Memories

४१. धनुर्वातातून बचावलो

आनंद माधव मराठे  

मी स्वतः सन १९७२ च्या फेब्रुवारी मध्ये धनुर्वाताने आजारी झालो. सात दिवस मी बेशुध्दावस्थेत होतो. जवळ जवळ २४० इंजेक्शने मला दिली गेली. सर्व उपाय संपले होते. डॉक्टरांनी सांगितले कीहा मुलगा काही तासांचाच धनी आहे. नातेवाईकांना बोलवून घ्या.’ सर्व मंडळी जमली होती. R. M.O. चे शब्दअसे की ‘Only God can save him.’ तो पावेतो वडिलांना मी बरा होईन असा विश्वास होता. ते स्वामींच्याच चिंतनात होते. पण डॉक्टरचे शब्द ऐकताच तेहि थोडे विचलित झाले. इतक्यात वडिलांचे एक स्नेही श्री. जोशी हे पावसहून मला पहाण्यास आले. त्यांच्या जवळ स्वामी स्वरूपानंदानी आपल्या शिष्याना लिहिलेल्या पत्रांचे पत्र-मंजुषाहे पुस्तक होते. वडिलांनी सहजरित्या त्यांनावाचावयास काहीं आहे कां?’ असे विचारताच त्यांनी ते पुस्तक दिले. वडिलांनी पुस्तक उघडले तेव्हा त्याना त्या पुस्तकांतील क्र चे पत्र वाचनात आले. हे पत्र स्वामीस्वरूपानंदानी श्रीमत् सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराजांच्या एका शिष्याला त्याच्या आपत्काली लिहिलेले होते. त्याचा आशय असा अरे! तु श्रीधरस्वामींचा शिष्य. घाबरतोस काय? संकटे येतातजातात. आपण स्थिर असावयाचे, संकटे निवारण करणे हे काम तेच करतील. घाबरतोस कशाला?’ इत्यादि.

हे पत्र वाचतांच वडिलांच्या डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाल्या आणि त्यानी सर्वांना सांगितले कीमुलगा मारला तरी मरणार नाही.’ आणि मी नंतर वीस दिवसांनी बरा होऊन घरी आलो. पूढे महिने आजारी होतो पण जगलो आज ठणठणीत आहे.

श्रीधर संदेश (ज्येष्ठ १९०८)

सन १९८६

home-last-sec-img