयांत अहं तत्वाचे भान प्राप्त करितात, ज्याला जाणल्यावर मुनिजन हे मुक्ति प्राप्त करून भवबंधनांतून निर्लिप्त होतात, त्या दिव्य पदकमलांचे मी आश्रय ग्रहण करतो. ।।8।।

त्रैलोक्यपावनी पुण्या मुक्तिदा कृष्णसंस्तुतिः ।
भद्रं तनोतु लोकेषु गङ्‌गेव किल सर्वदा ।।9।।
त्रैलोक्याला पवित्र करणारी ही श्रीकृष्णाची स्तुती सर्वलोकांस गंगेप्रमाणेच पुनीत करो. ।।9।।

रचनाकाळ: श्रीकृष्णजन्माष्टमी, संवत्सर— १९४३
रचनास्थळ: कॉफी उद्यान, चिक्कमगळूरु
मराठी अनुवादक: सौ. नलिनी प्रभाकर पाटिल, इंदूर

home-last-sec-img