Letters

पत्र.क्र. १२६

।।श्री गुरवे नमः।।

जन्म घेऊन परमपद प्राप्त करायला प्रवृत्ति-निवृत्ति असे दोन वेदोक्त मार्ग आहेत. मानव जीवन हे पर्वतासमान मानले तर हे दोन मार्ग त्याचे माथा व पायथा असे समजायला हरकत नाही. प्रत्येकाने आपल्या इष्ट स्थानी रहावे, म्हणजेच जवळ किंवा लांबचा मार्ग शोधावा. दोन्हींमध्ये श्रीगुरूचा आशीर्वाद, शिष्यवात्सल्य आहे, यात संदेह असण्याचे कारणच नाही. प्रवृत्ति मार्गाने जाणारे शेवटी तो मार्ग सोडून निवृत्ति मार्गाचा अवलंब करून आत्मसाक्षात्कार करून घेण्याचे राहून जाते, ते विसरून जातात. पण तसे होता कामा नये.

सर्वांचे आनंदघन आत्मरुप
श्रीधर स्वामी
(श्री सद्गुरूबोधामृत या पुस्तकातून)

home-last-sec-img