।।श्री गुरवे नमः।।
सज्जनगड
प्रत्येकाचे मन हे लहान मुलासारखे असते. आई आपल्या मुलाला समजावून सांगते, खेळवता खेळवता शिकविते, वाईटापासून परावृत्त करते, चांगल्याकडे आकर्षित करते. क्लृप्ती, युक्ती यांचा वापर करून चांगले- वाईट पटवून देते. आपले मन ही बालकासारखेच असते. ते एका ठिकाणी थांबत नाही. त्यासाठी आपल्याला ठरल्या वेळी न चुकता काम करणे, झोपणे- उठणे, विश्रांती घेणे, स्नान, मानसपूजा, ध्यान- जप सेवा इत्यादी करणे आवश्यक असते. एका कामाचा कंटाळला आला तर दुसऱ्यात रमावे. या सर्वांसाठी एक क्रम असायलाच हवा. गोसेवा मनाला शुद्ध, शांत व उल्लसित ठेवते.
इति शिवम्
श्री श्रीधरस्वामी
(श्री सद्गुरूबोधामृत या पुस्तकातून)