Letters

पत्र.क्र. ११५

॥ श्री राम समर्थ ॥

चि. लक्ष्मीदेवीस आशीर्वाद.

बाळ, शक्य असेल तर पहाटे चार वाजता उठून, नाकाने सावकाश श्वास घे आणि सोड; असे अर्धा तास तरी व्यवस्थित कर. सकाळचे तीर्थस्नान, देहस्वास्थ्य चांगले होईस्तवर कर. मल-मूत्र कधीही रोखू नये. भ्रूमध्यात दृष्टी ठेवून जप कर, डोळ्यांवर ताण येऊ न देता डोळे मिटून मनात जप करत रहावे.

चि. सरोजिनीच्या पत्रात जास्त माहिती आहे. एका वेळी जेवण कर. तू व देवक्का श्रीधरकुटीत आलेल्या प्रसादाचा नैवेद्यच घ्या. दूध, दही देखील तिथून घेत जा. त्यानंतर आहार सोडण्याची गरज भासणार नाही. तब्येत सुधारल्यावर ‘नम: शांताय…’ हा मंत्र रोज १०८ वेळा म्हण. साधना करून आनंदरूपे जगा.

इति शिवम्
श्रीधर स्वामी
(श्री सद्गुरूबोधामृत या पुस्तकातून)

home-last-sec-img