Letters

पत्र.क्र. १२०

सर्व साधकांना सूचना

१. मौन पाळावे. तसाच प्रसंग आला तर लिहून दाखवावे. लक्ष विचलित झाले तर ध्यानात बाधा येते, त्यामुळे कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नये. कोणताही व्यवहार करू नये.

२. सदैव जप करावा. त्यावीण राहू नये. चांदण्याचे ध्यान म्हणजे एक आनंद समजावा. ध्यानात असताना जप थांबला तरी चालेल.

३. एकांतातून बाहेर येण्यापूर्वी सगुण किंवा निर्गुण साक्षात्कार मिळवूनच राहीन असा ठाम निर्धार करूनच साधना करावी.

जय जय रघुवीर समर्थ!

इति शिवम्
श्रीधरस्वामी
(श्री सद्गुरूबोधामृत या पुस्तकातून)

home-last-sec-img