Memories

३९. स्वप्नानुग्रह

आनंद माधव मराठे रत्नागिरी,

श्रीराम समर्थ ।।

रत्नागिरी येथील श्री. मराठे यांचे कडे वासुदेव गाठे या नांवाचे एक अत्यंत गरीब गृहस्थ आपल्या पत्नी व मुलासह रहात होते. सकाळी जेवापला असले तर सायंकाळी नाही अशी कूटंबाची अवस्था. व्यवसाय व जातीने शिपी पण आचार-विचार ब्राह्मणासारखे होते. घरांतील तिघेहि रोज न चुकता पहाटे पाच वाजतां आंघोळ करून देवळांत काकडारतीस जात व अत्यंत भक्तिभावाने देवाला आळवीत असत. प्रभुरामचंद्र व विठ्ठल रखुमाई यांच्या शिवाय

त्यांना इतर गोष्टी जवळ जवळ माहितच नव्हत्या.

रत्नागिरी स्वामीजीच्या दर्शनासाठी ते आले होते व स्वामीजींनी त्यांना आशीर्वाद दिला. स्वामीजी रत्नागिरीहन निघून गेल्यावर हे गृहस्थ एका दिवशी बोलत असतां सहज म्हणाले की, “सद्गरुकडे आम्ही उपदेश या” अशी मागणी करणार होतो पण श्रींचे जवळ बोलावयास वेळच मिळाला नाही.’

मध्यंतरी ३-४ दिवस गेल्यावर एका मंगलरात्री श्रींनी स्वप्नामध्ये या जोडप्याला गुरु-उपदेश व एकच मंत्र दिला हे विशेष. त्या दिवसापासून ते स्वामींचे एकनिष्ठ शिष्य बनले. 

श्रीधर संदेश वैशाख शके १९०८ सन १९८६

home-last-sec-img