Letters

पत्र.क्र. ११२

॥ श्री गुरवे नम: ॥

चि. लक्ष्मीदेवीस आशीर्वाद.

गुरुनाम समं दैवं न पिता न च बांधवः ।
गुरुनाम सम स्वामी नेदृशं परमं पदम् ॥

श्रीगुरूसमान देव नाही, मातापिता नाहीत, बंधू नाही, कोणताही प्रभू नाही, यापेक्षा श्रेष्ठ पद नाही. ‘न गुरोरधिकम्’ गुरुविण श्रेष्ठ कोणी नाही.

‘संसार प्रीतिभंगाय’ अनेक जन्मांपासून मागे लागलेल्या मिथ्या संसार-वासनेची त्याच्यामुळेच सुटका करून घ्यावी. त्या खऱ्या व असीमित आनंदस्वरूपाची प्राप्तीच ‘मोक्षप्राप्ती.’ त्यासाठीच तर तुम्ही गुरुभावना ठेवून माझा आश्रय घेतला आहे, नाही का?

‘सर्वचिंतावधिर्गुरुः’ श्रीगुरू साऱ्या चिंतेतून, संसारवासनेतून, जन्मोजन्मीच्या कर्मबंधनांतून, मोक्षाआड येणाऱ्या विघ्नांतून पार करून सुलभ मार्गाने नेतो, असा याचा अर्थ. या जगीं अहेतुक प्रेम, संसार, व्यामोह यांतून सुटका मिळवून परमात्मपदी राहू देणारा परमपवित्र आप्त म्हणजे हा श्रीगुरूच, असे तुम्ही मानता ना? मग तुम्हाकडे गुरूपेक्षा जास्त लक्ष देणारा, तुमचे हित चिंतणारा कोण आहे? कोणी नाही.

इति शिवम्

श्रीधर स्वामी
(श्री सद्गुरूबोधामृत या पुस्तकातून)

home-last-sec-img