*© श्रीधर संदेश*
*।।श्रीराम समर्थ ॥*
*दि. ५-४-४८*
*मंगळूर.*
*चि. सौ राधेस,*
*शुभाशीर्वाद.*
वत्सा! *’नमः शांताय’* या मंत्राचा जप तूंहि कर आणि यजमानासहि करण्यास कळविले आहे असे कळव. श्रीगुरुनमनाच्या या मंत्रजपाने सद्गुरुकृपा होईल व मग सर्व काही ठीक जमेल. मनाला शांति मिळेल. कित्येकाचे या *’नमः शान्ताय ‘* मंत्राने सर्वहि अरिष्ट गेले आहे. भावभक्तिनें जप केलेल्यांना परमेश्वरकृपेनें सर्वहि अनुकूल होतें. अध्यात्मनिष्ठाहि वाढते. तुझें समाधान होऊन भीति वाटणे वगैरे सर्व जाईल.श्रीपादुकाहि आहेत. त्यांचे महत्व काही गेले नाही. *’घरी कामधेनू पुढे ताक मागे। उभा कल्पवृक्षातळी दुःख बाहे ।*’ जागी हो. गुरुकृपेनें सुखरूप ऐस. सर्वास आशीर्वाद. सर्वहि सुखी असा!!
*श्रीधरस्वामी*