Memories

७. संताच्या सहवासात

श्रीमती भिडे मामी

वास्तविक पाहता पाद्य पूजा म्हणजे काय ? याचा अर्थसुद्धा मला माहीत नसताना माझ्या हातून घडलेली ही
स्वामींची पाद्यपूजा.१९५९ साली भाग्यनगरीमधे स्वामींचे आगमन झाले, तेव्हा घरोघरी पाद्यपूजा होत असत. आम्ही उभयता नातेवाईक प्रसादास जात असू. ते सर्व पाहिले आणि मला वाटले आपल्या घरी पण यांची यथाशक्ति पाद्यपूजा करावी. पण माझ्या पतींना विचारावयाचे कसे? पण तो योग जुळून आला. आणि दूधात साखर म्हणजे स्वामी माझे पती वर्गबंधु निघाले. दोघे समोरासमोर आल्यावर स्वामींनी फक्त यांच्या आवाजावरून ते ओळखले.

माझ्या वन्स पार्वतीबाई गोगटे हयांच्या घरी आम्ही मिळून पाद्यपूजा केली. त्यावेळी हयांनी आम्हाला मुलगा नसल्याचे सांगितले. तेव्हा स्वामी म्हणाले की, पूर्वजन्मी जेवत्या पानांवरुन तुमच्या पत्नीने ब्राह्मण उठविला म्हणून मुलगा
नाही. पण तुमच्या मुलीला मुलं होतील. तरी पण तुम्ही गाणगापूरास जाऊन माधुकरी वाढा म्हणजे ठीक होईल. आज
माझ्या मुलीस एक मुलगा मुलगी आहे ते सर्व आनंदात आहेत.

आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आम्ही देव दिवाळी बंद केल्याचे ओळखले. माझ्या सासुबाईना मोठा मुलगा गेल्याचे
फार दुःख झाले वैतागून त्यांनी दिवाळी बंद केली होती. अर्थात स्वामींच्या सांगण्यावरुन पुन्हा आम्ही देव दिवाळी सुरु
केली.

तेंव्हा थोडक्यात सांगायचे म्हणजे थोर साधु संत आहेत. त्यांचे सामर्थ्य खूप आहे. हयाची महति पटली. अशा संतांची
ओळख होण्याची संधी लाभली. त्याबद्दल मला फार कृतार्थ वाटले. मन शांत ठेवणे. षडरिपुवर विजय मिळवणे हयाच
प्रयत्नात सर्व जीवन घालवायचा प्रयत्न करत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे स्वामींची शांत मूर्ति पाहिली. तेव्हा ती दत्ताच्या फोटोतील मूर्तीप्रमाणे भासली. मला लहानपणापासूनच गाणगापूरच्या दत्ताची आवड आहे. त्या प्रमाणे पाद्यपूजेच्या वेळेस स्वामीजी वाटले. तेव्हा अशा थोर संताचा अलभ्य लाभ झाला. हयाबद्दल आम्ही उभयता आम्हाला फार फार धन्य समजतो.

home-last-sec-img