Letters

पत्र.क्र. ७०

*© श्रीधर संदेश*

*पूर्वश्रमातील भगिनीपुत्र श्री. दत्तात्रेय कमलापूरकर, हैदराबाद ह्यांना पत्रोत्तर*

कोणी तरी मज मानिता आपण । परशद्धे अनमान करू नये ।।

करू नये सत्य मानीव अनुमान । प्रत्यक्ष दर्शना वांचोनिया ।।

वाचोनिया पत्रा, वाटे ऐसें चित्ता । तुम्ही या नेणता साचपणे ।।

साचपणे जगीं नाहीं या संबंधी । एकत्वें त्रिशुद्धी विश्वों असें ।।

विश्व असे एक नसतां संबंध । भेटीचा विरूध सहजचि ।।

सहजचि एक असता या जगीं। कोणावरी त्रागी नेणतसो ।।

नेणतसो आम्ही पत्राचा संदर्भ | नसे आम्हां लाभ मुमुक्षेसी ।।

मुमुक्षेसी काज नसे आम्हांलागीं । तद्धर्मविभागी आम्ही न हो ।।

आम्ही न हो काही कशाचे साधक । जया आवश्यक शरीर हे ।।

शरीर हे नोहे कदा काळी संत । संता उपमित समया केवि ।।

समया केवि तुम्ही मानिता समर्थ । लोकानुग्रहार्था अवतार ।।

अवतारकार्य नोहे ते त्यापरी । केवि प्रभूसरी यासी शोभे ।।

*श्रीधरस्वामी*

home-last-sec-img