Literature

स्वात्मबोधामृतम्

अहं भासकं बोधरुपं स्वनिष्ठं। स्वतो भास यद्गाति चिद्‌रुपमेकम्‌‌।
निजानन्दमक्षुब्धरुपं प्रशान्तं। न भिन्नं न तस्मात्परं नावरंच।।1।।
अर्थ—— मी बोधरुपाने स्वतःमध्ये राहणारा प्रकाश आहे. त्यामुळे ते एकमेव अविनाशी तत्व प्रकाशित होते. (जाणले जाते.) त्या योगाने आपल्या “अहं“ अस्तित्वाचा बोध होतो. आपल्या आत्मतत्वाचा, जे शान्त असून अचल आणि आनंददायक आहे आणि परमतत्वापेक्षा वेगळ अस काहींच नसून त्या पेक्षा ते श्रेष्ठ किंवा कनष्टि नाहीं असे जाणवते. असा बोध होतो.

न दृश्यं तथोदृश्यमस्माद्विभिन्नं । यदा भात्यहं मानरुपेण नित्यम्‌‌।
स्वदिप्त्या स्वयं शांतमद्वैतमात्रं । विभिन्नं कथं तत्प्रपश्ये स्वयं यत्‌‌।।2।।
अर्थ—— ह्‌या पासून ते वेगळे नाहीं, ते दृश्य किंवा अदृश्य नाहीं, जेव्हा नित्य मला स्वतःचे भान असते तेंव्हा ते शांत आणि एकाकी असे तेज मला अनुभवास येते, त्याला मी माझ्‌यापासून वेगळे कसे समजूंं ? ।।2।।

यदा नेति नेतीति सर्वं निरस्तं‌‌। किमाभाति तस्याद्विभिन्न च तस्मिन्‌‌।
अहं संम्फुरेत्तस्यं तस्मिंस्तदात्म्यं। चिदानंदरुपस्ततोहं ततोहम्‌‌।।3।।
अर्थ—— ज्या वेळेस नेति—नेति (असे नाही—असे नाही) म्हणून आपण त्यांला निरस्त करतो त्यावेळेस मी माझ्‌यातच ते “अहं अस्मि“ चे बोधरुप अस्तित्व अनुभवतो. ते चिदानंद रुप अर्थात्‌ अक्षय, अखण्ड आनंददायक असते. ।।3।।

यदा भांति दृश्यं स्वतो नैव यस्मात्‌‌। स्वतःसिध्द मद्वैतदृङ्‌‌‌मात्रमेकम्‌‌।
अहं वेदनं तस्य कस्माद्विभाति। ततोहं परं ब्रम्ह सच्चितसुखं यत्‌‌ ।।4।।
अर्थ—— जेव्हां आम्ही एखादे दृश्य बघतो तेंव्हां त्यांत ते (अहं तत्व) नसते. परंतु ते (आमच्यांतील तत्व) स्वयं प्रकाशी अद्वितीय आणि द्र्रृष्टा (बघणारा) असते. मी हे जाणणारा आहे, हे कश्यामुळे समजते ? तेंव्हां मीच ते अविनाशी, निर्मल आनंददायक अर्थात चिदानन्दरुप ब्रम्ह तत्व असतो।।4।।

निरस्ताखिलं ज्ञेयमस्मापितःस्यात। यदा किं तदा ज्ञानमात्राद्विभिन्नम्‌‌।
अहं संस्फुरेत्कस्य तस्मिमन्स्तदानीं। परब्रम्ह चिन्मात्ररुपं ततोहम्‌‌।।5।।
अर्थ—— आपल्यापासून सर्व ज्ञेय विषय दूर केल्यानंतर केवळ स्वतःला स्मरणे हे ज्ञानच शिल्लक रहाते आणि ही “अहं अस्मि“ ही जाणीव कश्यामुळे स्फुरण पावते? तेच ते चिन्मात्र परब्रम्ह आहे. ।।5।।

अवश्यं यदा दृश्यमेवं च वेत्तुं । अहं यत्तदाद्यंत सिध्दं न दृश्यम्‌‌।
यदाद्यंत सिध्दं हि मध्येपि तावत्‌‌। त्रिकालाद्वयं दृश्यभिन्नं ततोहम्‌‌।।6।।
अर्थ—— हे जे दृश्य जगत आम्ही पाहतो त्याचा आदि आणि अंत जाणणे हे आमच्या सामर्थ्याच्या बाहेरचे (अवश्य) आहे. आणि त्या आदि आणि अंताच्या मधल्या काळांत अर्थात्‌‌ (सिध्द म्हणजे आम्हास माहीत असलेल्या भूत—वर्तमान—भविष्य) ह्‌या त्रिकाळांत सुध्दा जे दिसते, किंवा जे आम्ही पाहतो, त्यापेक्षा दृष्टा म्हणजे हे “अहं तत्व“ वेगळे असते. ।।6।।

अहं यस्फुटं तन्नशून्यं कथं चित्‌‌। त्रिकालस्थितेः क्वाप्यभावो न तस्य।
त्रिकालस्थितं किं भजेद्गिन्नरुपं । अहं यत्सदैकस्वरुपं चिदेव।।7।।
अर्थ—— मी हा सर्वत्र व्याप्त आणि जो दृष्टिगोचर आहे तो शून्य कसा होईल ? तिन्ही काळांत उपस्थित असणारा आणि कधीही अभावरुपाने नसणारा अर्थात सदा सद्‌भावाने ”अस्ति” उपस्थित असणारा भिन्न रुपाने कसा भजला जाऊ शकेल ? मी सदा अविनाशी आणि एकस्वरुपच आहे ।।7।।

जडं यन्न तत्कारणं कस्यचित्स्यात्‌‌। ततः सर्वकार्यस्य हेतुश्चिदेव।
यदाद्यन्तमध्येस्ति तस्मिन्स्वनिष्ठं।ह्ययं यस्फुरेत्तत्कथं स्याज्जडं यत्‌‌।।8।।
अर्थ—— कश्याचेही कारण जड नाही. अर्थात्‌ सर्वकार्यांचे कारण चित्त (चैतन्य) हेच तत्व आहे. आदि,मध्य आणि अंत काळी माझेच चित्स्फुरण होत असते तेंव्हा जड हे कोठे राहीले ? ।।8।।

यदा कारणं ज्ञानरुपं स्वसिध्दं । जडं नो भवेत्तत्तदा किं जडं स्यात्‌‌।
जडं तत्स्वतो नैव यद्गाति यस्मात्‌‌।अहंयच्चिदेव स्वदिप्त्या जडं किम्‌‌।।9।।
अर्थ— ज्ञानरुप कारण स्वयं प्रकाशी आणि स्वतःसिध्द आहे. जड हे स्वतः प्रकाशित होत नाही व त्यापासून कांही उत्पन्न ही होत नाही. मी स्वतः चित्तशक्ति संपन्न आणि चिर म्हणजे अनन्तरुपाने विद्यमान आहे. तर मग जड काय राहीले ?।।9।।

विकल्पाज्जडं कार्यमाभाति चेत्तत्‌। भवेन्नैव सत्यं न भातं स्वतश्च।
स्वभातं हि यत्स्याद्विकल्पो न तज्जः।अहं तिद्गभानं विकल्पो न कार्यम्‌‌।।10।।
अर्थ— भ्रमामुळे (किंवा परमेश्वराच्या माये मुळे) जड कार्यास अस्तित्व आहे, असे भासते. वास्तविक जड हे स्वयं प्रकाशी नसते आणि ते सत्य पण नसते. जे स्वयंप्रकाशी चेतनतत्व असते त्यांत भ्रम नसतो. मला चिरंतन तत्वाची विस्मृति होते तो भ्रम नाहीं. ।10।

यदा गाभ्यपायि स्वयं कार्यमत्र। स्वतःसिध्दिमत्कारणं नो तथास्यात्‌‌।
यदुत्पत्तिनाशाद्विमुक्तंच तस्मिन्‌‌। यदुप्तत्तिनाशात्मकं तत्कथं स्यात्‌‌।।11।।
अर्थ— जे विनाशी आहे ते अविनाशी अश्या कारणापासून कसे उत्पन्न होईल ? जे उत्पत्ति आणि नाश रहित आहे (अर्थात चैतन्य तत्व) तपासून उत्पत्तनाशात्मकं कार्य उत्पन्न होत नाहीं. (अर्थात्‌ माझ्‌या विनाश शरीराचे कारण अविनाशी परब्रम्ह तत्व नाहीं.तर माझ्‌यामध्ये जो स्वयंप्रकाशी अविनाशी आत्मा आहे तो त्याचिदात्म्याचा अंश आहे.) ।।11।।

त्रिपुट्‌‌यात्मकं भाति भानं च यास्मिन । सुखप्राप्तये कार्यमेतद्वदन्ति
सुखेनैव भिन्नं यतःस्यात्स्वसिध्दे। त्रिपुट्‌यात्मकं कार्यमस्ति निरर्थम्‌‌।।12।।
अर्थ—— ज्या कार्यात भोक्ता, भोग आणि भोग्य या तीन तत्वांची उपस्थिति जाणवते आणि ते कार्य सुखासाठी म्हणून म्हटले जाते ते स्वतः सुखात्मकरुपाने सिध्द होत नाहीं. ते त्रिपुरात्मक असून निरर्थक असते. ते स्वयंप्रकाशी सुख असते त्यांत भोक्ता भोग्य आणि भोग हे वेगवेगळ्‌‌या रुपाने उपस्थित नसतात भोक्ता म्हणजे आनंद घेणारा, भोग्य म्हणजे ज्यापासून आनंद प्राप्ती होते ते साधन आणि भोग म्हणजे तो आनंद ।।12।।

यदेकं सुखं स्वप्रभं स्वात्ममात्रं। न भोक्ता न भोग्यं च तन्नैव भोगः।
भ्रमाच्चेदिदं तन्नसत्यं यदा स्यात्‌‌। सत्येेस्यसत्यं भ्रमो वौद्वयं सत्‌‌।।13।।
अर्थ— आणि जर हे सुख भ्रामक असेल तर ते सत्य नाहीं मात्र जर त्यांत सत्य (सत्‌‌ अविनाशी तत्व) असेल तर ते भ्रामक अर्थात्‌‌ क्षणिक विनाशी नसेल. जर त्यांत अद्वय, एकमात्र आनंद असेल तर ते आत्मसुख असेल.।।13।।

द्वयं यान्निरस्य स्वयं यद्विशिष्येत्‌‌ । द्वयं नैव तस्मिंस्तदेवाद्वयं हि।
तदेवाद्वयं यत्म्फुरेत्स्वेन भासा। ह्यहंकारतस्तन्न भिन्नात्मकं स्यात।।14।।
अर्थ— द्वयं (भोक्ता आणि भोग्य) स्थिति ला दूर करुन जे स्वतः एकटेच प्रकाशित (उपस्थित) होते तेंव्हा तेथे “अद्वय“ च एकमात्र शिल्लक राहते. अद्वय तत्व जेंव्हा आपल्या तेजाने स्फुरित होते तेंव्हा अहंकारतत्वच अभिन्नत्वाने एकरुपाने (अहं ब्रम्हैस्मि) भावाने स्वयंप्रकाशित होते. ।।14।।

कथं सत्यमिथ्यात्मकं कार्यमेकं । यदा सर्वकार्यं जडं तन्मृषैवं।
स्वतः सिध्दिमत्कारणे सर्वकार्यं। निरर्थं यतःकृत्स्न भेदो वृथा स्यात।।15।।
अर्थ——जेंव्हा सर्वकार्य जड आणि असत्य आहे तर एक कार्य सत्यमिथ्यात्मक मिश्र कसे असेल ? स्वतः सिध्द असल्यामुळे सर्वकार्य व्यर्थ आणि निरर्थकच होइल.।।15।।

न कायर्ं तथा स्थूलसूक्ष्मात्मकं यत्‌‌। परस्मिंश्च तत्कारणे क्वापि भिन्नम्‌‌।
यतो नित्यमेकं परब्रह्मशांतं। न भिन्नं ततःक्वाप्यभिन्नं न कार्यम्‌‌।।16।।
अर्थ—— पर—ब्रह्म—तत्व नित्य अद्वितीय व प्रशान्त असून त्यापासून भिन्न व त्याविरहित कांहीही नाही. स्थूल, सूक्ष्म कोठलेही कार्य त्यापासून वेगळे नाहीं ।।16।।

भवेत्तत्कृतं कारणान्तं च विश्वं। अहं यत्तयोर्भाति मध्ये च कस्मात्‌‌।
अहं चिद्यदा संस्फुरेत्तन्न कार्यात्‌‌।ततश्चित्स्वतोहं बहुत्वं न भिन्नम्‌‌।।17।।
अर्थ—— परब्रम्हतत्वाच्या कृतीच्या शेवटी (कारणान्तंच विश्वं) विश्व निर्माण झाले तर मी त्यांत मध्येच कसा प्रकाशित झालो ? (मी ”दृष्टा” तत्व आहे) मी चित्‌‌ तत्व असून त्या परब्रम्ह तत्वाच्या बहुरुपांत प्रकट झालो (एकोहं बहुस्याम्‌‌.) ।।17।।

यदा भाति किंचिध्द्यहं भानतम्तत्‌‌। अहं दृक्च दृश्यं न मन्ये कथं चित्‌‌।
विरुध्दं न चैकास्पदं स्या तस्तत्‌‌। अहं यत्स्बतो भानतस्तद्वयं न ।।18।।
अर्थ— जर मी दृष्टा (बघणारा, जाणणारा) आहे असे मानले आणि हे भान मला आताच प्राप्त झाले तर ते द्वैत उत्पन्न होईल. परंतु चित्‌आनंद एक रुप असल्याने ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ह्‌यात भेद रहात नाही. तो स्वतः एकरुपाने प्रकाशित होतो. ।।18।।

अनन्तं स्वतो भातमद्वैतमात्रं । कथं चिन्न तद्यद्वणोतीह यस्मात्‌‌।
जगज्जीवविश्वेशभानं वृथा हि। यदा भाव्यते मायिंक कथ्यते तत्‌‌।।19।।
अर्थ— अद्वैत तत्व एकच एक स्वतः अद्वैतरुपाने प्रकाशित होत असते. त्यामुळे त्यापासून जगाची धारणा विभक्त कशी म्हणावी ? जीव—जगत्‌—जगदीश्वर ह्‌यांना पृथक मानणे हे वृथा आहे आणि जर हे पृथक मानले तर ते मायेच्या पडद्यामुळे तसे जाणवते. ।।19।।

न यस्योपलब्धिः प्रमाणप्रसिध्दा । न यद्गाति शक्यं न यस्मात्सुतृप्तिः।
विभानं च तत्स्यान्मृषा मायिकंवा।न सत्यात्मके साधने तन्नियोज्यम्‌‌।।20।।
अर्थ— ज्या मायिक जगताची उत्पत्ती उपलब्धि आणि सार्थकता प्रमाण सिध्द होत नाहीं, ज्या पासून अक्षय संतोष संतृप्ति प्राप्त होत नाही. त्याचा उपयोग शाश्वत (अखण्ड अशा) आनंदाला प्राप्त करण्यासाठी साधन म्हणून उपयोग होत नाहीं. ।।20।।

सुखं यन्न तत्स्याज्जडं कार्यतोपि । जडं कार्यमस्मान्न तद्वा कदाचित।
स्वतः पूर्णवत्कारणस्य स्वदृष्टया। कथं चिन्न भिन्नं किमाप्तव्यमन्यत्‌‌।।21।।
अर्थ—— जे सुख जड मायेपासून उत्पन्न होते ते सुख नाहीं अर्थात ते क्षणिक (जडा चे एक लक्षण) असते. जे चिर सुख आहे ते स्वतः सिध्द स्वयं प्रकाशी आहे, त्याला आणखी कांही प्राप्तव्य नसते, त्यामुळे परम संतोष प्राप्त होतो. ।।21।।

चिदानंदमा़़त्रैक रुपे स्वसिध्दे। कथं तस्य तद्गिन्नरुपप्रसक्तिः।
न माया न मायाकृतं भिन्नकार्यं। विवेकादविद्या च चाविद्यकं वा।।22।।
अर्थ—— स्वयंसिध्द स्वप्रकाशाने आत्मसुखाची प्राप्ति झाल्यावर त्या स्थितित त्या उलट जे मायिक नश्वर सुख आहे त्याची आसक्ति कशी वाटेल? विद्या आणि अविद्या आणि हृयापासून विवेक प्राप्त झाल्यावर माया (अविद्या) आणि त्यापासून प्राप्त होणारे भ्रामक सुख ह्‌याचे आकर्षण वाटणार नाही.।।22।।

विशिष्येतभिन्न सुखं चानवाप्तं। न तृप्तिं भजेत्साति लोके मनुष्यः।
सुखं सर्वंगं स्वात्मसर्वातिभूतं।प्रपश्यन्भजेत्कोपि तृप्तिं च मुक्तिम्‌‌।।23।।
अर्थ—— अद्वय सुखाची प्राप्ती झाल्यावर जगांत तृप्ती झाली नाहीं अस कोण म्हणेल ? अर्थात परमेश्वराशी एकरुपतेचा अनुभव आल्यावर अद्वयानन्द प्राप्ती नंतर तो सुखी व संतुष्टच होईल. सर्वांगाने आत्मसुखाची अनुभूति झाल्यावर कोण तृप्ती व मुक्तीचा विचार करेल ? ।।23।।

न शोको न मोहो न दुःखं सुखस्य। ह्यहं तत्सुखं निश्चयान्नित्यतृप्तीः।
न शोको न मोहो न दुःखंन जन्म।विकारो न मृत्युर्भवेत्क्वापि तस्य।।24।।
अर्थ— अद्वयानन्द प्राप्त झाल्यावर सुखाचा मोह नाही आणि दुःखाचा शोक नाहीं. मी तोच आहे (अहं ब्रम्हास्मी) ह्‌या सुखदायक निश्चयांतच त्याची तृप्ती असते. शोक, मोह, दुःख आणि जन्म, मरण आणि विकार ह्‌यापासून तो मुक्त असतो.।।24।।

यदा भिन्नतस्तत्सुखं भोग्यरुपं । सुखाद्गिन्नतोयं भवेद्‌‌दुःखरुपम्‌‌।
वितृष्णः सुखी पूर्णकामोन तृप्तः। भवेस्मिन्नसौ चक्रवद्गामितः स्यात्‌‌।।25।।
अर्थ— ज्या वेळेस भोग्यरुपाने ते सुख जर भिन्न म्हणजे दूसरे (भोक्ता जो आहे त्यापासून) असेल तर द्वैत (भोग्य आणि भोक्ता ह्‌या रुपाने) दुःखरुपच होईल. भवे (ह्‌या जगांत) म्हणजे ह्‌‌या जन्मांत भौतिक सुखाचा पिपासु कधीच तृप्त किंवा संतुष्ट होत नाहीं. सुख दुःखाच्या फेर्‌‌यांत फिरत रहातो. ।।25।।

स्वभिन्नं सुखं तज्जडं दृश्यरुपं । भवेद्देहलाभश्च भोगाय तस्य।
स्वदुःखोपशान्त्यै भवेद्गोगतृष्णा। ततः कर्म तज्जं फलं जन्म तस्मात्‌‌।।26।।
अर्थ—— स्वतः पेक्षा भिन्न म्हणजे भोक्ता जो आहे त्यापेक्षा वेगळे, भौग्य म्हणजे उपभोगण्याचे साधन जर असेल तर ते जड आणि दृष्य रुप राहील आणि त्याचा भोग घेण्यासाठी देहाचा म्हणजे शरीराचा लाभ होईल (अर्थात जन्म घ्यावा लागेल). सुखदःखाच्या शान्तीसाठी परत भोगतृष्णा उत्पन्न होते आणि त्याकरिता केलेल्या कर्मामुुळे त्यातूनच पुन्हा जन्म निर्माण होतो, अर्थात्‌ पुनर्जन्म घ्यावा लागतो. ।।26।।

जडश्चाशुची रुग्णदेहःक्षयिष्णुः। न भोगेषु तृप्तिः सुदुष्टेन्द्रियाणि।
धनेच्छासु रागादिकात्स्याद्विकर्म। ह्यहो पापकं जन्मदुःखप्रदं हि।।27।।
अर्थ— भौतिक रुपांत जड अपवित्र आणि झिजणारा देह हावरट, दुष्ट इन्द्रियांची कधीही शमन न होणारी अतृप्त लालसा धनार्जन आणि इतर मोहपाशांसाठी होणारे दुष्कर्म ह्‌यामुळे हा जन्म अत्यंत पापकारक आहे ! दुःखकारक आहे!।27।।

सुखं देहजं प्राप्तये जन्मयोग्यं। यदागामि नश्यत्सुखं जन्मना तत्‌‌।
स्वभासाक्षरं दिव्यसौख्यस्वरुपं। स्वयं तद्यतस्तत्कृते जन्म न स्यात्‌‌।।28।।
अर्थ—— शारीरिक सुखा प्रित्यर्थ जन्म घेणे योग्यच आहे आणि पुढे येणार्‌या जन्मामुळे ते सुख विनाशी (नाशात्मकच) होईल स्वयंप्रकाशित दिव्य सौख्य जे असते (ब्रम्ह स्वरुपी अद्वैत सुख) त्याच्या अनुभूति मधून केवळ आनंदच राहिल. पुनर्जन्माची प्राप्ति होणार नाहीं. ।।28।।

सदा मृत्युभीतिर्ह्यहो जीवनाशा। ज्वलत्कामपीडा सुदुर्वृत्तचित्तम्‌‌।
सदैवातिचिंता भवेज्जीविकायाः। अहो कष्टमेतद्गवेज्जन्मना यत्‌‌।।29।।
अर्थ—— सतत मृत्युची टांगती तलवार, आणि (दीर्घ) जीवनाची अमिट आशा कामवासनेचे तापदायकं चटके आणि नेहमी दुर्वासना भरलेले दूषित मन, ह्‌या मुळे जीविकोपार्जनाची सदैव चिंता ह्‌यामुळे किती कष्टदायक हा जन्म आहे ? ।।29।।

इहद्वारभूतं त्रयं विश्रुतं च । प्रवेष्टुं बलान्मृत्युसंसारभीतेंः ।
धनेच्छा च जिव्हा च कांताच तद्यों। रुणाद्गिस्वयं भौर्न तस्यास्ति काचित्‌‌।।30।।
अर्थ—— ह्‌या नश्वर संसाराच्या द्वारा मध्यें निर्भय होवून धीटपणे ह्‌या तीन गोष्टी (1) धनेच्छा (2) रसना (3) कांता आपल्याला बलात्‌ रोकून ठेवतात (त्यामुळेच इच्छा अतृप्ती मुळें पुनर्जन्माचा फेरा पडतो.) ।।30।।

विहीनश्च कामादिकेभ्यः पुमान्यः । स युक्तः सुखीत्यब्रवीद्वासुदेव।
त्यजेत्कामलोभौ च कोपस्तृतीयः त्रिधाद्वारमेतत्स्फुटं दुर्गतेस्तत्‌‌।।31।।
अर्थ—— जो कामादिकांपासून मुक्त होतो तो सुखी मनुष्य होतो, असे “वासुदेव” म्हणतात. काम, लोभ आणि तिसरा क्रोध हे दुर्गतीचे स्पष्ट तीन मार्ग आहेत. ।।31।।

प्रवृत्या निवृत्या यथा शुक्यमेतत्‌‌। त्यजेदेव यब्दाधिकं ब्रह्ममार्गे।
सदा वासनात्याग एव प्रशस्तः। न सत्यस्थितावस्ति सौख्यं विभिन्नम्‌‌।।32।।
अर्थ—— प्रवृत्ति मार्ग (भौतिक सौख्यार्थ प्रगति) आणि निवृत्ति मार्ग (आत्मिक तथा अध्यात्मिक सौख्यार्थ सत्वगुणसम्पन्न प्रगति) ह्‌या दोन्ही मार्गाने जातांना वरील पैकी एक वा अधिक मार्गांचा त्याग करावा. नेहमी वासना त्याग हाच हितकर प्रशस्त मार्ग असतो. सत्यस्थिती मध्ये भिन्न दूसरे सुख नाहीं।।32।।

सदा वासनात्याग एव प्रशस्तः । न सत्यस्थितावस्ति सौख्यं विभिन्नम्‌‌।
त्यजेद्‌‌‌ग्राम्यसौख्यं विवेकाच्च दोषात्‌‌‌।यदेकं परं तत्सुखं चिन्तितव्यम्‌‌।।33।।
अर्थ—— विवके बुध्दिने इन्द्रियजन्य अश्लील असे सौख्य त्यजावे (सोडावे) आणि एक ते परमसुखच (चिदांनद, ब्रह्मलीन) विचारांत ठेवावे. ज्या वेळेस भोग्य—भावाने विचार करण्या पासून आपण मुक्त होतो, त्या वेळेस आपण आपल्यांतच चित्‌‌‌सुखाचा अनुभव करतो. ।।33।।

विमुक्तं यदा भोग्यभावात्सुवृत्तं । चिदेवं स्वयं चित्तमेतत्तदानीम्‌‌।
क्षणध्वंसि यत्तद्विवेकान्निवार्यं। यदा चित्तनेतच्चिदेव स्वयं स्यात्‌‌।
स्वतःपूर्णचित्सौख्यर्सिधौ नभिन्नं। किमस्तीह कर्तव्यतास्य स्वबोधात्‌‌।।34।।
अर्थ— अक्षय अशा चित्‌‌‌सौख्य सागरापासून आपण आपल्याला वेगळे पाहूं शकत नाहीं. आपल्या ह्‌‌या आत्मबोधाच्या प्राप्ती पेक्षा काय कर्तव्य शिल्लक राहिल ? अर्थात चित्त संतृप्तच होईल. ।।34।।

यदा भाविंत तीव्रवेगेन किंचित्‌‌। सतन्निश्चयात्तद्गवेच्छिघ्रमेव।
अहं ब्रह्मवृत्याहि भूमाहमेव। ह्यहं देहहवृत्या हि देहोहमेव।।35।।
अर्थ—— सतत्‌ निश्चयामुळे आपल्याला जे हवे आहे ते शीघ्र मिळेलच. ब्रह्मवृत्तीने मी ब्रह्मच आहे. आणि देहबुध्दिने मी देहच आहे. ।।35।।

श्रुतिस्तत्वमस्यादिवाक्यैश्च नित्यं निराकृत्य जीवेश्वरौ नेति वक्ति।
परं शुध्द मद्वैतसच्चित्सुखं यत्‌ त्वमेवासि तद्‌‌ब्रह्मबोधं ददाति।।36।।
अर्थ— श्रृति म्हणजे वेद्‌‌शास्त्र वाक्यें असे सांगतात कीं आमचे “अहं“ तत्व म्हणजे “तत्‌‌ त्वं असि“. अर्थात्‌‌ ते अविनाशी चित्‌‌‌ तत्वच तूं आहेस. नेति नेति (ते असे नाहीं ) असे निरस्त करुन तत्वमसि हे ब्रह्मवाक्य सिध्द केले जाते. जीव ईश्वर अद्वैत सिध्द करतात. ।।36।।

स्वतोहं ततं सर्ववेदेषु यत्स्यात्‌‌ विशोध्यं तदौपाधिकाब्दंधमोक्षात्‌‌।
अहंब्रह्ममात्रं हि वेदा वदन्ति ह्यविद्या न विद्या न जीवेश्वरौ तत्‌‌।।37।।
अर्थ—— सर्व वेदांमध्ये बंध मोक्ष आदि उपाधियुक्त जे तत्व शोध केले जाते ते केवल ब्रह्मतत्वच आहे, ते विद्या अविद्या किंवा जीव आणि ईश्वर नाहीं ।।37।।

जडं यन्न तस्यास्ति भानं हि यस्मात्‌ स्वभानं ततो ब्रह्मणःस्यादहं यत्‌‌।
न सर्वादिहेतुर्भवेद्‌‌ब्रह्मकार्यं तोहं जडं तन्न चिद्‌रुपमेव ।।38।।
अर्थ— ज्या वेळेस त्याची विस्मृति होते त्या वेळेस ते जड आहे, असे जाणवते व ज्या वेळेस त्याचे भान उत्पन्न होते तेंव्हा ते ब्रह्मच असते. (अहं ब्रह्मास्मि) ज्या कार्यास अविनाशी तत्व हे त्या कार्याचे आदि कारण नसते तेंव्हा ते जड असते. ते कार्य चिद्रूप नसते. अर्थात विनाशी असते. ।।38।।

अहंवृत्तितः सर्वमेवं विभाति स्वभासा स्ववृत्तेरहं पूर्वमस्याः।
अहंवृत्यभावे न विश्वं स्वनिष्ठं क्वचिन्नाप्यभावेहमस्तस्य वृत्तिः ।।39।।
अर्थ—— “अहं“ वृत्ति असते तेंव्हा ह्‌या जगताचा आभास होतो आणि हे विदित होण्याच्या पूर्वी ही हा अहं असतोच. जगाच्या अभाव रुपाच्या स्थिति मध्ये सुध्दां (उदा. स्वप्नावस्था) अहं वृत्तीचा अस्त होत नाहीं.।।39।।

जडा वृत्तिरस्याश्च यत्तज्जडं स्यात्‌अहं यत्स्वतो भासकं यश्चिदेव।
अवस्थात्रयातीतमेकं विशुद्वं स्वतःशाश्वतं ब्रह्म नश्येश्च कस्मात्‌‌।।40।।
अर्थ— ज्याची जड वृत्ति आहे ते जडतत्वच आहे. “अहं“ मात्र स्वतः प्रकाशित होते, म्हणून चित्‌‌ तत्वच आहे. अवस्था त्रयातीत जे तत्व (जाग्रत, स्वप्न, सुषुप्ति) आहे, ते शुध्द ब्रह्मच आहे ते कश्यामुळे नष्ट होईल ?।।40।।

तरंगेषु नीरं यथा व्यापकं स्यात्‌ तथा सर्वकार्येष्वहं नित्यमेकम्‌‌।
तरंगस्य रुपादिबाधे जलं तत्‌ अहं विश्वरुपादिबाधे चिदेव।।41।।
अर्थ— जलामध्ये जे तरंग उठतात ते सतत जलरुपच आहेत. त्याप्रमाणे सर्व कार्यांत मीच एक ब्रह्म भरुन आहे. तरंगाचे रुप नष्ट झाल्यावरते जलच आहे, त्याप्रमाणे विश्वरुप नष्ट झाल्यावर मीच अविनाशी सत्स्वरुप आहे. ।।41।।

यदा कार्यसिद्विर्हि कस्मादपि स्यात्‌ जडं तत्स्वयंकारणात्काशितं हि।
स्वभासा स्वयं चित्स्वतः केवलं यत्‌ अहं भानतस्तस्य भावाद्विभाति।।42।।
अर्थ— दूसर्‌या कोठल्याही कारणाने (अहं किंवा चित्‌‌ तत्वाशिवाय) कार्य सिध्दि होते, तेंव्हा ते कारणच त्या कार्याला प्रकाशित करते. परंतु स्वात्मभान प्राप्त झाल्यावर चित्‌‌ अविनाशी तत्व स्वतःच स्वतःमुळे प्रकट होते. ।।42।।

चिदं च त्यतोहं स्वरुपेण संर्वं भवेदात्मरुपं हि कार्यस्य तस्मात्‌‌।
अहं यो विभासोेस्ति सर्वस्य देहेयमात्मा परब्रह्म वेदस्य वाणी।।43।।
अर्थ—— मीच तेंव्हा चित्स्वरुपाने त्या कार्याचे रुप होतो. सवार्ंचा आपल्या देहामध्ये जो “अहं“ म्हणून बोधरुप आहे, तोच हा आत्मा आहे, अशी वेदांची घोषणा आहे.

यदेकं च वेदादिभिः स्तूयमानं चिदानंदसद्‌‌रुपमेवाहमत्र।
किमाभाति मायाकृतंकार्यमस्मिन्‌‌ न भोग्यं ततो नैव भेक्ता न भोगः।।44।।
अर्थ—— वेदादी शास्त्रांकडून त्या एकमेव चिदानन्द रुपाचे स्तवन केले जाते, तो मीच परब्रह्म तत्व आहे. ह्‌या परमतत्वामध्यें भोग, भोक्ता आणि भोग्य अशी मायावी स्थिती नाहीं. तो तर एक निक्खळ, निर्मळ, एकरस आहे. ।।44।।

अमारुपविश्वस्य भानं चिदेतत्‌‌ अभारुपभोग्यस्य भानं चिदेतत्‌‌।
अमारुपदेहस्य भानं चिदेतत्‌‌ चिदेवस्यं भोग्य भोक्ता न भोगः।।45।।
अर्थ— मायावी जगताचे भान हे चित्‌‌रुप आहे, निश्चैतन्यमायारुप आनंदाचे भान हे चिेत्‌‌तत्व आहे. ह्‌‌या मायावी शरीराचे भान म्हणजे चित्‌‌ तत्वच आहे. स्वयं चत्‌‌ तत्व अद्वैत रुपाने आनंद आणि आनंद घेणारा आहे. पण तो भोगरुप नाहीं. ।।45।।

यदाभाति यस्मान्न भिन्नं ततस्तत्‌ चिदेवस्वयं कार्यतो यद्विभाति।
अहं नैव भिन्नं भवेत्तस्य तस्मात्‌ अहं भानतो भानमेतच्चिदेव।।46।।
अर्थ—— जेंव्हा ते ब्रह्मतत्व आपल्यापासून वेगळे जाणवत नाहीं तेंव्हां ते चित्‌‌स्वरुपच असते. (त्या कार्यतः) स्वयं प्रकाशित होण्यामुळे अहं वृत्ति त्या तत्वापासून भिन्नरुपाने न भासता आपणास असे लक्षात येते (स्मृति) की हे चिरंतन तत्व मीच आहे. ।।46।।

चिदेवं च जीवश्चिदेवेश्वरो हि चिदेव तथा देहतो विच्वतोपि।
चिदेवस्वयं सर्वभावे विभाति स्वतः पूर्णतस्तत्स्वयं स्वेन भासा।।47।।
अर्थ—— जीव चित्‌‌ तत्व आहे, ईश्वर चित्‌‌तत्व आहे, देहतः आणि विश्वतः अर्थात्‌‌‌ देह आणि विश्वरुपाने चित्‌‌ तत्वच सर्वत्र भासमान्‌‌ होते. पूर्णरुपाने ते स्वतःच प्रकाशित होते. ।।47।।

यथा नैव भिन्नो घटो मृत्तिकायाः तथैवात्र मंतव्यमेतश्चिदेव।
न मृत्साभवन्नामरुपं घटस्य चिदेवं तथाहं न कार्यात्मकं स्यात्‌‌।।48।।
अर्थ— ज्या प्रमाणे घट हा मातीपासून भिन्न नाहीं तसेच येथे चित्‌तत्व मानले पाहीजे. ती माती मात्र त्या घटापासून नामरुपाला प्राप्त झाली आहे, असे म्हणता येत नाही, तसेच हे चित्‌‌ अविनाशी स्वरुप, माझ्‌‌यामुळे नामरुपाला आलेले नाहीं. (ते अनादि अव्यय आहे) ।।48।।

यथा रज्जुरेका विदोशस्य भिन्ना फणी रज्जुतो भीरभीतेश्च हेतुः।
तथा ज्ञस्य विज्ञस्य विश्वं द्विधा हि भयं चाभयं भोग्यभूमास्वरुपम्‌‌।।49।।
अर्थ—— एखाद्या अज्ञानी माणसाला दोरी पाहूनच त्यांत सर्पाचा भ्रम उत्पन्न होतो व तेच त्याच्या भयाला कारण होते. तसेच ज्ञानी आणि अज्ञानी माणसाला दोन प्रकारांनी विश्वाची अनुभूती होते. ज्ञानी सर्व जग भूमा (ब्रह्मतत्व) तत्वाने व्याप्त पाहून निर्भय असतो तर अज्ञानी भोग्य स्वरुपाने त्याकडे बघतो आणि भयभीत होतो (कारण ते नश्वर असते) ।।49।।

निजाज्ञानतोज्ञस्य विश्वं सुदुःखं जडो भोग्यबुध्या हि दुःखं प्रयाति।
निजज्ञानतो ज्ञस्य भूमा स्वरुपं सुविज्ञः सुखी भोगबुध्द्याविहीनः।।50।।
अर्थ—— अज्ञ (अजाण, अज्ञानी) माणसाला सर्व जग भोगबुध्दी मुळे दुःखमय जड वाटते व तो दुःखी होतो. त्या उलट ज्ञानी माणूस तेच जग ब्रह्मबुध्दिमुळे भोगहीन उमजून सुखी होतो. ।।50।।

जगत्सत्यकार्यात्मदृष्टयेक्षतेज्ञः असत्यं जगत्कार्यमेवेक्षते ज्ञः।
कृती ज्ञः मुखं कारणाद्वीक्ष्य धन्यःह्यतृप्तः सुखं कार्यतोवीक्ष्य चाज्ञः।।51।।
अर्थ—— अज्ञानी मनुष्य जगताला सत्यात्मक समजतो. आणि जगताला असत्य कार्य आहे असे ज्ञानी माणूस समजतो, ज्ञानी माणूस सुख हे असत्य कारणापासून निर्माण होते, हे समजून आनंदी असतो. अज्ञानी माणूस कार्यापासूनच आनंद मिळतो असे समजून असंतुष्ट राहतो. ।।51।।

वितृष्णो ह्यपूर्णः स्वदेहात्मवेदी वितृष्णश्च पूर्णः स्वभूमात्मवेदी।
न देशान्न कालात्तथा वस्तुतोपि परिच्छेद एवं न तज्ज्ञानतोस्य।।52।।
अर्थ—— देहबुध्दिने (मी म्हणजे माझा देह हा विचार) जगाकडे पाहणारा असंतुष्ट राहतो आणि ब्रह्मबुध्दिने (अहं ब्रह्मास्मी) जगाकडे पाहणारा निरीच्छ राहतो. देश, काल, वस्तु इत्यादिंच्या पासून किंवा त्यांच्या वियोगाने सुध्दा त्याच्या संतोषांत फरक पडत नाही. ।।52।।

अविद्यां न मायां न जीवेश्वरो वा न भोग्यं न भोगं नरं नैव नारीम्‌‌।
न बंधं न मोक्षं जनुर्नैव मृत्युं न विश्वं न पिंडं समीक्षेत विद्वान ।।53।।
अर्थ— विद्वान (ब्रह्मबुध्दिने पाहणारा) सर्व जगताला समबुध्दिने पाहतो त्यांत अविद्या, माया, जीव, ईश्वर, भोग भोग्य नर, नारी, बंध, मोक्ष, जन्म, मृत्यु विश्व आणि कुणीही पिंड (जीव) हे सर्व ब्रह्मरुपच त्यास भासतात ।।53।।

स्वभानात्मकं वीक्ष्य संर्व यदेतत्‌ स्वचिद्‌‌रुपमेकं विमृग्य स्वनिष्ठः।
अहं ब्रह्म जीवो न तस्यास्ति किंचित्‌‌ सदा निर्विकल्पः स्वमात्रोस्ति विद्वान ।।54।।
अर्थ—— विद्वान अर्थात्‌ ज्ञानी साधकाला “स्व“ तत्वाचे भान झाल्यावर हे सर्व जगत पाहून हे सर्व चित्‌‌स्वरुप एकच आहे आणि दूसरे कांही नाही, असे विदित होत ते “अहं ब्रह्म“ ही जाणीव झाल्यावर मी ”जीव” नाही आणि हे सर्व अद्वय एकमात्र चित्‌‌‌तत्वच आहे हा बोध होतो।।54।।

स्वरुपं सदा सर्वतः पूर्णमेकं समीक्ष्य स्वभिन्नं न पश्येन्निजेस्मिन्‌‌।
न माया न मायाकृतं कार्यमस्मिन्‌ स तत्सश्चिदानंदमद्वैतमात्रः।।55।।
अर्थ— अखण्ड पूर्ण रुपाने स्व स्वरुपाचे दर्शन झाल्यामुळे सर्वत्र ब्रह्मस्वरुपच विराजित असल्याने दूसरे वेगळे कांहीही दिसत नाहीं. माया आणि मायाकृत कार्य कांहींच न दिसता सर्वत्र एकच अद्वय चित्स्वरुपच अनुभवास येते. ।।55।।

प्रकाशेत सर्वं च यत्पूर्णरुपं चितोहं स्वसंवेदनं स्याद्यदातु।
किमाभाति तस्माद्विभिन्नं च तस्मिन ‌चिदेवाद्वयं स्वेन भासा चकास्ति।।56।।
अर्थ— जेंव्हा साधकाला स्वतः मुळेच सर्वत्र चित्‌‌तत्वाची जाणीव होते. त्यावेळेस सर्वत्र पूर्णरुपाने ब्रह्मतत्वाचा प्रकाशच दिसतो आणि त्यांत दूसरे कांहीच दिसत नाही. एक स्वसंवेदन मी आहे येवढेच ज्ञात होते. ।।56।।

पुमान्स्वात्मबोधामृतं प्राप्य तृप्तो न मुह्येत्कदा माययाविद्यया वा।
वितन्वन्स्वसौख्यं प्रकाशोत्र लोके स्वमात्रः सदा गजते विश्वपूज्यः।।57।।
अर्थ—— साधक स्वात्मबोध रुपी अमृत प्राशन केल्यावर तृप्त होतो. त्यास तदनन्तर मायिक आणि अज्ञानपूर्ण असे कारण केव्हाही विचलित करु शकत नाही. ह्‌या जगांत असा (स्थिरधी)साधक आपल्या तेजाने झळकतो आणि सर्व विश्वामध्ये पूजनीय होतो. ।।57।।

।। इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यसद्‌‌गुरुभगवता।।
।।श्री श्रीधरस्वामिना विरचितं स्वात्मबोधामृतं स्तोत्रं सम्पूर्णम्‌‌।।

home-last-sec-img