Letters

पत्र.क्र. ५४

*© श्रीधर संदेश*

*मंगळूर १०।२।४६*

*चि. …..यांस आशीर्वाद.*

तुमच्या विषयी इकडे गैरसमज झाल्यासारखा तुम्हीहि इकडच्या बद्दल गैरसमज करून घेऊ नका. चि. श्रीधर अथवा अय्यर हे दोघेहि अनन्य भक्त आहेत, या विषयी तिळमात्रहि शंका नाही. चि. श्रीधरच्या मनांत असलेला किंतु घालवून टाकला आहे. मनुष्य कोणीच वाईट नसतो, घोटाळा होतो तो भावनेचा. ‘अज्ञानमेवास्य हि मूलकारणम् ‘ भ्रममूलमिदं जगत् ‘ भावनेचा घोटाळा घालविणे म्हणजेच सत्यस्थिती. या वाक्याची व्याप्ति, व्यवहारापासून ते परमार्थापर्यंत एकसारखीच आहे. उपाधि तेवढी त्याज्यच. ‘जीवो ब्रह्मैव ना परः।’

*श्रीधर*

home-last-sec-img