Letters

पत्र.क्र. ११९

।। श्री गुरवे नम:।।

साधना ही आधी व्यवस्थित चालते, पण नंतर कुंठित व्हायला लागते. नाना तऱ्हेचे विघ्ने येतात आणि खंड पडतो. यांचे निवारण होऊन, निर्विघ्नपणे साधना करून आत्मनिष्ठा प्राप्त होण्यासाठी काय करावे?
विवेक-विचार हे रोज येत नाहीत. आले तरी त्यांचा फारसा परिणाम होत नाही. अनेक वेळा अविवेक, अविचारांचे काम बऱ्यापैकी चालते, तेंव्हा अशा परिस्थितीत काय करावे?

श्रीगुरुंचे उत्तर:
बाळ, निष्प्रपंच आनंदघन स्वरूपाच्या जाणिवेविना कोणत्याही गोष्टीचा विचार न करता सतत ध्यानयोगाचा अभ्यास कर. उपासना कर किंवा

गुरुमूर्ति सदा ध्यानं गुरूनाम सदा जप ।।

याचे पठण कर. याने विघ्नबाधा नष्ट होते. मनाला सतत विचारत रहा की ‘आजवर तू इतके कष्ट सोसून कशाला स्वतः चे स्वरूप समजलास?’

इति शिवम्
श्रीधरस्वामी
( श्री सद्गुरूबोधामृत या पुस्तकातून)

home-last-sec-img