Memories

४५. एक दृष्टांत

श्रीमती ताई कानेगांवकर  

।। श्री श्रीधर गुरवे नमः ।।

खरे पाहिले असतां आपणास झालेले दृष्टांत कोणासहि कुठेहि सांगू नयेत असे म्हणतात. पण आपल्या माउलींचा महिमा वर्णन केला नाही तर समाजास श्रीगुरुमाउलींची महानता कशी कळणार? आजकालच्या नास्तिक प्रजेस तिची खरी आवश्यकता आहे. 

गतवर्षी अपघातात जखमी झालेले सर्वजण श्रीसद्गुरुकृपेने बरे होऊन आपापल्या घरी चांगल्या रितीने राहू लागले. परंतु संकटांची जी एक परंपरा सुरू होती ती कमी होईना. सेवा, जप उपासना चालूच होती. अशा मनस्थितीत एकदां मनास असा ताप झाला की श्रीसद्गुरु नसतां आपण हात जोडून यातून कसे सुटणार ? असा विचार येऊन डोळयांतून अश्रु वाहू लागले मनांत नसतांनाहि चुकून तोंडातून उद्गार आले की, मनांस काहीतरी प्रत्यय किंवा दृष्टांत होईपर्यन्त सेवा, जप उपासना सारे बंद! फक्त मनोभावाने नमस्कार करावयाचा ! मन बेचैन होते, तळमळत होते. असेच कांही दिवस गेले. दि. २६ मे रोजी पहाटे दृष्टांत झाला तो असा

आपले श्री सदगरू महाराज प्रवचनासाठी व्यासपीठावर बसले असून हास्यमुद्रेने, प्रसन्नपणे प्रवचन देत असून आपण सर्वजण आनंदाने माउलीचे बोल ऐकत आहोत. इतक्यांत माझ्याकडे पाहून गरुमाउलींनी हाक मारली बाळ, इकड येमी तर खरोखर अगदीच गोंधळून गेले माउलींसमोर खाली मान घालून उभी राहिले. श्रीगुरुमाउली मला म्हणालेतू हे काय मांडले आहेस? संकटांना तोंड द्यावे लागते. निराश होऊन चालत नाही. आज तुझ्या घरांत मोठा आनंदोत्सव होणार आहे. संकट दूर होतील. काळजी करू नकोस. पुन्हा सारी उपासना सुरु करबोलणे संपताच स्वामींनी माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. नंतर मी जागेवर जाऊं लागतांचनिघालीसअसे म्हणाले. मीहोम्हणते तोनमः शांतायम्हणून जागेवर जा असे म्हणाले त्याचप्रमाणे मी केले. स्वप्न संपून मी जागी झाले. सकाळी आनंदोत्सव म्हणजेनातूझाल्याचे कळले. तसेच बऱ्याच दिवसांत जे बिझिनेसचे काम होत नव्हते तेहि पण झाले आणि नंतरचे सारे दिवस सुखसमाधानाने जात आहेत. अर्थात त्याच दिवशी श्री सद्गुरू माउलींची सर्व उपासना सेवा पूर्वीप्रमाणे, प्रसन्न मनाने सुरु केली. अशी आहे आमची श्रीगुरुमाउली सतत पाठीशी साथ देत असणारी !! 

जय जय रघुवीर समर्थ

श्रीधर संदेश (कार्तिक १९०८)

सन १९८६ 

home-last-sec-img