Letters

पत्र.क्र. १०५

गुरूभगिनी जानकी देवीस श्रींनी पाठविलेले पत्र

‌‍ श्रीराम समर्थ

बाळ! गुरुच्या शरणी जायचे असेल तर घर-दार, नाती-गोती, माय-बाप, मी-माझे हे सर्व सोडून द्यावे लागते, असे श्रुति शास्त्रे सांगतात. माझा संपूर्ण आधार गुरुच आहे, हे मान्य करावे. गुरू हा जगाला अन्न, वस्त्र देऊन तारणारा साक्षात् परमात्मा आहे असे समजावे. गुरूगीता श्लोकांचा कन्नड अर्थ वाचून पहा, त्यानंतर कदाचित् तुला गुरूतत्वाचा अर्थ समजेल. अर्थ जाणल्याविना वाचून काही समजणार नाही. तोंडपाठ करून गुरू तत्वांचा अर्थ कसा समजेल पोरी?

ॐ तत्सत्

इति शिवम्
श्री श्रीधरस्वामी

(श्री सद्गुरूबोधामृत या पुस्तकातून)

home-last-sec-img