Literature

हिंदू

हिन्दुधर्मप्रलोप्तारो जायन्ते चक्रवर्तिनः । हीनं च दूषयत्येव हिन्दु रित्युच्यते प्रिये ॥ (मेरुतंत्र प्र. ३३) – हिन्दु धर्माचा नाश करण्याची प्रतिज्ञा करून, ती पूर्ण करण्याकरितां निरलसपणें अहोरात्र उत्कट प्रयत्न करणारे मोठमोठे चक्रवर्ति पुढे होणार आहेत, असें ‘मेरुतंत्र’ नामक ग्रंथांत अगोदरच भाकीत करून ठेवलेलें आढळतें. याच श्लोकांत ‘हीन जनांना दूषण देणारे. हिन्दु ‘ अशी ‘ हिन्दु ‘ शब्दाची व्याख्याहि पण दिसून येते. कालांतरानें कलिकाल बळावल्यावर कलींच्या कुटिल कारस्थानानें खैबर आणि सिंध या खिंडीतून येणाऱ्या विदेशीयांची धाड असह्य झाली व उत्तरदेशांत म्हणजे हिंदुकुश पर्वतावर, त्याच्या आसपास व सिंध, पंजाब या प्रदेशांतून असणारे हिंदु आजच्या निर्वासितांप्रमाणे त्यावेळींहि विंध्य प्रांतांतील आपल्या बांधवांत येऊन राहिले असें अधोलिखित कालिका पुराणाच्या वचनावरून कळून येतें: कालेन बलिना नूनमधर्मकलिते कलौ । यवनैर्घोरमाक्रान्ता हिन्दवो विंध्य माविशन् ।

home-last-sec-img