Letters

पत्र.क्र. ५८

*© श्रीधर संदेश*

*महाबळेश्वर वै। शु।। २ सोमवार*

*श्रींचे एक पत्र*

*आशीर्वाद,*

बाळांनो! नेमलेला जप करता ना? मनोभूमिका वाढीस लागली आहे ना? तुमचे आचार विचार उच्च कोटीचे झाले आहेत ना? तुमच्या सान्निध्यातले लोकहि तुम्हाला आता पूर्वी पेक्षा मनापासून वाखाणतात ना? तुमच्या नित्याच्या आचरणातून इतरांना दिव्य जीवनाचे धडे मिळतात ना? तुमचे वागणे बोलणे, सर्वच आचरण गोड असते ना? पवित्र आचरण आणि गोड स्वभाव हा आदर्श, मानवी जीवनाचा अचूक कस आहे. आई, बाप, कुलपुरोहित, सद्गुरु गोब्राह्मण, कुलधर्म, कुलाचार, देवदेवता, मान्यव्यक्ति इत्यादिकांच्या ठिकाणी आदर बाळगून असणे अभ्युदयाचे लक्षण होय, आई, वडील आदि थोर व्यक्तीना आपल्या सेवेने संतुष्ट ठेऊन त्यांच्या आशीर्वादास पात्र व्हावे. यांच्या आशीर्वादाने मनुष्याला सर्वोत्कृष्ट जीवनाचा प्राप्ती होते. सोवळे हे पावित्र्याचे द्योतक आहे. श्रीसद्गुण उपासना वा वडील माणसे यांच्या सेवेत असताना पावित्र्य ठेवले तितके त्यांना प्रीतिकर होते.

श्रीगुरु, देवदेवता व वडील माणसांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्वांचे जीवन दिव्य होवो! तुमचे जीवन इतरांना आदर्श होवो!

*’सर्वे जनाः सुखिनो भवन्तु’*

*इतिशम्*

*श्रीधरस्वामी*

home-last-sec-img