*© श्रीधर संदेश*
*चि.xxxxयांस आशीर्वाद*
फोटो, पावती पुस्तके येऊन पोहोचली. नम्र विनंती या पक्षांतील मजकूर वाचून दाखविला. यात्रेकरू सोईसाठी मंडळातर्फे एक छोटेसे दुकान येथे सुरू केले आहे. असे ऐकले व नंतर पाहिले असे प्रसिध्द करावयास नको होते. ‘तोलासारखा हावभाव करावा’ हे तुमचे अगदीच हिनकस व्यापारी संकुचित धोरण झाले. ते काही मला आवडले नाही. मला विचारावयाचि हि बुध्दि आताशः कमी होत चालली आहे. श्रीसमर्थांच्या कृपेने तुमचा उत्कर्ष होत आहे का ? ते नीट विचार करत जा! क्षणोक्षणी मन परीक्षून पहा! आपली स्थिति ढासळू देऊ नये.
मी पाठवून देतो लोकांचे हि साहय्य लाभेल. हे दुकानाचे धोरण मात्र तुमच्या आणि माझ्या नांवाला उणीवच असणारे आहे.
निस्पृहाने आपली विशाल भूमिका कधी विसरू नये व्यवहारात हा साधक व्हावा, विष होऊन परिणमू नये. या अशा कमीपणाच्या संकुचित भावना विरक्ताला कोपऱ्यात बसवतात. असो.
सदोदित विशाल भावनेची आत्मस्थिति बाळगून गंभीरपणे आपले साधन चालवावें, विश्वव्यापी आत्मभावनेची विशाल भूमिकाच मोक्षभूमी आहे.
चिकित्सेविषयी काही अयोग्य म्हणून सांगता येत नसले तरी गडावर श्रीसमर्थाचें तीर्थ, अंगारा, नवस याचा गौरव याने कमी होतो असे सुचवल्याशिवाय राहवत नाही.
‘चरे इथे – विचरे’ असे लिहीले होते. तुम्ही डोळे मिटूनच बघितले असे वाटते.
पहा. होत असलेल्या सर्व कार्याने तुम्ही श्री समर्थाच्या कृपेला उत्तरोत्तर जास्त पात्र व्हा | मलाहि पण तुमची कीर्ति एकून धन्यता वाटावी. शिष्याची अपकिर्ति ऐकून कान कंटाळले आहेत. पोळलेल्या हृदयावर पुन्हा डाग देऊ नका. ती उणीव भरून काढून सर्वदा माझ्या वाढत्या उत्साहाला नवीन जोम आणा.
*’सर्वे जनाः सुखिनो भवन्तु*
*श्रीधर*