Literature

संसारस्य दुःखमूलत्व नाम प्रकरणं पंचमम्‌‌

संसाराच्या दुःखाचे मूळ प्रकरण पांचवे

दुःखमूलं ही संसारी जीवितं क्षणभङगूरम्‌।।
परिणामे विषं भोगः शरीरं रोगमन्दिरम्‌‌।।1।।
अर्थ— सर्व दु:खांचे मूळ कारण म्हणजे हा संसार आहे. हे शरीर म्हणजे रोगाचे मंदीर असून ह्यातील सर्व भोग कार्य ही परिणामी विषाप्रमाणे हानीकारकच आहे. ।।1।।

भोगदाहो विकारोंपि नाशश्चाशाविवर्धनम्‌‌।।
खिन्नता दुःखशोकोच पापं जीवितमुच्यते।।2।।
अर्थ—ह्या जीवनामध्यें प्रत्येक भोग दाहकच होवून सर्वविकार हे नाश आणि आशा ह्यांचेच वर्धन करितात, अर्थात्‌‌ त्यांचीच वाढ करतात.।।2।।

आधिभूतात्मकैस्तापैस्तथा चाध्मात्मिकैरपि।।
आधिदैविकतापैश्च जीविने किं सुखं भवेत्‌‌।।3।।
अर्थ— आधि भोतिक (आग लागणे, अपघात होणे, आधिदैविक भूकम्प बाढ, पूर इत्यादि आणि अध्यात्मिक म्हणजे मानसिक चिन्ता—मनाचे अस्वस्थ्यता — अश्या ताप दुःखापासून जीवनांत कोठून सुख मिळणार ?

यत्र दुःख सुखं भाति सुन्दरचिं जुगुप्सितम्‌‌।।
विकारतः समाधानं जीवनें कीदृशं सुखम्‌‌।।4।।
अर्थ— व्यसनांतील गोष्टी सेवन करणे जसे दारु सेवन, अनैतिक सम्बंध, लांचलुचपत घेणे, ह्‌या गोष्टींचा परिणाम पण दुःखदायक असतो. आणि जे भ्रमाने सुंदर वाटते ते अमंगलच निघते. ते जीवनाला सुखदायक कसे असणार ?।।4।।

क्व शरीरमशेषाणां श्लेष्मादीनां महाचयः।।
क्व चाङ्‌‌गशोभासौभाग्यकमनीयादयो गुणाः।।5।।
अर्थ— कोठे हे सुंदर आकर्षित करणारे भ्रामकरुपी शरीर आणि खरे तर कोठे त्यांतील श्लेष्मा कफ आदि मलांनी परिपूर्ण असणारे शरीर, आणि खरे तर कामना करावी असे सौन्दर्य त्या शरीरांत निश्चित आहे ?

क्वचिद्वा विद्येत यैषा संसारे सुखभावना।।
आखुस्तम्बमिवासाद्य कालस्तामपि कृन्तति।।6।।
अर्थ— क्वचित्‌ कोठे ह्या संसारांत सुखाचा लवलेश आहे असे वाटलेच तर उंदीर ज्या प्रमाणे लाकडाच्या खाम्बाला कोरुन टाकतो त्या प्रमाणेहा काळ त्याचे सौन्दर्य नष्ट करतों।।6।।

अशना च पिपासा च शोकमोही जरामृतिः ।।
एते षडूर्मयो ज्ञेयाः जीवने बहुदुःखदाः।।7।।
अर्थ—भूक, तहान, शोक, दुःख मोह, ज़रावस्था आणि मृत्यु ह्या अत्यंत दुःखदायक अशा लाटा आपल्या जीवनरुपी महासागरात उसळत असतात.।।7।।

रागद्वेषविमावत्र राक्षसाविव विक्रमो ।।
छलतोहर्निशं पापौ शर्म नौ यच्छतः क्वचित्‌‌ ।।8।।
अर्थ— राग, क्रोध आणि द्वेष हे राक्षसासारखेच शक्तिशाली आहेत. ह्या दुर्गुणांनां पासुन दिवस रात्र निघत असताना सुध्दा किंचित्‌ही सुखप्राप्ती होत नाही.।।8।।

दावानलावृतं दिव्य कमनीय वनं यथः।।
कामादिकैर्विकारैश्च जीवनं त्वावृतं तथा।।9।।
अर्थ—— दावानल अरण्यांत स्वयंभूच पेट घेवून फैलणारा अग्नि ज्या प्रमाणे सुंदर रम्य मोहक अश्या वनाचा नाश विध्वंस करतो व त्यावर सर्वत्र झडप घालतो त्या प्रमाणे काम आदि विकार जीवनाचा नाश करतात. ।।9।।

सर्वापदां पदं पापा भावा विभवभूमयः।।
अयः शलाकासदृशाः परस्परमसङिगनः।।10।।
अर्थ— हे सर्व विकार म्हणजे आपत्ति असून पाप निर्माण करणारी अशी सुपीक वैभव सम्पन्न जमीनच आहे. आणि ही पापाचीच उत्पत्ति करते, हे सर्व विकार म्हणे काष्ट सळई प्रमाणे एकमेकांपासून थोडे वेगळे आहेत. ।।10।।

आद्ये नैव न चान्तेपि मध्ये देहाश्रयस्तुसः।।
वर्तते पथिकस्येव पादपस्योश्रयो यथा।।11।।
अर्थ— ज्या प्रमाणे एकादा वाटसरु रस्त्यांत एखाद्या वृक्षाच्या छायेत आश्रय घेतो त्या प्रमाणे हे विकार देहाच्या मधे म्हणजे तारुण्यांत , मध्यम वयांत आश्रय घेतात अर्थात ते विकार तेंव्हाच बळावतात. ।।11।।

आयुःपल्लवकोणाग्रे लम्बिताम्बुवदधृवम्‌‌।।
कदा पतति देहोयं वक्तुं शक्तो न कोपिहि।।12।।
अर्थ—— पाण्याचा थेंब झाडाच्या पानावरुन केंव्हा खाली पडेल याचा नेम नसतो, तद्वैत कोणीही हा आपला देह केंव्हा पडेल हे नाणत नाहीं।।12।।

न जानन्ति कदा कस्मात्‌‌कस्य मृत्युर्भवेदिति।।
मृत्योर्बिभ्यन्ति सर्वेपि जीवनं भयंमन्दिरम्‌‌‌।।13।।
अर्थ—— कोणाचा कोठे आणि केंव्हा मृत्यु होईल हे कोणालाच माहित नसते, आणि जीवनामधील भयावह असे हे मृत्युभयरुपी मंदीर सर्वांसच भेडसावीत असते. ।।13।।

यतो ह्यन्नमया देहा एवैते भिक्षप्राणिनाम्‌‌।।
अन्नस्थानेच वर्तन्ते जीवो जीवस्य जीवनम्‌‌।।14।।
अर्थ—— ज्या प्रमाणे हा देह अन्नमय आहे आणि काही प्राणीमात्रांचे भोजन ही अन्न च आहे. तसेच एक जीव दूसर्‌‌या जीवाचे भक्षण ही करतात, त्यावरुन असे दिसून येते की ते एक दूसर्‌याचे जीवनच आहे. ।।14।।

विषयाशा विषादानाद्‌व्यथितानामचेतसाम्‌‌।।
अप्राढात्मविवेनामायुरायासकारणम्‌‌।।15।।
अर्थ—— आयुष्यांतील सर्व (आयास कारणम्‌‌) कर्माचे उद्‌‌भवणारे कारण म्हणजे ह्या विषयांसाठी (पंचेद्रियांना खाद्य पुरविणे) धडपड आणि त्यांत विषाद (निराशा)हेच दुःखमनांचे कारण आहे. अविकसित अश्या आत्मदेंशेमुळेच हे सर्व कारणी भूत आहे. ।।15।।

युज्यते वेष्टनं वायोराकाशस्यच खण्डनम्‌‌।।
ग्रंथनचिं तरङगाणास्था नायुषि युज्यते।।16।।
अर्थ— ज्या प्रमाणे वायु आणि आकाशाचे वेष्टन जोडले गेलेले दिसते त्या प्रमाणे जीवनांत आयुष्य आणि ह्या कामनाउर्मी ह्यांचे एकत्रीकरण झालेले दिसतें.

शुद्धस्पर्शस्तथा रुपं रसो गन्धोर्थ पञचकम्‌‌।।
एभिरर्थेश्च माद्यन्तो न स्मरन्ति परं पदम्‌‌।।17।।
अर्थ— शब्द, स्पर्श, रुप, रस, गंध ह्या पंचेद्रियांच्या तन्मात्रााने उन्मत्त मानाला परमेश्वराचा विसर पडतो.

स्पर्शलुब्धी करीवात्र शुुद्धलुब्ध कुरङगवत्‌‌।
नश्येत्परवशो भूत्वा ततस्तौ परिवर्जयेत्‌‌।।18।।
अर्थ— ज्या प्रमाणे स्पर्शाच्या मागे हत्ती, शब्द मंजूळ गीत ध्वनिच्या मागे हरीण, मोहित होवून मार्ग भटकत जातो त्या प्रमाणे परवश न होता माणसाने मोहापासून दूर रहायला पाहिते. इंन्द्रिय तृप्तीच्या मागे लागून मनुष्य परवश होवून नष्ट होतो. ।।18।।

रुपलुब्धो भवेद्‌‌दग्धो दीपलूब्धः पतङगवत्‌‌।।
रसलुब्धी विनष्टः स्यादामिषे लुब्धमीनवत्‌‌।।19।।
अर्थ— रुपाच्या मागे मोहित होवून पतंग कीटक दिव्याच्या ज्योतिवर जाउन बसतो, आणि भाजून निधतो, तसाच खाद्याच्या मागे लागून अर्थात जिव्हरसाने मोहित होवून मासा (मीन) अन्नगोळीला मोहित होवून फशी पडतो, नष्ट होतो तद्वतच मनुष्य मोहक वस्तुच्या मागे लागून नष्ट होतो. ।।19।।

यथैव गन्धलुब्धेाहिर्गन्धलुब्धस्तथा पुमान।
मृत्यूमेति यत्‌स्तस्मान्नेच्छेद्‌‌ गन्धमपि क्वचित।।20।।
अर्थ— ज्या प्रमाणे चंदनाच्या सुगंधाच्या मागे लागून सर्प त्यास वेष्टन घालून बसतो आणि माणूसपण त्या सुगंधासाठीच चंदना जवळ जातो व सर्पदंशाने नष्ट होतो, तदनंतर (गर्दी गोळा होवून) माणसे सर्पाला मारतात. एकंदर गंधलुब्धते मुळे सर्पनाश होतो, म्हणून गंधलुब्ध होवू नये।।20।।

प्रमादो ब्रह्मनिष्ठायां विषयासक्तितो भवेत्‌‌।।
स हि मृत्युरिति प्रोक्तोनिखिलैर्ब्रह्मवेदिभिः।।21।।
अर्थ— विषयांमध्ये( इंद्रियतुप्ती मागे) जाऊन ब्रह्मतत्वाचा शोध आणि अभ्यास ह्याचा नाश होता.े मनुष्याचा परमश्वर विषयक चिन्तन आणि अभ्यास नसल्याने आयुष्याचा नाश होतो, ह्यालाच वेदज्ञ व विद्वान मृत्यु असे म्हणतात. ।।21।।

यतो ब्रह्मात्मरुपस्य विस्मृत्यत्रानुभूयते।।
जीवनं मृत्युदुःखं हि मृत्युरेवात्मविस्मृतिः ।।22।।
अर्थ— ज्या पासून (विषयेन्द्रिय तृप्तीसाठी प्रयत्न) ब्रह्मतत्वाची विस्मृति होते म्हणजे विसर पडतो ती स्थिति म्हणजेच मृत्यु होय. जीवन हे मृत्युकडे नेणारे दुःखमय असे सातत्यच होय! ।।22।।

देहाभिमानिनो ये च विषयासक्त चेतसः।
सदा हि मृत्युदुःखं तैः सुखबध्द्यानुभूयते।।23।।
अर्थ— जे सतत आपल्या शरीराचाच अभिमान धरुन विषयांमध्येच गढलेले असतात, त्यांना सततच सुखासाठी म्हणून केलेल्या प्रयत्नांतून (सुखबुध्दया) मृत्युचे दुःखच पदरी पडते.।।23।।

मरणोन्मुखस्य जिव्हाग्रे पतितं मधुबिन्दुवत्‌‌।।
विषयभोगसुखं तच्च कस्यानन्दाय कल्पते।।24।।
अर्थ— जो व्यक्ति मरणाच्या अगदीच समीप दारांत गेलेला आहे, त्याच्या जीभेवर जर मधाचा थेंब टाकला तर तो जसा व्यर्थ आहे, तसेच विषयांपासून होणारे सुख सुध्दां व्यर्थच आहे. ।।24।।

शत्रुनाविकविच्चितं तनुःस्याद्‌‌भग्ननौरिव।।
विकारवायुनाक्षुब्धे किं सुखं जीवनीदधौ।।25।।
अर्थ— शत्रुकडून भयभीत झालेले चित्त आणि शरीर हे एखाद्या फुटक्या नावेसारखे असून त्यातच विषयांच्या विकारांचा झझांवात (प्रचण्ड वादळ) अश्या स्थितीत त्याला जीवनसागरांत कोठले सौख्य मिळणार ? ।।25।।

मनसा वञचते जीवः यथा राजा कुमन्त्रिणा।।
तेनाहितेन मार्गेण जीवो गच्छति नित्यशः ।।26।।
अर्थ—— ज्या प्रमाणे एखादा राजा दुष्ट मंत्राच्या दुविचारी सल्यामुळे फसविला जातो, त्या प्रमाणे हा जीव मनाच्या वाईट सल्यामुळे फसविला जातो. नित्य अहिताच्या कुमार्गाने जीव मार्गक्रमण करतो. ।।26।।

भारो विवेकिनः शास्त्रं भारोज्ञानंच रागिणः।।
अशान्तस्य मनो भारं भारोनात्मविदो वपुः ।।27।।
अर्थ— सांसारिक विषयांत आसक्त अश्या लोकांना शास्त्र आणि शास्त्रज्ञान हे भारभूतच वाटते, ज्यांचे चित्त भिन्न विषयांमुळे चलविचल आहे, त्यांना मन हे पण भारी अर्थात ओझेच वाटते. जे आत्मज्ञान व आत्मसुख हयांनी रहित आहेत, त्यांना हे शरीर सुध्दा एक ओझेच वाटते. ।।27।।

यथोन्मत्‌‌गजारुढश्चांकुशेन विना तथा।।
देहोहंकारआरुढो जीवो ज्ञानाङनकुशाद्विना।।28।।
अर्थ— ज्याप्रमाणे उन्मत्‌‌‌‌ हाथीवरील सवार माणसा जवळ हत्तीला नियंत्रित करणारे अंकुश भाले जवळ नसेल तर हत्ती हेलकावे खाऊन दिशाहीन होईल त्याच प्रमाणे देहाचा अहंकार असणारा माणूस ज्ञानरुपी अंकुशाच्या अभावी जीवनांत हेलकावे खात राहील. व दीशाहीन होईल।।28।।

देहाहंकारतः कामः क्रोधो लोभे मदोपिच।।
सर्वापि विषयासक्ति र्देहाह्‌‌ङकारतो भवेत्‌‌।।29।।
अर्थ— देहाचा अंहकार निर्माण झाल्यावर देहावर काम,क्रोध, लोभ, मोह, मद,मत्सर ह्‌या सर्वच विकारांची आसक्ती निर्माण होते. ।।29।।

अहङकारवशादापदहङकाराद्‌‌दुराधयः।।
अहंङकारवशादीहा नाहङ्‌कारात्परो रिपुः।।30।।
अर्थ— अहंकाराच्या आवरणामुळेच सर्व संकटे येतात. त्यामुळेच सर्व मनःस्ताप होतात. अहंकाराच्या कचाट्‌‌यांत सांपडल्यावर इच्छा उद्‌‌भवतात. अर्थात अहंकारा पेक्षा मोठा महान शत्रु नाहीं. ।।30।।

देहाहङकारतस्तृष्णा रजनीतस्तमो यथा।।
विवर्धते ततः कार्यं देहाहङकृतिनाशनम्‌‌।।31।।
अर्थ— देहामधील अंहकार आणि तृष्णा ही रात्रीच्या अंधःकारासारखी आहेत. त्यामुळे देह आणि अहंकार हे कार्य फोफावते. त्याची वृध्दि होते. ।।31।।

ज्ञानं विना विरक्तिश्चेज्जीवो ह्याश्रयते मुदा।।
इमां कृन्तति तृष्णेयं तन्त्रीमिव कुमूषिका।।32।।
अर्थ— जीव हा ज्ञानविणा अर्थात अज्ञानाने आनंदाच्या शोधात असतो. त्याच्या मागे लागतो, पण ज्या प्रमाणे एखादी चुचून्द्री ही दोरीला कुरतडून टाकते, त्या प्रमाणे ह्या वासना तृष्णा त्या आनंदाशी जोडणारे तार कुरतडून टाकून नष्ट करतात. ।।32।।

शुष्क कासारवत्‌‌ कामो गते वयसि शुष्यति ।।
कालेन जीर्यते सर्वं तृष्णैका तरुणायते।।33।।
अर्थ— वय निघून गेल्यावर आटलेल्या तलावासारखा(सुकलेला तलाव)काम विकार पण शुष्क होतो. कालानुसार सर्वच क्षीण होते. पण वासना मात्र उफाळून तारुण्यांतच राहतात. ।।33।।

आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्यशृङखला।।
यया बद्धाः प्रधावन्ति मुक्तास्तिष्ठन्ति पङगुवत्‌‌।।34।।
अर्थ— आशा नामक बेडी ही फारच आश्चर्यकारक आहे की जी पायांत पडल्यावर माणूस धावू लागतो आणि जर तिच्यापासून सुटला तर एखाद्या लंगड्‌यासारखा एके ठिकाणीच खिळलेला राहतो.।।34।।

जीर्यन्ति जीर्यतेःकेशादन्ता जीर्यन्ति जीर्यतः ।।
जीवनाशा ध्नाशाच जीर्यतोपि न जीर्यतः ।।35।।
अर्थ—— केस आणि दांत हे नष्ट होवू लागले गळूं लागले म्हणजे हळूं—हळूं क्षयच पावतात. पण जीवन आणि धनाची आसक्ति ही कांहीही झाले तरी आणि वय गेले तरी ही कमी होत नाहीं.।।35।।

पत्नी मे स्यात्सुती मे स्यात्‌ धनं मे स्यात्‌‌थेतरम्‌‌।।
इति मे मेच कुर्वाणं हन्ति कालो वृकी बलात्‌‌ ।।36।।
अर्थ— मला पत्नि पाहिजे, पुत्र पाहिजे, धन आणि इतर सर्व हवे असे (मम,मे,माझे) मे—मे करणार्‌या बकर्‌यासारख्या जीवाला काळरुपी (यम) लांडगा घट्‌‌ट पकडून मारतो. ।।36।।

इति श्रीसमर्थरामदासासानुगृहित श्रीरामपदपंङ्‌‌कजभृङगायमान श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य भगवता श्री श्रीधरस्वामिना विरचिते मुमुक्षुसखः ग्रन्थे संसारस्य दुःखमूलत्वंनाम पंचम प्रकरणं सम्पूर्णम्‌‌

home-last-sec-img