Letters

पत्र.क्र. ५३

*© श्रीधर संदेश*

*कुरगडी,शुक्रवार*

*चि. नीळकंठ यांस आशीर्वाद.*

माझे प्रेम सर्वांवरच सारखे आहे, मी म्हणजे प्राणिमात्रांच्या हितदृष्टीची कोरीव मूर्ती आहे. तुम्ही गुरुकृपेचा फायदा घेऊन तुमचे आचार-विचार स्व-परउन्नतीकारक परिणामी ठरतील असें रहा. तुमचा असाच प्रतिक्षणाचा दिव्य जीवनक्रम असावा. उन्नति आपणच जाणून बुझून करावयाची असते. आपले मनच आपल्याला साक्ष असते. त्यालाच प्रश्न घाल. आतापर्यंत तुझें आचरण प्रगतीपर व समाधानकारक वाटले नाही, पुढे तरी पश्चात्तापाने आपल्यांत सुधारणा करून नव्या जोमाने साधनेला लाग. माझी कृपा सदैव आहे. उत्तरोत्तर तुझी उन्नति होवो. चि. कुलकर्णी आल्यागेल्याचे आतिथ्य फार चांगले ठेवतात हे ऐकून आनंद झाला.

*सर्वांस आशीर्वाद.*
*श्रीधर*

home-last-sec-img