Literature

सुख – प्राप्ति : मार्ग व परिणाम

यो वे भूमा तत्सुखम् !‘ (छान्दोग्य. .अ. ७-२३-१)

विश्व ही एक सुखाची प्रयोगशाळा आहे. इथे जो प्रयत्न होतो ती केवळ एका सुखप्राप्तीसाठीच जगातल्या सर्व लोकांचे एकच ध्येय कोणते असेल तर तें सुखप्राप्ति हेच होय, असे अगदी ठळक अक्षरांनी दाखविता येईल.

पः कश्चित्सौख्यहेतोस्त्रिजगति यतते नव दुःखस्य हेतोः ।

श्रीशंकराचार्य म्हणतात, “हा तुमचा सिद्धांत या लोका पुरताच आहे, असे तुम्हाला वाटत असल्यास तसे नाही. तर तीन लोकांनी उपलक्षित होणाऱ्या चतुर्दशलोकात्मक साऱ्या ब्रह्मांडाच लागू पडणारा तो आहे, हे अगदी खरं आहे.

सुखाचें ध्येय एकच, तरी मार्ग दोन प्रकारचे आहेत: प्रवृत्ति आणि निवृत्ति या दोन मार्गांचे दोन प्रकारच्या नावाचे मुख आहे वैषयिक सुख आणि आत्मीय मुख. या सुखाची विशेषणेहि वेगवेगळी आहेत. देशकाल वस्तुसापेक्ष, देहेंद्रियगम्य, क्षणभंगुर, भोगान्ती वीट आणणारे प्राप्ति, भोग, रक्षण, नाथ व भोगान्तों असे सर्वकाळी दुःख देणारें; खरे सुख विसरवून आपले वेड लावून आपल्या नादाने जन्माला कारण होणारें, कधी समाधान, शान्ति, तृप्ति न देणारे हांव वाढविणारे वेळी मृत्युसहि कारण होणारें, रागद्वेष वाढविणारें, विवेक झांकून टाकणारे धरबंध बाळगला नाही तर त्या माणसाची छी थू करवून त्यास दोषी ठरवून, रोगी बनवून दंडास पात्र करणारे व अंती नरक देणारें; ज्या मन इंद्रियांची ओढ याच्याकडे असते त्या मन-इंद्रियांनाच किळसवा होऊन नकोसे होणारें देह-इंद्रियांची शक्ति आणि मनाची इच्छा जर असेल आणि त्या त्या वेळी त्या त्या वस्तूची प्राप्ति होऊन देशकाल अनुकूल असतील तरच लाभणारे म्हणून केवळ अस्वतंत्र इत्यादि, हीं वैषयिक सुखाची विशेषणे आहेत.

आत्मसुखाची विशेषणें अगदी याच्या विरुद्ध वैषयिक सुखाच्या या प्रत्येक विशेषणला काही ठिकाणी योग्य होईल त्या प्रमाणे निर्, अ किंवा न हीं निषेधार्थक अव्यय जोड़न, तर काही ठिकाणी काढून वाचले म्हणजे ही सर्व लक्षणे आत्मसुखाची होतात; तेव्हां ती पुन्हा द्यावयाला नकोत. शेवटी इत्यादि आत्मसुखाची विशेषणे आहेत. एवढे वाक्य जोडले म्हणजे आत्मसुखाची विशेषणे समजून घेण्याचे काम आटोपले. वाटल्यास शेवटी नरक न देणारेंयाऐवजी मोक्ष देणारे एवढे जोडल्यास हे एक वेगळे विशेषण होईल. या विषयसुखालाच संसारसुख असे म्हणतात आणि आत्मीय सुखाला मोक्षसुख असे म्हणतात. संसारसुखाकरिता जन्ममरण पत्करावे लागते आणि याच्या उलट मोक्षसुख करिता जन्ममरणापासून सुटावे लागते. यांपैकी श्रेष्ठ कोणते हे समजले नाही तर श्रुतीला विचारूं या. यो वे भूमा तत्सुखम् । तें अनंत अथवा अविनाशी, जे सर्वाधिक आहे तें सुख म्हणून समजा, असे श्रुतीचे सांगणे आहे. कोणालाहि हे समजते. यदल्पं तन्मर्त्यम्। ज्याला नाश असतो तें अल्पकालीन म्हणून अल्प असते. माल्पे सुखमस्ति ।अल्पांत सुख नसतें (छा. उ. अ. ७-२३) सुख नसते म्हणजे दुःख असते हे स्पष्ट आहे.

‘अल्पविद्यो महागर्वीम्हणतात ना, त्याप्रमाणेच हे अल्पसुख छा महागर्वांचे, याला फार मस्ती. मोठयांचा अपमान करून आपली शेखी मिरविण्याची दांडगी हावहि अल्पांत असते, त्याचप्रमाणे तंत्र महान सुख झाकून त्याचा प्रचार न होऊ देता, त्याच्यावर दोषा रोप करून हे अल्प वैषयिक सुख प्रपंचात आपलीच शेखी मिरवीत सुटले आहे. वाटमाऱ्याचा याचा धंदा. यत्तदग्रेऽमृतोपमं परिणामे विषमिव असे याचे लक्षण. मुखाचें लक्षणच महान् असणारे तें सुख ” असे झाले तर महाविरुद्ध असणारें, अल्प, हें सुखाविरुद्ध ही असणारे म्हणजे दुःखरूपच हे सहज कळून येण्यासारखे आहे. वैषयिक सुखाला प्रेय व आत्मीय सुखाला श्रेय अशी औपनिषदिक ची दुसरी नांवे आहेत. स्पष्ट असतांनाहि न समजतां, आम्ही यापैकी कोणतें सुख निवडून प्राप्त करून घ्यावे म्हणून श्रुतीला विचारले असता ती एवढेच सांगतें-तयोः श्रेय आददानस्य साधु भवति ।या दोहोपंकी श्रेयाची प्राप्ति करून घेणाऱ्याला खरें सुख लाभतें व त्याचे सर्वतोपरी कल्याण होते. हीयतेऽर्थाद्य उ प्रेयो वृणीते । आणि जो अदूरदर्शी प्रेयाची प्राप्ति करून घेतो, तो खऱ्या सुखाला आचवतो. श्रेयो हि धी रोऽभिप्रेयसो वृणीते।बुद्धिमान् आपल्याला इष्ट होणारे श्रेय निवडून घेतो, ‘प्रेयो मन्दो योगक्षेमाद् वृणीते। जो मंद बुद्धीचा असतो तो इंद्रियमनांची ओढ बघून, त्यांचा वेग असे सहन न होता, तत्कालीन सुख देणारे प्रेय इच्छून तेंच निवडून घेतो (कठ उ. अ. १-२. २) एतं वै तमात्मानं विदित्वा ब्राह्मणाः पुत्रेषणायाश्च वित्तंषणायाश्चतयी लोकैषणायाश्च व्युत्थायाथ भिक्षाचर्य चरन्ति ।त्या त्या आपल्या आत्मरूपाला जाणून काही अर्थ नाही म्हणून दारा, पुत्र, द्रव्य कीर्ति या सर्वांच्या इच्छेचा त्याग करून, विद्वान् ब्राह्मण भिक्षु होतात म्हणजे संन्यास घेतात (बृ. उ. अ. ३ ब्रा. ५) यावरून काय तो निवाडा ज्यांचा त्यांनी करून घ्यावयाचा आहे.

श्रुति-आजीचें सांगणें थोडें गूढ वाटल्यास आपल्या श्रीसमर्थ गुरुमाउलीला विचारू. ते काय सांगतात तें कान लावून ऐकू या सांगण्यास सुरुवात झाली वैराग्यपरतें नाहीं भाग्य । वैराग्य नाहीं तें अभाग्य । वैराग्य नसतां योग्य । परमार्थ नव्हे ।। ( दा १२-७-१७ ). वैराग्य करावा त्याग तरीच परमार्थयोग प्रपंचत्यागें सर्व सांग-परमार्थ घडे ॥ (दा. १२-७-९). संसार संगे सुख झालें ऐसें देखिलें ना ऐकिलें । ऐसें जाणोन अनहित केलें । ते दुःखी होती स्वयें ।। (दा. ५-३-१०१). संसारीं सुख मानिती । ते प्राणी मूढमती । जाणोन डोळे झांकिती। पढतमूर्ख ।। (दा. ५-३-१०२). त्यांनींहि संसार केला नाही म्हणजे प्रेय निवडलें नाहीं. ते अर्थात् आपले हित साधणाऱ्या बुद्धिमानांत बसतात आणि हित व्हावे म्हणून मातृहृदय नें खरें तें निक्षून निर्भीडपणे सांगतात. दुसरें एक त्यांचें असेंच वाक्य आहे. परम मूर्खामाजी मूर्ख । जो संसारी मानी सुख । या संसारदुःखा ऐसे दुःख । आणीक नाहीं ॥‘ (दा. २-१०-४०). हो ! मनोबोधा तलाहि एक श्लोक आपल्याला आठवला नव्हे ? कोणता तो ? हं, बरोबर हाच : नव्हे सार संसार हा घोर आहे। मना सज्जना सत्य शोधोनि पाहें । जनीं वीष खातां पुढे सूख कैचें करी रे मना ध्यान या राघवाचें।। (म. बो. ६६)

न संसारात्परो रिपुःअसे म्हणण्यांत आहे. संसार परमात्म्याचे सत्य रूप झांकून आपल्यांत गोवितो म्हणून हा शत्रु आहे. याच्या नादी लागू नये व याच्या नादी लागून परमात्म सुखाला आंचवू नये, हा या सर्व वाक्यांचा भावार्थ आहे.

स्वानंदभावे परितुष्टिमन्तः संशान्त सर्वेन्द्रियतुष्टिमन्तः । अहनिशं ब्रह्मणि ये रमन्तः कौपनिवन्तः खलु भाग्यवन्तः ॥ त्यक्त्वेषण त्रयमवेक्षितमोक्षमार्गा भेक्षामृतेन परिकल्पितदेहयात्राः । ज्योतिः परात्परतरं परमात्मसंज्ञं धन्या द्विजा रहसि हृद्यवलोकयंति ।। नासन्न सन्न सदसन्न महन्न चाणु न स्त्रीपुमान्न च नपुंसकमेकबीजम् । यंब्रह्म तत्समनुपासितमेकचित्त॑र्धन्या विरेजुरितरे भवपाशबद्धाः ॥

अशा रीतीनें श्रीमत् शंकराचार्यांनीहि ज्ञानशील विरक्तांना पोट भरून धन्यवाद दिले आहेत. मृगजळांत सूर्यप्रकाशाप्रमाणे विश्वाच्या आभासांत एक केवळ परमात्मस्वरूपाच्या निव्वळ ॥ जाणीवरूप असणाऱ्या आनंदालाच निवडून तादात्म्यानें मनुष्य जन्माचें सार्थक आपल्याला करावयाचे आहे. निराकार जाणावा नित्य | आकार जाणावा अनित्य । यास बोलिजे नित्यानित्य । विचारणा ।। (दा. १३-६-१५) सारी भासे असार । आणि असारी भासे सार । सारासारविचार शोधून पाहावा ॥ ( दा १३-६-१६) नाना सुख देवें केली । लोके तयास चुकली । ऐसी IT चुकतांच गेलीं । जन्मवरी ।। (दा. १३-७-२२). सर्व सांडून शोधा मजला । ऐसें देवचि बोलिला । लोकीं शब्द अमान्य केला । भगवंताचा ||२३|| म्हणोन नाना दुःख भोगिती । सर्वकाळ कष्टी होती । मनीं सुखची इच्छिती परी तें कचें ||२४|| उदंड सुख जया लागले बेडें तयास चुकले। सुख सुख म्हणताच मेलें। भोगिता ||२५|| शाहाण्यानें ऐसें न करावें सुख होये तेंचि करावे देवासी धुंडीत जावें । ब्रह्मांड परतें ||२६|| विवेकाचें फळ सुख । अविवेकाचें फळ तें दुःख यांत मानेल तें आवश्यक । केलें पाहिजे ||२८||

विश्वांतील म्हणजे जगांतील पदार्थापासून लाभणारे सुख प्राप्त करून घ्यावयाचे झाल्यासहि परिश्रमाचे दुःख सहन करावें लागते. भोगतांनाहि श्रम होतातच. भोगून झाल्यानंतरहि थकवा आणि वोट येतो. त्यामुळे विश्वाला म्हणजे विश्वांतील जीवांना आकारयुक्त प्राणिपदार्थापासून लाभणारें सुख असार म्हणजे खरें असुख = दुःखरूप आहे. साकार अशा आपल्याहून भिन्न असणाऱ्या प्रत्येक बाह्य प्राणिपदार्थापासून लाभण रें सारें दुःख असें दुःखाचें लक्षण अनुभवसिद्ध झाले म्हणजे या लक्षणाहून विरुद्ध वेगळे निराकार, आपल्याहून अभिन्न देहाच्या आत असणारें व कोणत्याहि आपल्याहून भिन्न प्राणिपदार्थापासून न लाभणारेंव सुख असें सुखाचें लक्षण होते व सुखं स्यात्मनो रूपम् । आपणच बाह्य प्राणीपदार्थांच्या विरुद्ध लक्षणाचे अवीट आणि त्रिकालीहि म्हणजे प्राप्ति, भोग आणि भोगांतीहि सारखेच असणारे अविनाशी, अद्वितीय, ( ब्रह्मरूप चीहि हींच लक्षणे असल्यामुळे) ब्रह्मरूप आहो, सुखरूप आहों हे आपोआपच सिद्ध होते आनंदात्मा प्रियो ह्यात्मा। आत्मरूपच आनंदधन आहे आणि ते तसे असल्यामुळेच प्रत्येकाचे सर्वापेक्षा स्वतःवरच अधिक प्रेम असतें, असे सांगून पुढे सुखाकरितां कुणीकडे न बघतां, ‘तमे बैंक जानथ आत्मानमत्या वाचो विमुवामृतस्यैषः सेतुः । ” (मुं. उ. २-२-५). सर्वप्रथम तुमच्या अद्वितीय आत्मरूपाची जाणीव करून घ्या, दुसरी भाषाच सोडा आत्मज्ञान हे संसार महासागराचा सेतु आहे.

आपण कोण याचा विचार गुरुमुखाने करून निजरूपाचीच जाणीव करून घ्या. तुमचें मूळ शुद्ध रूपच, ते जगाचे मुख्य मूळ सुख कारण परब्रह्मच, नित्य निरुपाधिक निरतिशय सुख आहे, असे रावें श्रुति सांगते. सद्गुरुविण ज्ञान कांहीं । सर्वथा होणार नाही. अज्ञान प्राणी प्रवाही | वाहातचि गेले (दा. ५-१-२१) ज्ञान विरहित जे जे केलें । तें तें जन्मासि मूळ जालें । म्हणौनि सद्गुरुची पाउलें। सदृढ धरावी ||२२|| करूनि नाना सायास केला चौदा अस विद्यांचा अभ्यास । रिद्धि सिद्धि सावकास । वोळल्या जरी ॥३३॥ असें तरी सद्गुरुकृपेविरहित । सर्वथा न घडे स्वहित । यमपुरीच अनर्थ । चुकेना येणें ||३४|| गर्भवास अति सांकडी इच्छबंधनाची बेडी । ज्ञान देऊन सीघ्र सोडी । तो सद्गुरु स्वामी ॥ ( दा. ५-२-१४). जो कोणी ज्ञान बोधी । समूळ अविद्या छेदी । इंद्रियेदमन प्रतिपादी । तो सद्गुरु जाणावा ॥२२॥ जो ब्रह्म उपदेसो । अज्ञानबंध में निरसी । जीवात्मया परमात्मयासी । खेच ऐक्यता करी। (दा. ५-२-९) संदेह निःशेष जाळी । स्वधर्म आदरें प्रतिपळी । वेदविरहित टवाळी । करूंच नेणे ||१९|| जेथें सिद्ध शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूळ क्रियेचें साधन । तोचि सद्गुरु निधान । दाखवी डोळां ॥२८॥ मुख्य सद्गुरूचें लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान निश्चयाचे समाधान स्वरूपस्थिती ॥४५॥ ज्ञान वैराग्य आणि भजन । स्वधर्मकर्म आणि साधन। कथा निरूपण श्रवण मनन । नीति न्याय मर्यादा ॥५२॥ यामधें एक उणें असे। तेणें तें विलक्षण दिसे| म्हणौन सर्वहि विलसे। सद्गुरुपासीं ॥५३॥ – ह्रीं श्रीसमर्थांची वचनें वाचीत असतां तद्विज्ञानार्थं स गुरुमेवा भिगच्छेत्स मित्पाणिः श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम् । (मुं. उ. १-२-१२) आचार्याद्धयेव विद्या विदिता साधिष्ठं प्रापतीति । (छां. उ अ. ४-९) यो वा एतदक्षरं गार्ग्यविदित्वाऽस्मिँल्लोके जुहोति यजते तपस्तप्यते बहूनि वर्षसहस्राण्यन्तवदेवास्य तद्भवति । (बृ. उ. अ. ३-८-१०) इत्यादि उपनिषद्वाक्य विद्वानांना आठवतील. ज या दृष्टीने ज्याला सर्वप्रकारेंहि दैवी संपत्तीनें थोर, श्रेष्ठ असणारा, श्रोत्रिय म्हणजे वेदवेत्ता ब्राह्मण ब्रह्मनिष्ठ गुरु लाभतो, त्याच्या इ कृपेने हा विश्वाचें सारभूत सुख असणारें ब्रह्मरूपच तो होतो. तोच एक गुरुशरण नर या जगांत खरोखर धन्य आहे. श्रीसमर्थाच्या शब्दांत तो परमात्मा केवळ तयास नाहीं मायामळ । अखंड, हेतूचा विटाळ जालाच नाहीं ॥ (दा. ९-३-२२).

home-last-sec-img