*© श्रीधर संदेश*
*।।श्रीराम समर्थ ॥*
*मंगळूर.*
*दि. ९-६-१९४८*
*चि. सौ. राधेस*
आशीर्वाद,
बाळ! तुझे पत्र पोहोचले. स्तोत्रहि वाचले. तळमळ अशी का ? ज्ञानरहित तळमळ जाणार नाही.
सहजपूर्ण स्वरूप असे। तेथे हानी-लाभ काही नसें। एकमेवाद्वितीयीं हें ऐसें । दुःख केंवि ॥१॥
स्वरूपाची अनंत दिठी । नसे कदापीहि तुटी। का हो तूं बाउगी कष्टी। मज न कळे ॥२॥
निजरूप मानधन । जेथें विरोनि जाये मन । मी या स्फूर्तीचे मुळस्थान । विसरे केंवि ॥३॥
सांडो ही सकळ भ्रांति । सदा बाळगो आत्मशांति। उजळो बाळा ब्रह्मकांति । मुखी तुझ्या ॥४॥
*भगवान श्रीधर.*