Literature

संसार आणि मोक्ष

यस्त्वविज्ञानवान् भवत्यमनस्कः सदाऽशुचिः । 

न स तत्पद्माप्नोति संसारं चाधिगच्छति ॥

यस्तु विज्ञानवान् भवति समनस्कः सदा शुचिः । 

स तु तत्पदमाप्नोति यस्माद्भूयो न जायते ॥(क. ३-७, ८)

– जो तात्त्विक बुद्धिरहित, मनोनिग्रहशून्य व देहसुखाच्या वासनेनें अपवित्र असतो त्यास ब्रह्मपद न मिळतां, तो संसाररूपी जन्ममरण-परंपरेतच सांपडतो. याच्याविरुद्ध, जो तात्त्विक बुद्धियुक्त, मनोनिग्रहशाली व देहसुखाची वासना नसल्यामुळे अति पवित्र असतो तो मात्र ज्याची प्राप्ति झाली असतां पुन्हां जन्मास यावें लागत नाही अशा परमपदास पोहोचतो, पराकाष्ठेचे सुखात्मपद म्हणजे ब्रह्मस्वरूप मिळवितो, असा या दोन मंत्रांचा अर्थ आहे. जन्ममरण चुकविण्याकरितां विषयवासनाशून्य होणेच मुख्य होय. विषयवासना असेर्तोपर्यंत कधीहि जन्म चुकत नाहीं असे यावरून समजून येईल.

home-last-sec-img