Literature

सर्वसामान्य मानवधर्म

अहिंसा सत्यमस्तेयं शौचमिंद्रियनिग्रहः ।एतत्सामासिकं धर्म चातुर्वण्यऽब्रवीन्मनुः ॥ (मनु. १०/६२) निरनिराळ्या स्मृतींनी सार्ववर्णिक धर्म सांगितले आहेत त्यांपैकी हे मनूत आहेत. मागच्या लोकांत त्या सर्वांचा अंतर्भाव झाला आहे. 

आहिंसा सत्यमस्तेयं शौचामंद्रियनिग्रहः । दानं दया दमः शान्तिः सर्वेषां धर्मसाधनम्

( याज्ञ. स्मृ. अ. १-२ )

कोणासहि पीडा न देणे, सत्य भाषण करणे, परद्रव्याचा अपहार न करणे, मन आणि शरीर यांचे पावित्र्य राखणे, इंद्रियदमन करणें, यथाशक्ति दान देणें, आपत्काली दीनांचे रक्षण करणे, मनोजय असणें, अपकारकर्त्या विषयी उपकारबुद्धि बाळगणे ही धर्मकमें सर्व वर्णानाहि, सर्व मानवजातीलाहि लागू आहेत, असे याज्ञवल्क्यांनी सांगितले आहे.

आ हिंसा सत्यमस्तेयमकामकोधलोभता ।

भूतप्रियहितेहा च धर्मोऽयं सार्ववर्णिकः ॥

या श्लोकांत काम, क्रोध राहित्य आणि सर्व प्राणीमात्रांच्या हिताची इच्छा करणे ही दोन लक्षणे अधिक दिसून येतात.

सत्यमस्तेयमक्रोधः शौचं धीरहहर्धृतिर्दमः

संयतौद्रियता विद्या धर्मः सर्व उदाहृतः ॥

सदसद्विवेकबुद्धि असणें, आपत्काली धैर्य बाळगणे, वेदशास्त्राविरुद्ध अथवा धर्माविरुद्ध वागण्याची लाज वाटणे, इंद्रियजय संपादणें, अध्यात्मविद्या अंगवळणी पाडून घेणे ही लक्षणे या श्लोकांत अधिक आहेत.

विष्णुपुराणांतील देवी, अंशाच्या आठव्या अध्यायांतहि सर्व वणीची धर्मकमें सांगितली आहेत. यांत गृहस्थांनाच उद्देशून बरीच लक्षणे आलेली आहेत.

भृत्यादिभरणार्थाय सर्वेषां च परिग्रहः ।

ऋतुकालाभिगमनं स्वदारेषु महीपते ॥

दया समस्तभूतेषु तितिक्षा नाभिमानिता । 

सत्यं शौचमनायासो मंगलं प्रियवादिता 

मैत्र्यं स्पृहा तथा तद्वदकार्पण्यं नरेश्वर ।

अनुसूया च सामान्या वर्णानां कथिता गुणाः ॥ –

आपल्या कुटुंबाच्या लोकांचें, सेवक जनांचे व तसेंच संगोपन होण्याकरितां नीतिन्यायानें द्रव्योपार्जन करणें, आवश्यक अशा इतर वस्तूंचाहि संग्रह करणें, आपापल्या सहधर्मचारिणीशींच ऋतुकाली मात्र गमन करण, पहिले चार दिवस, अकरावी आणि तेरावी रात्र, पर्व, तिथि, दुर्दिन इत्यादि वर्ज्य करून शुभमुहूर्ती, सत्पुत्र प्राप्तीकरितां रतींची इच्छा करणें, भूतदया, सहनशीलता, निरभिमानता, सत्यसंधत्व, बाह्यांतर पावित्र्य, अनायासाचें जीवन, खपर मंगलकारक वागणूक, सर्वदा हितमित मृदुमधुर असे प्रिय व सत्य भाषण, सर्वांशी मित्रता, अत्यधिक आशेचा त्याग, हावरेपणा नसणे, औदार्य, द्वेषराहित्य, मत्सरराहित्य हे गुण सर्व वर्णांच्या गृहस्थांना आवश्यक आहेत व सर्व गृहस्थांत असावेत. विश्वांतील सर्व मानवांनाच अवश्य असणारी ही धर्मकर्मे होत. जीवनाच्या नित्य व्यवहारांत आध्यात्मिक सुख-समाधानाचे दिव्य जीवन व्यतीत करणें मानवांचे एक मुख्य लक्षण आहे. परमात्म्याच्या कृपेला मनुष्य पात्र होण्यास कारणीभूत असणाऱ्या बहुतेक धर्मकर्माचा समुच्चय खालील श्लोकांतून आढळेल. हे श्लोक ‘ भागवतां ‘तील आहेत.

सत्यं दया तपः शौचं तितिक्षेक्षा शमो दमः ।

अहिंसा ब्रह्मचर्य च त्यागः स्वाध्याय आर्जवम् ॥

संतोषः समदृक्सेवा ग्राम्येहोपरमः शनैः ।

नृणां विपर्ययेहेक्षा मौनमात्मविमर्शनम् ॥

अन्नाद्यादेः संविभागो भूतेभ्यश्च यथार्हतः । तेष्वात्मदेवताबुद्धिः सुतरां नृषु पांडव ।।

श्रवणं कीर्तनं चास्य स्मरणं महतां गतेः । सर्वेज्यावनतिर्दास्यं सख्यमात्मसमर्पणम् ॥

नृणामयं परो धर्मः सर्वेषां समुदाहृतः । त्रिंशलक्षणवान्राजन् सर्वात्मा येन तुष्यति ॥

( श्रीमद्भा० १-११-८-१२). सत्य, दया, तप, पावित्र्य, सहनशीलता, तात्त्विक दृष्टि, मनोनिग्रह, इंद्रियदमन, अहिंसा, त्या त्या आश्रमोक्त ब्रह्मचर्य, त्याग, स्तोत्रपाठ, ब्राह्मणांना वेदपाठ, सरलस्वभाव, सदासंतोष, समदृष्टि श्रेष्ठांची सेवा, रोग्यांची शुश्रूषा, शक्यतों हळु हळु विषयवासनांचा त्याग, भोगनिवृत्ति, निषिद्ध व अभिमान पूर्वक केलेल्या कर्माचे फळ अति दुःखमय असते याचा विचार, वाक्यम आत्मानात्मविवेक, पात्रतेप्रमाणे सर्व प्राण्यांना अन्नादिकांचे यथायोग्य वितरण, सर्व जीवमात्रांनाहि आपले आत्मरूप इष्टदेवतारूप म्हणून पाहणे, परमात्म्याच्या सगुण चरित्रामृताचें व निर्गुण सिद्धांतांचें श्रवण करणे, त्याच्या दिव्य लीलांचें रसभरित कीर्तन करणें, कर्तिनसमयीं देहभान विसरणें, परमात्म्याचा तो लीलानुग्रह आठवणे व त्याच्या मंगल नामाचे अखंड स्मरण करणे, त्या आनंदांतच विरून जाणे, परमात्म्याच्या विविध प्रतिमांची सेवा, पूजा, होम, हवन, नमस्कार, दास्य, स्वतःला परमात्म्याचा दास मानणे, परमात्म्यावर सर्वांपेक्षां अधिक निःस्वार्थ प्रेम ठेवून त्याला जीवींचा जिवलग समजून जीवींचे इंगित कळविणें, त्याला सर्व समर्पण करून आपल्याला भिन्न न उरवितां त्यांतच समरसून जाणे. या तीस लक्षणांनी युक्त असा धर्मच अखिल मानवधर्म होय. सर्वांचे शुद्ध रूप असणारा परमात्मा ज्याच्या योगानें संतुष्ट होऊन अशा सर्व अनन्य भक्तांना मुक्ति देतो, तो हा तीस लक्षणी धर्म सर्वथा सर्वांकडून सदा अनुष्ठेय असा आहे. या धर्माच्या आचरणानें अखिल मानवांनाच अभ्युदय-निःश्रेयसाची प्राप्ति होते यांत तिळमात्र संशय नाही. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी या चार आश्रमांना चार प्रकारचें शास्त्रनिर्णित ब्रह्मचर्य आहे. अखिल स्त्रियांच्या ठिकाणीं मातृभावना ठेवणें हें ब्रह्मचर्याश्रमाचें ब्रह्मचर्य, आपल्या विवाहित स्त्री शिवाय अन्य स्त्रियांच्या ठिकाणी मातृदृष्टि ठेऊन ऋतुकाली मात्र विधीला अनुसरून ईशनमनपुरःसर सत्पुत्रप्राप्तीच्या इच्छेनें स्वस्त्रिशी रत होणें हें गृहस्थांचे ब्रह्मचर्य होय. कायावाचामनेंकरून सर्वत्र निष्काम होणें, हें वानप्रस्थाश्रमाचे ब्रह्मचर्य आणि सर्वत्र नामरूपातीत आनंदघन स्वरूपाच्या अनुसंधानांत, नरनारी भेदरहित केवळ एक ब्रह्मानंदरूप होऊन राहणें हें संन्यासाश्रमाचे ब्रह्मचर्य होय.

अखिल मानव जातीचाच हा धर्म म्हणून येथे सांगितल्यामुळे ही विश्वधर्माचीच मीमांसा झाली. अखिल मानवांनी आपले आचरण कसे ठेवावें हें यांत स्पष्टपणे पाहावयास मिळेल. सत्य धर्माची दिशा कळून, यांत विश्व धर्माचें प्रतिबिंब स्पष्टपणे उठून दिसेल— विश्वधर्माच्या सूर्योदयाचे स्पष्ट दर्शन होईल.

home-last-sec-img