Literature

श्री दत्ताशिषः

(स्त्रग्धरावृत्तम्‌)

आशीर्वादाचे दान

तेराकोटी जप पूर्ण झाल्यावर सज्जनगढा वर प. पू. भगवान श्रीधरांनी दिलेले आशीर्वचन

रामो लोकाभिरामो जनकृतजपतो भक्तितः सुप्रसन्नः
भूत्वेदं विश्वमेवं ह्यवतु निशि दिवा पोषयन्‌ वेदधर्मम्‌।
भक्तिं भुक्तिं च दत्वा सुकृतिमपि तथा सन्मतिं शान्तचेताः
आत्मज्ञानं स्वनिष्ठां स्वपरहितभृतं जीवनं मुक्तिमेवम्‌ ।।1।।
हे राम! तूं सर्वलोकप्रिय आहेस ;लोकाभिरामद्धण्लोकांनी जप करून, सतत भक्ति करून तुला प्रसन्न केले आहे,रात्रंदिवस धर्माचे पोषण करून त्यांस भक्ति आणि मुक्ति प्रदान करून तसेच त्यांना शुध्द बुध्दि, शान्त चित्त, आत्मज्ञान, स्वनिष्ठा आपपरपूरक जीवन आणि सुकृति (चांगले कर्म) करण्याची बुध्दि प्रदान करून ह्‌या सर्व विश्वाचे रक्षण कर (विश्वं अवतु) ।।1।।

ब्रह्मेशानादिरूपैर्जयतु भवहरो जानकीप्राणनाथः
धीरो वीरो हनुमान्‌ जयतु गुरूरहो रामदासो यमिन्द्रः।
वेदो यो विश्वसेतुर्जयतु भयहरो विश्वमोक्षैकहेतुः
शान्तो दान्तश्च तृप्तो जयतु मुनिगणो ज्ञानविज्ञानपूर्णः ।।2।।
ब्रम्ह, ईश्वर, आदि अनादि (अर्थात्‌ ज्याच्यापूर्वी कुणी ही नाही तो अनादि) अश्या रूपाने जो ह्‌या भवभयाचे हरण करितो अर्थात्‌ जन्ममृत्युरूप भयाला दूर करतो तो जानकी नाथ श्रीराम विजयी होवो.त्याचा जय हो.मुनिवरांचा राजा जो धैर्यशील,वीर आणि साक्षात्‌ हनुमन्तच आहे, असे गुरूराज—रामदासस्वामी महाराज ह्‌यांचा जयजयकार आहे. ह्‌या विश्वापासून मोक्षापर्यंत नेणारा सर्वसुखकर असा सेतुच जो आहे असा म्हटला जातो, मानला जातो त्या शान्त दान्त तृप्त मुनिगणांचा अग्रणी, ज्ञान विज्ञानाचा ज्ञाता अश्या गुरूराजाचा जय असो।।2।।

राष्ट्रं च यूयं सकलजगति भो ब्राम्हणा ब्रम्हनिष्ठाः
स्वाध्यायासक्तचित्ता विरतिमतियुता भक्तिनम्रा गुणाढ्‌याः।
गां देवं वेदमेवं गुरूमपि च तथा सर्वदा सेवमानाः
शुध्दाः श्रेष्ठाश्च शान्ताः श्रुतियुतकृतिभिः प्रीणयन्तोत्र विश्वम्‌ ।।3।।
ब्रम्हतत्वावर एकनिष्ठ अश्या श्रध्दाधरक ब्रम्हणांमुळे तसेच स्वाध्याया मधेच आसक्त झालेल्या विद्वान्‌ आणि भक्तिपूर्ण अंतःकरणाने विनम्र अशा गुणीजनामुळे परिपूर्ण अश्या सर्वांमुळे तुम्हामुळे, हे राष्ट्र धन्य होवो. हे सर्व विश्वच ह्‌या संपूर्ण गुणांनी ओतप्रोत होवो ते गुण म्हणजे गाई—ब्र्राम्हण—वेदोक्त ज्ञान—प्रीतिपुर्णता—गुरूजनांची सेवा करणे अर्थात्‌ आमच्या शास्त्रांनी सांगीतलेल्या रीतिनुसार कर्मे करणे व शान्त विचारशील होणे हे होत ।।3।।

भूयाद्धर्मप्रवृत्तं जगदिदमनिशं सर्वदा भक्तिनम्रं
नन्देत्सर्वत्र सर्वं विरतिमतियुतं कर्मभिः पावनैश्च।
भो भो विप्राश्च युष्मत्सुकृतिभरवशान्मङ्‌गलं सर्वतः स्यात्‌
सर्वेषां जीवनं तत्कलिमलरहितं स्वात्मनिष्ठं सुदिव्यम्‌ ।।4।।
भक्तियुक्त नम्रतेने परपिूर्ण धर्मशील असे हे जग सर्वश्रेष्ठ शक्तिशाली(अनीश अर्थात्‌ त्याच्यापेक्षा श्रेष्ठ ईश असा त्याच्यावरचा कोणी नाही तो अनीश) पवन पवित्र कर्मा मुळे हे जग सर्वत्र यथायोग्य विचारांनी परिपूर्ण होवो आणि आसक्ति रहित (विरतिमति) होवो.सुखाने नांदो. हे विप्रांनो अर्थात्‌ विद्वान्‌ अश्या ब्राम्हणांनो! आपल्या शुभकर्मांनी परिपूर्ण असे मंगल कार्य होवूं द्या. सर्वांचे जीवन दोषरहित आणि आपल्या आत्मनिष्ठेने परिपूर्ण करून सम्पन्न करा. ।।4।।

मराठी अनुवादकः सौ. नलिनी प्रभाकर पाटिल, इंदूर

home-last-sec-img