Memories

२. मुक्तीमूलं गुरुकृपा

श्रीभवानीदासराव वकील

. पू. संत नारायण महाराज यांचा मठ हुसेनी आलम येथे आहे. ह्याच मठांत महाराज तेव्हा राहत असत; येथे श्रीराममंदिर असून आवारात श्री मारुतिराय, श्रीदत्त वगैरे वगैरे देवतांची पण स्थाने आहेत. ह्याच ठिकाणी समर्थ संप्रदायी सत्पुरुष नारायण महाराज यांची समाधी आहे.

भगवान श्रीधर स्वामी महाराज पूर्वाश्रमांत, आपल्या बालवयांत ह्या भागात राहत असत. येथे श्रीरामरायासमोर सदैव कीर्तन, भजन आदि चालत असे. शाळेच्या वेळा व्यतिरिक्त स्वामीजी इथे सदैव येत असत. रामनामांत दंग होत असत.

येथे श्री दत्तमूर्ती एका औदुंबर वृक्षाखाली आहे. मठ छोटासाच पण शहरापासून दूर निवांत असा आहे. रम्य परिसर आहे. मनाला समाधान वाटतें. नारायण महाराज हे थोर सत्पुरुष असून ते सदैव सज्जनगडाची वारी करीत असत. आसपासचा भाग इस्लामी वास्तव्याने भारलेला. त्या काळात तर इथे आपली मंडळी येणेही अवघड असेल. ह्या प्रतिकूल परिस्थितीत नारायण महाराजांनी कार्य कसे केले असेल ते चिंतनीय आहे.

औदुंबर वृक्षावर एक ब्रह्मपिशाच्च होते. स्वामीजी ह्या ठिकाणी बरेच वेळा आलेले. त्यांच्या कृपेची पाखर असंख्य लोकांवर पसरली, अनेकांच्या अनेक बाधा निवारण झाल्या. मग हे स्थान त्याला अपवाद कसे ठरणार? ह्याठिकाणी जो ब्रह्मराक्षस होता, त्याच्यापण उद्धाराची वेळ आली होती. द्रव्यदान, वस्त्रदान, अन्नदान, भूमिदान सर्व काही माणसांना करता येईल. पण अधोगतींत जो जीव पडलेला आहे, त्याच्या उद्धाराचा मार्ग सामान्य माणसे तर काय देव, गंधर्व, यक्ष वगैरे कोणाच्याही हातात नसतो. ज्याच्याकडे जे असेल तेच तो देऊ शकतो. कर्माचा वाटेकरी कोणीही होत नाही. तें आपल्याबरोबरच येते. ते कोणालाही चुकविता येत नाही. तें भोगूनच संपवावे लागते.

home-last-sec-img