संकल्पात्मकं मनः । मन संकल्परूप असतें व संकल्प मनोमय असतो. मृतपितरांचा मनोमय सूक्ष्मदेह संकल्परूप असल्याने त्याच्या संकल्पानें व त्यांच्या नांवाने दिलेले अन्न ब्राह्मणद्वारें अथवा कव्य अग्नीद्वारे त्या त्या पितरांना हुंडी पटविल्याप्रमाणे मिळतें; त्या अन्नानें व कल्यानें त्यांची तृप्ति होते. देह पडल्यानंतर तिरांना त्या देहाची नुसती भावनाच असल्यामुळे त्यांच्या भावनेनें दिलेली वस्तु त्यांना पोहोंचते; त्यानें त्यांची तृप्तीहि होते. आपल्याकरितां त्याने अन्न दिलें, एवढे त्यांना समजल्याबरोबरच ते तृप्त होतात. सर्व स्थूल देहांतून सूक्ष्म देह असतो. त्या त्या स्थूल देहांत असणाऱ्या सूक्ष्म देहानेंच तो तो स्थूल देह वर्तत असतो. त्या त्या कर्म संस्काराप्रमाणे झालेल्या वासनेनें तसा तसा देह जीव संकल्पून धारण करतो. ईश त्या त्या जीवांत त्याच्या त्याच्या कर्मफलानुरूप संस्कारवासना व संकल्प निर्माण करतो. ईशसृष्टीचा असा हा व्यवहार आहे. या दृष्टीनें सर्वांचेच देह वासनारूप, संकल्परूप व मनोमय असले तरी संकल्पानेंच कुठे स्थूल देहाचें व कुठे सूक्ष्म देहाचें प्राधान्य असते. जिवंत असतांना स्थूल देहाचें प्राधान्य असल्यामुळे स्थूल देहाच्या माणसाला त्यांच्या संकल्पानें दिलेलें अन्न प्रत्यक्ष पोहोचत नाही. देणारा व ग्रहण करणारा दोघेहि इथे स्थूलप्रधान जीव असतात. त्यामुळे स्थूल क्रियेनें त्याच्या त्याच्या तृप्तिकरितां त्याला त्यालाच जेवूं घालावें लागतें. इथे जिवंत माणसांना जेवूं घातलें तरी, त्यांच्या नांवानें आहुति दिली तरी, ती पोहचत नाही म्हणून ती पितरांना पोहोंचत नाहीं असें मानूंहि नये आणि म्हणुहि नये. याला त्यांच्या त्यांच्या ठिकाणी असणारें तें तें स्थूल सूक्ष्म देहांचे प्राधान्यच कारण होय. इथे अन्न जरी पोहोचत नसले तरी त्यांच्या त्यांच्या ग्रहपीडा, रोग व बाधा यांच्या निवारणार्थ आयुष्यवृध्यर्य ब्राह्मणांना दिलेल्या दानानें व जेवूं घातलेल्या अन्नानें व ब्राह्मणांकडून करविलेल्या अनुष्ठानानें त्यांची त्यांची प्रहपीडा, रोग व बाधा नष्ट होतात हा अनुभव आहे. इथे मात्र सूक्ष्म देहाचें प्राधान्य गृहीत धरले जातें. पूर्वजन्म कर्मानेंच प्रहबाधा, रोगबाधा व भूतबाधा होत असते. व पूर्वकर्म सूक्ष्म देहरूपानेंच इथे असते व तें त्याचें फळ सूक्ष्म देहानेंच इथे देत असते. म्हणून संकल्पानें दिलेलें संकल्परूप वासनामय सूक्ष्म देहावर परिणाम करूं शकते.
जन्मान्तरकृतं कर्म व्याधिरूपेण बाधते ।
तच्छान्तिरौषधैर्दानैर्जपहोमसुरार्चनैः ॥
– पूर्वजन्माचें कर्म व्याधिरूपानें बाधत असते व त्याची शांति औषध, दान, जप, होम आणि देवता अनुष्ठान यांनी होते.