Letters

पत्र.क्र. १३०

॥ श्री गुरवे नम: ॥

सोमवार

साधकाची दिनचर्या :

पहाटे ३-४ वाजता उठून प्रात:स्मरण, उदय राग किंवा आत्मचिंतन करून नंतर शौचास जावे. त्यानंतर मुखमार्जन, स्नान, झोप येऊ नये यासाठी आसने – प्राणायाम, जप-ध्यान करावे. सूर्योदय झाला की संध्यावंदना, अर्घ्य-प्रदान व्हायला हवे. सूर्यनमस्कार, उरलेले जप, ध्यान, प्रस्थानत्रय व्यासंग (भगवद्गीता, उपनिषदे व ब्रह्मसूत्रे), सेवाकार्ये, दुपारचे आन्हिक, प्रसादग्रहण, त्यानंतर विश्रांती. साडेतीन ते साडेचार सामुदायिक वाचन, नंतर एक तास आसनादी व्यायाम. सूर्यास्त होण्याआधी स्नान, आह्निक, फलाहार, ध्यान, नंतर १०च्या आधी विश्रांती.

इति शिवम्
श्रीधर स्वामी

home-last-sec-img