Letters

पत्र.क्र. १०८

।।श्रीराम समर्थ।।

बेंगळुर

चि. मूकांबिकेस, चि. सौ. गौरम्मास व चि. मीनाक्षीस आशीर्वाद.

पोरींनो, बऱ्याच दिवसांत दर्शन घडले नाही म्हणून मन उदास झाले असेल. पण श्रीगुरू तुमच्या ह्रदयांतच आहे, तेव्हा त्या आनंद स्वरूपाचे दर्शन घेत रहावे. तो जसे चराचर विश्वाचे रूप आहे तसेच तुमचे स्वरूपही त्यात आहे. गुरूभक्तीमुळे मिळणारे फलित म्हणजेच आत्मसाक्षात्कार होय. श्रीगुरूच्या कृपेने तुम्हा सर्वांना ते भाग्य लाभो, अशी अपेक्षा करतो. इति आशीर्वाद.

सर्वे जनाः सुखिनो भवन्तु।

इति शिवम्
श्रीधर स्वामी

(श्री सद्गुरूबोधामृत या पुस्तकातून)

home-last-sec-img