*© श्रीधर संदेश*
*डॉ. ल. शं. भावे यांना पाठवलेले पत्र*
*।। श्रीराम समर्थ ॥*
*चि. डॉक्टर यांस,*
श्री. पळणिटकर मास्तरांचे पत्र वाचलें, त्यांची प्रकृती कशी आहे ?
माझ्या बाबतींत ज्वर, अशक्तता हळुहळू भरून निघत आहे. साळीच्या लाह्याची पेज कालपासून घेण्यास सुरवात केली आहे. हत्तीच्या पायाने येतें व मुंगीच्या पावलाने जाते.
*’सत्यमेव जयते’ शेवटी सत्याचाच जय होतो. ‘धैर्य सर्वार्थसाधकम्’ धैर्य सोडू नये, धैर्य हेच बळ.*
दुष्ट देवता, विघ्न देवता आणि मारण प्रयोगाची बलिष्ठ मंत्रदेवता, अधर्माच्या अभिमानी देवता या सर्वांनी मिळून एकदम हल्ला चढविला. चकमकीत चुकून काही वार लागतात, त्याप्रमाणे थोडा त्रास झाला. या शरीराला नाहिसे करावे म्हणून मांत्रिक, दुष्ट माणसे, दुष्ट देवता, अधर्माच्या व युगाभिमानी देवता यांनी चंग बांधला. आतापर्यंत कोणाचे चालले नाहीं व पुढेही चालणार नाही.
*’धर्मो रक्षिति रक्षितः’*
*- श्रीधर स्वामी*