Literature

श्री गणेश प्रार्थना

श्रीविनायको विजयतेराम्‌
(वसन्ततिलका वृत्तम)
आनन्दरुप करुणाकर विश्वबन्धो।
सन्तापचन्द्र भववारिधिभद्रसेतो।
हे विघ्नमृत्युदलनामृतसौख्यसिन्धो।
श्रीमन्‌विनायक तवाङ्‌घ्रियुगं नतास्स्मः।।1।।
अर्थ— हे आनंदरुपा, करुणाकरा, विश्वबन्धो, कष्टताप शमविणाऱ्या चन्द्रा संसारसागरातील कल्याणकारी सेतो, हे विघ्नरुप मृत्यूचा नाश करणाऱ्या अमृतमय सौख्यमुद्रा, श्रीमत्‌ विनायका! तुझ्‌या चरणी आम्ही लीन झालो आहोत. (1)

यस्मिन्न जीवजगदादिकमोहजालम्‌।
यस्मिन्न जन्ममरणादिभयं समग्रम्‌।
यस्मिन्सुखैकधनभूम्नि न दुःखमीषत्‌।
तद्‌ब्रह्म मङ्‌गलपदं पव संश्रयाम्‌ः ।।2।।
अर्थ—— ज्या ठिकाणी जीव, जगत्‌ इत्यादी मोहजाल नाही आणि जन्म मरणाचे लेशमात्रही भय नाही, तसेच सुखमय आणि अविरल तेज असलेल्या, ज्या ठिकाणी किंचिन्मात्रही दुःख नाहीं, त्या ब्रह्मस्वरुप, मंगलमय अशा तुझ्‌या पदाचा आम्ही आश्रय करीत आहोत. (2)

विद्यावतार तव कोशशुभोदयो यः।
भास्वत्सुखोदयवदेव तमोनुदस्स्यात्‌।
आनन्दमात्रनिजरुपपदं वितन्वन्‌।
राराजतां भुवि सदैव सुखैकधामन्‌।।3।।
अर्थ—— हे विद्यावतारा, तुझा जो (हा) कोशरुपी शुभकारक उदय झालेला आहे, तो सूर्याच्या सहज झालेल्या उदयाप्रमाणे अंधार नष्ट करणारा होईल. सुखाचे एकमात्र स्थान असलेल्या (विनायका,) केवळ आनंदरुप आणि स्वस्वरुपाला प्रकट करणारा (हा कोश) या जगात सदा सर्वकाल विराजत राहो. (3)

हे भक्तवत्सल तवैव कृपाब्धिजातः।
त्वक्कोशकल्पतरुरत्र शुभं तनोतु।
त्वत्प्रीतिभाक्‌ तव कुपापरिपोषितोऽयम्‌।
त्वत्पादकञजयुगले सुसमर्पितोऽस्तु ।।4।।
अर्थ—— हे भक्तवत्सला, तुझ्‌याच कृपासागरात निर्माण झालेला, तुझा हा कोशरुपी कल्पवृक्ष या जगात कल्याणाची सुखसमृध्दी करोतुझ्‌या प्रीतीला पात्र असणारा आणि तुझ्‌या कृपाप्रसादाने समृद्ध झालेला हा कोश तुझ्‌या चरणारविंदी सुखासमाधानाने अर्पण केलेला आहे. (4)

नित्यं समाधिकुसुमार्चितपादपद्म।
आम्नायदीपपरिशोभितदिव्यगात्र।
सन्मङगलानि विदधत्परमोक्षदो यः।
नित्यं चकास्तु भुवि वैदिकविश्वधर्मः।।5।।
अर्थ—— प्रतिदिनी समाधिरुपी पुष्प वाहून ज्याच्या चरणकमलांची पूजा केली आहे आणि वेदस्वरुप दीपज्योतींनी ओवाळल्यामुळे ज्याचे दिव्य शरीर उजळून निघाले आहे, (अशा हे विनायका,) शाश्वत मंगल धारण करणारा आणि अंतिम मोक्ष देणारा जो वेदप्रणीत विश्वधर्म, तो या विश्वांत सदैव आपल्या तेजाने तळपत राहे, (हीच प्रार्थना आहे.)
(5)

।। इति शम्‌।।

(श्रीमत्‌ प.प.श्रीधरस्वामी महाराज, सज्जनगड, यांनी संपादकांच्या प्रार्थनेनुसार श्रीगणेश कोशासाठी पाठविलेल्या शुभाशीर्वादाच्या मूळ संस्कृत श्लोकांचा हा मराठी अनुवाद. अनुवादकः पं.दा.प्र.पाठकशास्त्री, पुणे.)

home-last-sec-img