।।श्रीराम समर्थ।।
सज्जनगड
गायीच्या शरीरात सर्व देवता वास करतात. ते गायत्रीचे रूप आहे. तिच्या सेवेमुळे सर्वांची सेवा घडते. आरोग्य लाभते. गोपूजा हीच साऱ्या देवतांची पूजा. आपला धर्म सांगतो, की गोप्रदक्षिणा हीच पृथ्वी प्रदक्षिणा असते. गोमाता ही कामधेनू आहे. मागेल ते ती देते. परमार्थ्यांना सात्विक गुण मिळविण्याची ही एक दिव्य साधना आहे. तिन्ही वेळा सेवा कर. आपण वेळ ठरवून सेवा केली की झाले.
मानसपूजा कशी करता? ध्यान कसे करता? मी दिलेला लेख दत्तजयंतीच्या विशेष अंकात आलेला आहे, तो वाच.
इति शिवम्
श्रीधरस्वामी
(श्री सद्गुरूबोधामृत या पुस्तकातून)