।।श्रीराम समर्थ।।
होशंगाबाद
आश्विन शुक्ल प्रतिपदा
चि. लक्ष्मीनारायणाचे अंतःकरण शुद्ध आहे. मनात काही नसते. रागारागात जे म्हटले असेल त्याला काही अर्थ नसतो. त्याचे अस्तित्व थोड्या वेळापुरते असते. त्याबद्दल वाचा फोडू नये. चांगल्या गोष्टी सांगून आनंद वाढवावा. समाजात जसे आनंद, शांती, समाधान असतात, तसेच स्वतःलाही त्याची गरज असते. त्यात कुणाचेही बिघडत नाही. आपल्या सभोवतालचे वातावरण नेहमी सुखी, आनंदी व पवित्र ठेवावे. यालाच परमार्थ म्हणतात.
इति शिवम्
श्रीधरस्वामी
(श्री सद्गुरूबोधामृत या पुस्तकातून)